|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
श्री
गणेशाय नमः ॥ घरोघरी स्वामीकीर्तने । नित्य होती ब्राह्मण - भोजने ।
स्वामीनामाची जप ध्याने अखंडित |
चालती
॥१॥ दिगंतरी गाजली ख्याती । कामना धरोनी चित्ती । बहुत लोक दर्शना येती ।
अक्कलकोट नगरात |
॥२॥
ब्राह्मण क्षत्रिय वैश्यादिक । शूद्र आणि अनामिक । पारसी यवन भाविक । दर्शना
येती धावोन...ी ॥३॥ |
यात्रेची
गर्दी भारी । सदा आनंदमय नगरी । साधु संत ब्रह्मचारी । फकीर संन्यासी येती पै
॥४॥ किती वर्णावे |
|
महिमान
। जेथे अवतरले परब्रह्म । ते नगरी वैकुंठधाम । प्रत्यक्ष भासू लागली ॥५॥ असो ऐशा
नगरात । |
|
शंकरराव
प्रवेशत । आनंदमय झाले चित्त । समाधान वाटले ॥६॥ यात्रेची झाली दाटी । कैशी होईल
स्वामीभेटी |
।
हे चिंता उपजली पोटी । मग उपाय योजिला ॥७॥ जे होते स्वामीसेवक । त्यात सुंदराबाई
मुख्य । |
|
स्वामीसेवा
सकळिक । तिच्या हस्ते होतसे ॥८॥ तियेची घेउनी गाठी । शंकरराव सांगती गोष्टी ।
करोनी द्याल |
स्वामी
भेटी । तरी उपकार होतील ॥९॥ व्याधी दूर करावी म्हणोनी । विनंती करला स्वामीचरणी
। तरी |
|
आपणा
लागोनी । द्रव्य काही देईन ॥१०॥ बाईसी द्रव्यलोभ पूर्ण । आनंदले तियेचे मन ।
म्हणे मी इतुके करीन |
।
दोन सहस्त्र रुपये द्याल की ॥११॥ ते म्हणती बाईसी । इतुके कार्य जरी करिती । तरी
दहा सहस्त्र रुपयांसी । |
|
देईन
सत्य वचन हे ॥१२॥ बाई विस्मित झाली अंतरीं । ती म्हणे हे सत्य जरी । तरी उदक
घेऊनी करी । |
|
संकल्प
आपण सोडावा ॥१३॥ शंकरराव तैसे करिती । बाई आनंदली चित्ती । म्हणे मी
प्रार्थुनिया स्वामीप्रती । |
कार्य
आपुले करीन ॥१४॥ मग एके दिवशी यती । बैसले होते आनंदवृत्ति । शंकरराव दर्शन.
घेती । भाव चित्ती |
विशेष
॥१५॥ बाई स्वामींसी बोले वचन । हे गृहस्थ थोर कुलीन । परी पूर्वकर्मे यालागून ।
ब्रहमसमंध पीडिती |
॥१६॥
तरी आता कृपा करोनी । मुक्त करावे व्याधीपासोनी । ऐसे ऐकता वरदानी । समर्थ
तेथोनी उठले ॥१७॥ |
चालले
गावाबाहेरी । आले शेखनुराचे दर्ग्यावरी । शंकररावही बरोबरी । त्या स्थळी पातले
॥१८॥ |
|
यवनस्मशानभूमीत
। आले यतिराज त्वरित । एका नूतन खाचेत । निजे छाटी टाकोनी ॥१९॥ सेवेकरी |
|
शंकररावासी
। म्हणती लीला करुन ऐसी । चुकविले तुमच्या मरणासी । निश्चय मानसी धरावा ॥२०॥
काही |
शंकररावासी
। म्हणती लीला करुन ऐसी । चुकविले तुमच्या मरणासी । निश्चय मानसी धरावा ॥२०॥
काही |
वेळ
गेल्यावरी । उठली समर्थांची स्वारी । शेखनुराचे दर्ग्यावरी । येउनी पुढे चालले
॥२१॥ शंकररावे तया |
|
दिवशी
। खाना दिधला फकिरासी । आणि शेखनूर दर्ग्यासी । एक कफनी चढविली ॥२२॥ मग काही
दिवस |
लोटत
। स्वामीराज आज्ञापित । बारीक वाटूनी निंबपत्र । दहा मिरे त्यात घालावी ॥२३॥ ते
घ्यावे हो औषध । |
तेणे
जाईल ब्रह्मासमंध । जाहला स्वामीराज वैद्य । व्याधी पळे आपणची ॥२४॥ स्वामीवचनी
धरुनी भाव । |
औषध
घेती शंकरराव । तयासी आला अनुभव । दहा दिवस लोटले ॥२५॥ प्रकृतीची आराम पडला ।
राव गेले |
स्वनगराला
। काही मास लोटता तयाला । ब्रह्मसंमधे सोडिले ॥२६॥ मग पुन्हा आनंदेसी । दर्शना
आले |
|
अक्कलकोटासी
। घेउनी स्वामीदर्शनासी । आनंदित जाहले ॥२७॥ म्हणती व्याधी गेल्यानंतर । रुपये
देईन |
दहा
सहस्त्र । ऐसा केला निर्धार । त्याचे काय करावे ॥२८॥ महाराज आज्ञापिती ।
गावाबाहेर आहे मारुती । |
|
तेथे
चुनेगच्ची निश्चिती । मठ तुम्ही बांधावा ॥२९॥ ऐशिया एकांत स्थानी । राहणार नाही
कोणी । ऐसी |
|
विनंती
स्वामीचरणी । कारभारी करिताती ॥३०॥ परि पुन्हा आज्ञा झाली । मठ बांधिला
चुनेगच्ची । कीर्ती |
शंकररावाची
। अजरामर राहिली ॥३२॥ अगाध स्वामीचरित्र । तयाचा न लगेची पार । परी गंगोदक
पवित्र । |
अल्प
सेविता दोष जाती ॥३३॥ श्रवणी धरावा आदर । तेणे साधती इहपरत्र । जे झाले
स्वामीकिकर । विष्णू |
शंकर
वदिती त्या ॥३४॥ श्री स्वामीसमर्थचरित्रसारामृत । नाना प्राकृत कथा संमत । सदा
परिसोत भाविक |
भक्त
। नवमोऽध्याय गोड हा ॥३५॥ ॥ श्री स्वामीराजार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥ |
|
|
No comments:
Post a Comment