August 4, 2011

बत्तीस शिराळा - नागपंचमी उत्सव


सांगली जिल्हाच्या पश्चिमेला असलेल्या वाळवा तालुक्यातील हे खेडे गाव नागपंचमीच्या उत्सवासाठी प्रसिध्द होते. काळाच्या ओघात काही अनिष्ट पध्द्ती बंद करत असताना बत्तीस शिराळ्यातील एक वैशिष्ठपुर्ण उत्सवाची पार रया गेली आहे.

पुणे - बेंगलोर महामार्गावर कोल्हापुर कडे जाताना, पेठ नाका ( इस्लामपुर ) पासुन उजव्या बाजुला एक फाटा फुटतो. इथुन साधारण २० कि.मी वर बत्तीस शिराळा वसलेले आहे. सांगली जिल्हातील हा एकमेव प्रदेश जो निसर्गाने समृध्द आहे. बत्तीस शिराळ्या पासुन जवळच चांदोली अभयआरण्य, चांदोली धरण आहे. अशा या निसर्गाच्या कुशीत वसलेले हे बत्तीस शिराळा गाव.

जेंव्हा पुर्वी हा उत्सव शिराळ्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जायचा तेंव्हा नागपंचमीच्या एक महिना अगोदर येथील नाग मंडळे नाग पकडायच्या मोहिमेला निघत असत. हातात लांब काठी आणि नागाला ठेवण्यासाठी मडके असा लवाजमा घेउन ५-६ तरुणांचा ग्रुप मोहिम फत्ते करत असे.. पकडलेल्या नाग, साप, धामणी यांची नागपंचमी उत्सव संपेपर्यंत योग्य प्रकारे काळजी घेतली जाई
नागपंचमी दिवशी गावातील ग्रामदेवतेची पुजा करुन साधारणपणे १००-१२५ नागांची एकाच वेळी मिरवणुक काढली जाई. त्यानंतर नागाचे खेळ आयोजीत केले जात. सर्वात उंच फणा काढणारा नाग, सर्वात लांब नाग पकडलेल्या मंडळाना बक्षिसे देत असत. नागपंचमीस नागाचे खेळ पाहण्यासाठी हजारो नागरीक येत असत. यातील आणखी एक वैशिष्ठ म्हणजे २ वर्षाच्या बालाकापासुन ते म्हातार्‍या माणसांपर्यंत सर्वजण न घाबरता गळ्यात नाग/धामण घालुन फोटो काठत असत
शिराळ्याची नागपंचमी पुर्वी देशातच नव्हे तर परदेशातही प्रसिद्ध होती. नागपंचमीसाठी पुर्वी लाखभर लोक जमायचे. परंतु, सापांचे होणारे हाल पाहून येथील निसर्ग व वन्यजीवपेमींनी थेट मुंबई हायकोर्टात धाव घेतली. कोर्टाने वन्य जीव संरक्षण कायद्यानुसार २००२ मध्ये आदेश देऊन सापांना पकडणे, त्यांचा खेळ करणे तसेच मिरवणूक काढणे, प्रदर्शन करणे, त्यांच्या स्पर्धा भरवण्याला बंदी केली. तसेच या आदेशाचे तंतोतंत पालन करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासन, जिल्हा कोर्ट, वन खाते आणि पोलिसांवर सोपविली. त्यामुळे काही वर्षांपासुन इथे आता प्रतिकात्मक मिरवणुक काढली जाते.

No comments:

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या