August 24, 2015
August 20, 2015
श्री गणेश पूजा - ध्वनिफीत
येत्या १७ सप्टेंबरला श्री गणेश चतुर्थी आहे . आजकाल गणपतीची प्राण - प्रतिष्ठापणा करण्यासाठी गुरुजी मिळणे अवघड झाले आहे. ही अडचण लक्षात घेऊन पूजेची ध्वनिफीत डाउनलोड करून घेण्याची सोय देत आहे
August 19, 2015
महाराष्ट्र भूषण - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
महाराष्ट्र भूषण - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना विनम्र
ब. मो. पुरंदरे यांनी आपल्या ‘महाराज’ या चरित्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज या ‘अवतारी पुरुषाचे’ शौर्य, पराक्रमाचे वर्णन एका ओजस्वी अशा काव्यातून केलेले आहे. ते म्हणतात-
कोण तू रे, कोण तू?
कालिकेचे खड्ग तू? की इंदिरेचे पद्म तू?
जानकीचे अश्रू तू? की उकळता लाव्हाच तू?
खांडवातील आग तू? की तांडवातील त्वेष तू?
वाल्मीकीचा श्लोक तू? की गायत्रीचा मंत्र तू?
भगिरथाचा पुत्र तू? की रघुकुलाचे छत्र तू?
मोहिनीची युक्ती तू? की नंदिनीची शक्ती तू?
अर्जुनाचा नेम तू? की गोकुळीचे प्रेम तू?
कौटिलाची आण तू? की राघवाचा बाण तू?
वैदिकांचा घोष तू? की नीतीचा उद्घोष तू?
शारदेचा शब्द तू? की हिमगिरी नि:शब्द तू?
की सतीचे वाण तू? वा मृत्यूला आव्हान तू?
शंकराचा नेत्र तू? की भैरवाचे अस्त्र तू?
की ध्वजाचा रंग तू? वा बुद्धीचा श्रीरंग तू?
कर्मयोगी ज्ञान तू? की ज्ञानियांचे ध्यान तू?
चंडिकेचा क्रोध तू? की गौतमाचा बोध तू?
तापसीचा वेष तू? की अग्नीचा आवेश तू?
मयसभेतील शिल्प तू? नवसृष्टीचा संकल्प तू?
द्रौपदीची हाक तू? प्रलयंकराचा धाक तू?
गीतेतला संदेश तू अन् क्रांतीचा आदेश तू!
संस्कृतीचा मान तू अन् आमुचा अभिमान तू!
संकलीत
August 17, 2015
August 12, 2015
August 10, 2015
आजचे पंचांग
श्री गणेशाय नम :
श्री रामेश्वर प्रसन्न
दिनांक १०/८/२०१५
वार : सोमवार
शालिवाहन शक १९३७,( विक्रम संवत २०७१)
संवत्सर नाम : मन्मथ
मास(महिना) : आषाढ
पक्ष : कृष्णपक्ष
तिथी : एकादशी ( १६:४६ पर्यंत )
पक्ष : कृष्णपक्ष
तिथी : एकादशी ( १६:४६ पर्यंत )
चंद्रनक्षत्र : मृगशीर्ष ( १९:०१ पर्यंत ) नंतर आर्दा
चंद्र राशी : मिथुन
सूर्य राशी : कर्क
गुरु(बृहस्पती) राशी : सिंह
चंद्र राशी : मिथुन
सूर्य राशी : कर्क
गुरु(बृहस्पती) राशी : सिंह
राहू काल: ०७:३० ते ९:००
आजचा दिवस सर्वांना सुखाचा जावो
------------------------------ ------------------------------
धार्मिक स्तोत्रे , मंत्र , अध्याय आणि इतर धार्मिक माहिती साठे अवश्य भेट द्या
August 8, 2015
Subscribe to:
Posts (Atom)