July 27, 2021
July 23, 2021
July 22, 2021
July 20, 2021
आषाढी एकादशी
दिंड्या नव्हत्या, पालख्या नव्हत्या
जयघोष नव्हता नामाचा
मार्गावरच्या दगड-धोंड्याना
स्पर्शही नव्हता पावलांचा
वर्तुळातून धुळ न उधळली
रिंगणातल्या अश्वांची
चलबिचलता तशी जाहली
वारक-यांच्या श्वासांची
कमरेवरती हात ठेऊनी
'श्रीहरी' पाहतोय हे सगळं
पुढल्या वेळी मात्र देवा,
काहीतरी घडू दे रे वेगळं
'अवघी दुमदुमदे पंढरी
'अवघा होऊ दे एक रंग'
हेची दान देगा बा विठ्ठला
पांडुरंग, पांडुरंग ,पांडुरंग
🙏🌷🙏🌷🙏🌷
📝 २०/०७/२१
आषाढी एकादशी
"देवा तुझ्या द्वारी आलो"
July 19, 2021
July 17, 2021
July 16, 2021
July 15, 2021
July 14, 2021
July 13, 2021
July 12, 2021
July 11, 2021
July 10, 2021
July 9, 2021
July 8, 2021
July 7, 2021
July 6, 2021
July 4, 2021
July 3, 2021
July 2, 2021
शुभ्र बुधवार व्रत
."शुभ्र बुधवार व्रत"
आपल्याकडे काही प्रापंचिक हेतू पूर्ण करण्यासाठी काही अनुभवसिद्ध उपाय / व्रत सांगितले आहेत. ब-याचदा ते सोपे वाटतात पण करायला गेलं की कळतं सोपे नाहीत. उदा. अमावस्येनंतर येणा-या द्वितीयेला ' चंद्र दर्शन ' हा धनप्राप्तीचा एक प्रकार सांगितला आहे. ' अरे यात काय फार मोठं आहे, घेऊ दर्शन ' असं ठरवून ही शु. द्वितीयेच्या चंद्राचे दर्शनही सोxपी गोष्ट नाही हे अनेकांनी अनुभवलं असेलच.
धनप्राप्तीसाठीचा आणखी एक उपाय सविस्तर इथे देत आहे. इच्छूकांनी अवश्य करावा.
हा उपाय मुद्दाम आज शुक्रवारी देत आहे. याची दोन कारणे आहेत. सगळ्यात महत्वाचे आणि मुख्य कारण म्हणजे आज बुधाचे 'रेवती' नक्षत्र आहे.
दुसरे आज देण्यास कारण की हे वाचून ज्यांना 'शुभ्र बुधवार व्रत ' करायचे आहे त्यांना तयारी साठी ( मनाच्या ) थोडा वेळ मिळेल
व्रतविधी:-
११ पांढरे बुधवार करणे हा बुध उपासनेचा महत्वाचा भाग आहे.या दिवशी उपवास ठेवावा व उपवासाचे फक्त पांढरेच पदार्थ खावेत. तसेच हे पदार्थ पूर्णपणे अळणी करावेत म्हणजे त्यात तिखट- मीठ अजिबात घालू नयेत. पहिल्या बुधवारी जो पदार्थ खाल तोच पदार्थ पूर्ण अकरा बुधवारी खावा.
या व्रतात पांढऱ्या रंगाचे महत्व फार आहे. महत्वाची गोष्ट अशी की बुधवार हा महालक्ष्मीचा खास वार आहे. महालक्ष्मीची पूजा ही बुधाची पूजा म्हणून करावयाची असते.
बुधवारी प्रात: काळी उठून नित्यकर्मे उरकावीत. नंतर जमीन सारवून अथवा फरशी असल्यास स्वच्छ पुसून त्यावर पाट मांडावा. पाटावर तांदूळ पसरून त्यावर कलश ठेवावा तसेच पाटाभोवती रांगोळी काढावी.कलशावर श्रीलक्ष्मीची मुर्ती/ तसबीर ठेवावी व शेजारी बुधाची मूर्ती अथवा चित्र ठेवावे.
" श्री लक्ष्मी देव्यै नम: " या मंत्राने श्री लक्ष्मीची पांढरी फुले वाहून पूजा करावी.देवीला दूध - साखर या पांढऱ्या वस्तूंचाच नैवेद्य दाखवावा.पूजा करताना मन एकाग्र व भक्तिपूर्ण ठेवावे.
बुध हा वाचेचा ग्रह असल्याने त्या दिवशी जरूरीपेक्षा जास्त बोलू नये. त्यादिवशी आचरण अत्यंत शुध्द ठेवावे. दिवसभर पांढरीच वस्त्रे नेसावीत. संध्याकाळी लक्ष्मीची पूजा करुन उपवास सोडावा.उपवास सोडताना तिखट- मीठ न घातलेला दहीभात अथवा ताकभात खावा.
