यापुढे नवस करायचे/ फेडण्याचे उपाय सांगताना पंडीत/ ज्योतिषांनी विशेष ध्यान दिले पाहिजे.
' नवरा_माझा_नवसाचा ' मधील उपाय हा इतिहासजमा होणार आहे.
मेष  राशीत ,अश्विनी या केतूच्या नक्षत्रातील 'गुरु' ने वस्त्र-संहितेचे नियम बनविण्यासाठी  चालना दिली आहे हे नक्की
मोठमोठी देवस्थाने, मोठमोठे नियम लावून  अंमलबजावणी करतीलच, प्रश्ण आहे तो तुलनेने लहान, छोट्या गावातील मंदिरांचा. महत्वाच्या कामाला निघताना किंवा गुरुवार,शनिवार,सोम-मंगळवारी, किंवा विशिष्ठ दिवशी  आँफीसला जायच्या आधी देवळात जाताना वेळ वाचावा म्हणून केवळ शूज काढून 'मोजे' न काढताच आपण अनेकजण देवळात जातोय. हे ही थांबवले पाहिजे. 
ठाण्याला स्टेशनजवळ असणाऱ्या
 ' स्वामी समर्थांच्या मठात ' मोजे न घालून येण्याबाबत उल्लेख आहे. असा उल्लेख इतर ही काही ठिकाणी आढळला
थोडक्यात
"मौज आणि मोजे " बाहेर ठेऊनच मंदिरात यावे
असा  एखादा फलक/ नियम  सर्व मंदिरात लावायला हरकत नाही.
  देवाचिया द्वारी
 पूर्ण वस्त्रधारी
 तेणे दर्शन भारी
 साधकाला !!
 गोविंदाय नमो नम :🙏🙏🌷
 #देवा_तुझ्या_द्वारी_आलो
जेष्ठ शु. एकादशी 
३१/५/२३
 
No comments:
Post a Comment