October 24, 2020

गीतरामायणातील निवेदन 📝-भाग ६

.गीतरामायणातील निवेदन 📝-भाग ६
#दसरा विशेष 
---------------------------
"आज का निष्फळ होती बाण?'

- श्रीरामासारख्या समर्थ वीराच्या तोंडचे हे उद्गार ऐकून,इंद्रसारथी मातली किंचित् हंसला आणि म्हणाला,"प्रभो, असे न समजल्यासारखे काय बोलतां? त्याच्या वधाकरितांं पितामहास्त्राचा प्रयोग करा. देवांनी जो रावणाच्या मृत्यूचा काल सांगून ठेवला आहे,तो आता समीप आला आहे."

मातलीच्या ह्या भाषणाने श्रीरामांना जणू स्मरण आलें आणि अगस्ती ऋषींनी दिलेला दैदीप्यमान् बाण त्यांनी धनुष्याला लावला. आकर्ण प्रत्यचा ओढून त्यांनी तो बाण 🏹 महाप्रतापी रावणाच्या दिशेने सोडला. तो दु:सह आणि प्रत्यक्ष मरणाप्रमाणे अनिवार्य असलेला बाण,रावणाच्या वक्ष:स्थलांत जाऊन घुसला. त्याने रावणाचे हृदय शतश: विदीर्ण करुन टाकले. बाणाचा प्रहार होताच,जीविताला मुकणा-या त्या रावणाच्या हातून धनुष्यबाणहि खाली पडले.तो महातेजस्वी राक्षसपति भूमीवर कोसळला. राक्षससैन्य वाट फुटेल तिकडे धावत सुटलें. वानरांनी त्यांचा विध्वंस मांडला. सारे वानरगण, "रावण मेला, रामाचा जय झाला," असे म्हणत आनंदाने नाचू लागले. अंतरिक्षातून देवांच्या सौम्य नौबती वाजू लागल्या. रामाच्या रथावर स्वर्गातून पु्ष्पवृष्टि होऊं लागली. अप्सरा आणि गंधर्व यांचे विजयगीत कानीं येऊं लागले.

*देवहो, बघा रामलीला*
*भूवरी रावणवध झाला*
🙏🏻🌷

क्रमश:
----------------------------------------
देवा तुझ्या द्वारी आलो🙏🏻🌺
गीतरामायण  गाण्याआधी सादर झालेल्या निवेदनाची ही क्रमशः मालिका 
प्रभू श्रीरामचरणी अर्पण 🙏🏻🚩
----------------------------------------




 

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या