October 13, 2012

' अश्वत्थ सर्ववृक्षाणाम देवर्षीणां च नारद '


अश्वत्थाचे झाड  म्हणजे पिंपळाचे झाड .  या वृक्षाची महती अनेक धार्मीक ग्रंथात वर्णन केली आहे.

अश्वत्थ हा वृक्ष साक्षात हरिरुपच आहे.  प्रतीकरुपाने अश्वत्थ सेवा ही विष्णुसेवाच होते. स्कंदपुराणात म्हणले आहे -








मूले विष्णु: स्थितो नित्यं  स्कन्धे केशव एव च !
नारायणस्तु शाखासु पत्रेषु भगवान् हरि: ! !
फलेsच्युतो न संदेहः सर्वदेवै: समन्वितः !
स एव विष्णुर्द्रुम एव मूर्तो महात्मभि सेवित पूण्यमूलः !!
यस्याश्रयः पापसहस्रहन्ता भवेनृणां कामदुधो गुणाढ्यः !!


अर्थ : - पिंपळाच्या मुळाशी विष्णुरुप, बुंध्यात केशवरुप, फांद्यात नारायण रुप  व पानात हरिरुप भगवंतच स्वतः आहे.  तसेच फळांमधे तर सर्व सर्वदेवांसहवर्तमान अच्युतरुपाने तो आहे यात शंका नाही. हा वृक्ष  मूर्तिमान विष्णूच आहे. महात्मे या वृक्षाच्या पुण्यमय  मुळांची सेवा करतात. याचा ,गुणयुक्त व कामना पूर्ण करणारा आश्रय मनुष्याच्या हजारो पापांचा नाश करणारा आहे.

श्रीगुरुचरित्रातील ३९ व्या अध्यायात याचे वर्णन आले आहे.  नारदमुनींना या वृक्षाचे वर्ण सांगण्याची विनंती केली असता ते म्हणतात

ब्रह्मा सांगे आम्हांसी ! अश्वत्थमुळी आपण वासी ! मध्ये वास हृषीकेशी ! अग्रीं रुद्र वसे जाणा  !!
शाखापल्लवीं अधिष्ठानीं ! दक्षिण शाखे शूलपाणि ! पश्चिम शाखे विष्णु निर्गुणी ! आपण उत्तरे वसतसें !!
इंद्रादि देव परियेसीं ! वसती पूर्वशाखेसी ! इत्यादि देव अहर्निशी ! समस्त  शाखेशी वसती जाणा !!
गोब्राह्मण समस्त ऋषि ! वेदादि यज्ञ परियेसीं ! समस्त मूळांकुरेसी !  असती देखा निरंतर !!
समस्त नदीतीर्थें देखा ! सप्त - सागर लवणादिका ! वसती जाणा पूर्व शाखा !  ऐसा अश्वत्थ वृक्ष जाणा !!
 -----------------------------------------------------------------------------------------------------
 अवांतरः -




अवांतरः -
   (   काही दिवसापुर्वी   मुंबई सेंट्रलवरून राजधानी सुटायच्या आधी   पिंपळाचा वृक्ष रेल्वे लाईन वर पडला . तो वृक्ष बाजूस करण्यासाठी जेंव्हा  कामगार आले तेंव्हा त्यांनी  पिंपळ पाहून त्यास नकार दिला  . अन्य धर्मीय कामगाराकडून काम करवून गाडी उशीराने मार्गस्थ झाली. )


No comments:

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या