Whatsapp वरील जोतिष समूहावर सुरु केलेले सादर इथे संग्रहित स्वरूपात ठेवत आहे
---------------------------------------------------------------------------------------
मोरया
🏼
नमस्कार मंडळी
🏼, आपल्या या जोतिष समुहामधे चर्चेसाठी सध्या वाचत असलेल्या जोतिष संबंधी पुस्तकातील उपयुक्त माहिती संकलित करून ठराविक कालावधीत द्यायचा विचार करत आहे. जेणेकरून आपण सगळे एखाद्या नियमावर चर्चा करु, इतरांचे अनुभव ही वाचू.
तर आज १३ मे २०१७ ला बुधाच्या *जेष्ठा* नक्षत्रावर याची सुरवात करत आहे. असं म्हणतात की बुध ग्रह हा पुनरावृत्तीचा कारक ग्रह आहे ( याबाबतीतही जाणकारांची मते वाचायला आवडतील) तसेच बुध हा लेखनाचा ही कारक ग्रह आहे, म्हणूनच पुस्तक प्रकाशन, लेखन इ गोष्टी बुधाच्या नक्षत्रावर कराव्यात जेणेकरून ती ( चांगली ) गोष्ट परत परत घडेल आणी एकंदर पुस्तकाचा, लेखनाचा TRP. वाढण्यास मदत होईल.
जेष्ठा नक्षत्रावर धान्यमळणी, राज्याभिषेक, शपथविधी, नवीन कार्यकारिणी जाहीर करणे, शस्त्रांना धार लावणे, युद्धाचीपुर्व तयारी करणे- इ. गोष्टी करतात
या नक्षत्रावर वस्तू हरवल्यास पश्चिम दिशेस शोधावी परंतु ती सहसा सापडत नाही
(संदर्भ: नक्षत्रे आणि जोतिष - मधुसुदन घाणेकर)
(संदर्भ: नक्षत्रे आणि जोतिष - मधुसुदन घाणेकर)
बुध, जेष्ठा नक्षत्र, लेखन या वर समुहातील इतर मंडळींच्या माहितीचे स्वागत
🏼
(क्रमशः)

No comments:
Post a Comment