November 10, 2018

लक्ष्मी पूजन आणि विपर्यास

*लक्ष्मी पूजन आणि विपर्यास*

मंडळी,  गेले काही दिवस Whatsapp वर एक फोटो सगळीकडे फिरतोय. तुम्ही पण पाहिला असेलच. एक नवरोबा आपल्या बायकोला लक्ष्मी पूजनाच्या दिवशी ओवाळतोय आणि दोन विनोदाच्या स्माईली.

या वर माझ्या जे मनात आलय ते लिहितोय. प्रत्येकाचे मत वेगळे असू शकेल

तर पहिला आक्षेप विनोदी स्माईलिंना. कारण हा विनोद म्हणून पाठवला असला तरी यातील आशय चांगला आहे.
( पण अर्थातच प्रत्येक वेळेला हिंदू धर्माच्या चालीरीतींवर चेष्टेच्या स्माईली/ विनोद पाठवणे हा आता नवीन रीतिरिवाज रुढ होतो आहे ही शरमेची गोष्ट)

तर आता चित्राचा आशय.
नवरोबा, घरची पूजा करुन नंतर आपल्या बायकोला पण ओवाळत आहेत. या मागची भावना माझ्यामते आज मी इथपर्यंत यशस्वी झालो ते तुझ्या सहकार्याने, तुझ्या पाठिंब्याने किंवा माझी जी भरभराट झाली आहे, व्यवासायात / नोकरीत यश मिळाले आहे,  श्रीमंती आली आहे ती तुझ्याच पायगुणाने  ( नशिबावर विश्वास नाही पण बायकोच्या पायगुणांवर आहे).
 तेंव्हा तूच माझी 'गृहलक्ष्मी' म्हणून मी तुझे 'औक्षण' करत आहे
 
👆🏻हा विचार म्हणून चांगला आहे यात शंका नाही. पण म्हणून लक्ष्मी पूजनाला बायकोला  लक्ष्मी समजून  ओवाळणे हा अंमळ परंपरेचा विपर्यास वाटतो / विडंबन वाटते.
आम्ही कसे आधुनिक,  जुन्या परंपरा कशा बुरसटलेल्या आहेत हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न.

एखादी गोष्ट आवडली नाही पटली नाही, पर्यावरण पुरक नसेल, नासाडी होत असेल तर करु नका. उदा. सत्यनारायण करणे, दहीहंडीचे मनोरे लावणे , फटाके फोडणेे,  रंगपंचमी पाणी वाया घालवणे, डाॅल्बी वाजवणे, आपट्याची पाने देणे, आणि हो देवाला लाडू चढवणे इ.इ

पण निदान ज्या चालीरीती,  परंपरा म्हणून आहेत त्याचा विपर्यास तरी नको जो इथे या फोटोत दिसतो.

गृहलक्ष्मीला ( बायकोला) घरातील निर्णय घेताना मानाचे स्थान द्या, तिचे मत जाणून घ्या, तिला घरकामात मदत करा , स्वातंत्र्य द्या पण ही कसली लक्ष्मी पूजनाचा दिवशी तिलाच ओवाळायची वैचारिक घालमेल 
( इथे मुद्दाम दिवाळखोरी हा शब्द वापरलेला नाही)

आता समजा एखाद्याच्या दुर्दैवाने एखाद्याची परिस्थिती नाजूक झाली असेल, आर्थिक विवंचना असेल, कर्जे झाली असतील, नुकसान झाले असेल.  अशावेळी तो बायकोला ओवाळेल का?
तर अशा परिस्थितीत दोघांनी मिळून 'लक्ष्मी पूजन' करुन,  देवतेला स्मरून पुढील वाटचाल अधिक जोमाने करणे योग्य ठरणार नाही का?

 आपल्या धर्मात ज्या काही रीतीरिवाज , परंपरा आहेत ना त्यात नवी नवरी घरी आली की 
" लक्ष्मी पूजन" ( दिवाळीतले नव्हे) करतातच. 

त्यानंतर दोघांनी मिळून संसार करता करता अनेक चालीरीती , रितीरिवाज( जसे पाडवा, हरतालिका, वटपोर्णीमा, मंगळागौर इ इ) सांभाळत पुढे जायचे असते.
हे आमच्या आधुनिक  नारायणरावांना कळणार आहे का? 

नारायणी नमोस्तुSते 🙏🏻🌺
९/११/१८

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या