मंडळी, दिल्लीला जनपथ रोडवर आज मोठी लगबग असणार आहे. आज शनिवार, अनुराधा नक्षत्र ( शनीचे नक्षत्र) चंद्र वृश्चिक राशीत असताना युवराजांचा पक्षीय अध्यक्ष म्हणून राज्याभिषेक होत आहे.
आता पुढचे लिखाण *मुहूर्त बघणे म्हणजे कसा भंपकपणा आहे वगैरे मानणारे आणी असे टुकार मेसेज वेळोवेळी Whatsapp किंवा इतर सोशल मिडीयावर पुढे ढकलणाऱ्यांसाठी*
तर आजच्या अध्यक्ष पदाची सूत्रे घेण्याआधी या माऊलीने आपल्या मुलाची पत्रिका जोतिषाला नक्कीच दाखवली असणार आणी माझ्यामते त्यांनी आजचा योग्य दिवस निवडला आहे.
राजकारणाचा कारक ग्रह शनी आहे.आज त्याचा वार आणी अनुराधा नक्षत्र स्वामी या नात्याने शनी दिवसभर रुलिंग मधे आहे.
साधारण पणे एखादा चांगला दिवस बघण्यासाठी रोजच्या चंद्राचे भ्रमण लक्षात घेतात. मुळ पत्रिकेतील शुभ स्थानातून त्या दिवशीचा चंद्र जात असेल तर तो दिवस उत्तम मानतात
आज चंद्र वृश्चिक राशीत आहे आणि युवराजांच्या पत्रिकेत वृश्चिक रास लाभस्थानात आहे. अर्थात लाभस्थान हे पत्रिकेतील एक चांगले स्थान आहे.
शास्त्र कारांनी प्रत्येक नक्षत्रावर काय करावे हे लिहून ठेवले आहे. आज अनुराधा नक्षत्र, या नक्षत्रावर राज्याभिषेक करताता ( पक्षाच्या अध्यक्षपदाचा भार स्वीकारणे हा एक प्रकारचा राज्याभिषेकच)
खाली पुस्तकातील लिखीत स्वरूपातील माहिती दिली आहे 👇🏻
तर निवडणुकीपूर्वी ' देवा तुझ्या द्वारी आलो' म्हणणारे पदग्रहण करण्यासाठी ही जर चांगला दिवस/ मुहूर्त बघायला लागले असतील तर तो तमाम भारतवर्षासाठी
युवराजांना पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐आणि ' देवा तुझ्या द्वारी आलो' या अनुदिनी कडून एक प्रेमळ भेट 🎁
बाकी आमच्या देवळात कधीही दर्शनाला या
kelkaramol.blogspot.in
📝( अभ्यासू) अमोल
१६/१२/१७