प्रभावी तोडगे - लग्न जमण्यासाठी


१ ) लग्न  न जमणा-या मुलीवरुन  तिला दाखवण्याच्या आदल्या दिवशी  किंवा  शनिवारी  तुरटी ओवाळून  विस्तवावर टाकावी
असे तीन शनिवार करावेत
याने दुष्ट  नजरेने  जर विवाहात अडथळे येत असतील  तर नाहिसे  होतात व विवाह चांगल्या ठिकाणी जमतो.


 २) काही उपयुक्त मंत्र / स्तोत्र

" देवकीनन्दन गोपाल वासुदेव जगत्पते !
देहि मे तनयं , कृष्ण त्वां अहम् शरणं गतः !!


" देवन्द्राणि  नमस्तुभ्यं  देवेन्द्र प्रिय भामिनी !
विवाह , सौख्य , आरोग्यं , पुत्र लाभं च देहि मे !!



३)  मंगळ दोषामुळे विवाह जमण्यास अडथळा येत असल्यास  'मंगलचंडिका स्तोत्र ' नित्य पठण करावे

४)  उमामहेश्वर स्तोत्र   / पार्वती स्तुती  - अविवाहीत मुलींसाठी  


५) अविवाहीत मुला मुलींनी त्रिपुरारी पोर्णीमेला श्री कार्तिकस्वामींचे दर्शन घेणे.  यावर्षी  २८ नोव्हेंबरला ही पोर्णीमा असून  दुपारी २.४१ पर्यंत  कृतिका नक्षत्र आहे.  या वेळेच्या आत दर्शन घेणे चांगले.

६)  विवाह उत्सुक  मुलींनी शुक्रवारी  देवीला  वेणी किंवा गजरा अर्पण करणे. असे ५ शुक्रवार करणे

७)  विवाह उत्सुक मुलांनी  पुढील मंत्र  नेहमी जपत रहावा

"ॐ पत्नी मनोरमां देहि मनोवृत्तानुसारिणीं
तारिणीं दुर्ग संसार सागरस्य कुलोद्भवाम् "


मुलींनी पार्वती मंत्र  नेहमी म्हणावा
" ॐ   हे  गौरी शंकरार्धांगी यथात्वं शंकरप्रिया
तथा मां  करु कल्याणी  कान्तकान्ता  सुदुर्लभाम "


( संदर्भ : - कल्याण मित्र  श्री रमेश तांबे यांच्या सोपे अनुभविक तोडगे यातून साभार )

No comments:

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या