सकाळ संध्याकाळ देवीची पूजा झाल्यावर आरती म्हणून बुधाचा हा मंत्र म्हणून प्रार्थना करावी
बुधं त्वं बुद्धीजनको बोधद: सर्वदा तृणाम्!
तत्वावबोधं कुरुषे सोमपुत्र नमो नम:!
🙏🌼
उद्यापन: १२ व्या बुधवारी व्रताचे उद्यापन करावे. सुवासिनीला जेवावयास बोलवावे. जेवणात पक्वान्न म्हणून दुधातील गव्हल्यांची अथवा शेवयांची खीर करावी. स्वयंपाक आखणी न करता नेहमी सारखा करावा. सुवासिनीला पांढरे कापड, पांढ-या फुलांची वेणी, दक्षिणा द्यावी.
हे व्रत करताना अनेक अडचणी येतात, मनस्ताप होतो, तरीही श्रद्धेने व निष्ठेने हे व्रत पूर्ण करावे. हे व्रत म्हणजे एक तपश्चर्याच असल्याने ती पूर्ण झाल्यावर तिचे इष्ट फळ मिळतेच.
व्रत करताना स्त्रियांना अडचण आल्यास तो बुधवार जमेस न धरता पुढचा धरावा.
विद्याप्राप्तीसाठीही श्री गणपतीचे ११ बुधवार करतात. या व्रताने श्रीगणपती बुधाच्या रुपात प्रसन्न होतात व विद्येतीस भरभराट होते.
माहिती: 'श्री शुभ्र बुधवार व्रतकथा' पोथीतून साभार 📝
२ जुलै २०२१
'रेवती' नक्षत्र
दिनविशेष - २ जुलै
सिध्दयोगी स्वामी राम - जन्मदिवस
पाश्चात्य वैज्ञानिकांना आपला आणि आपल्या क्षमतांचा अभ्यास करू देण्यास परवानगी देणार्या मोजक्या योग्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. १९६०च्या दशकात मेनिंगर क्लिनिकमधील वैज्ञानिकांना त्यांनी आपली तपासणी करण्यास अनुमती दिली. हृदयाची गती, रक्तदाब, शरीराचे तापमान नियंत्रित करणार्या प्रक्रिया अनैच्छिक (व्यक्तीच्या ताब्यात नसणार्या) मानल्या जातात; स्वामी रामांचे या प्रक्रियांवर नियंत्रण कसे आहे याचा अभ्यास मेनिंगर क्लिनिकमधील वैज्ञानिकांनी केला.
फकिरप्पा हलक्टी - जन्मदिवस
July 1, 2021
निघालो घेऊन संतांची पालखी
.निघालो घेऊन 'संतांची पालखी' 🚩
महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचा अभूतपूर्व सोहळा म्हणजे अनेक संत महात्म्यांच्या दिंडी आषाढी एकादशी साठी पंढरपूर कडे प्रस्थान होणे. जिथून पालखी निघते ते ठिकाण आणि पंढरपूरला पोहोचायला लागणारे दिवस यानुसार पालखी प्रस्थानाची " तिथी " ठरलेली असते.
त्यानुसार आज संत तुकाराम महाराजांची पालखी देहू मधून निघायचा तिथीप्रमाणे दिवस.
त्याच्या दुस-या दिवशी निघते देहू पासून जवळच असणा-या आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी.
तसेच महाराष्ट्रातील अनेक प्रमुख पुण्यभूमीतून जसे शेगाव, नाशिक, सज्जनगड इथून निघालेल्या पालख्या पंढरपूर कडे त्या त्या तिथीला निघतात आणि आषाढी एकादशीच्या आधी सुनियोजित वेळेत पोहोचतात.
वारकरी भक्तांची मनस्थिती जणू
मागे पुढे अवघा दिसे रिता ठाव
ठेवूनि पायी भाव वाट पाहे!
अशी होते.
अनेक वर्षाची ही परंपरा. लहान मुले खेळायला बाहेर पडली की, एकमेकांना भेटल्यावर जसे आनंदित होतात तसेच हे भक्त ही
खेळ मांडियेला, वाळवंटी घाई
नाचती वैष्णव भाई रे!
विठूरायाच्या गजरात हे सगळे इतके रममाण होतात की त्यांचा
क्रोध अभिमान गेला पावटणी
एक एका लागतील पायी रे !
सगळ्यांच्या उद्देश एकच,
जाऊ देवाचिया गावा
घेऊ तेथेचि विसावा!
देवा सांगे सुख दु:ख
देव निवारील भूक!
हाच विश्वास वारक-यांना पुरेसे ठरतो पुढच्या आयुष्याच्या वाटचालीसाठी
मुंबईतील डबेवाल्यांचे जसे मँनेजमेंट उत्तम तसेच या दिंडीचेही. व्यवस्थापनाचा उत्तम नमुना इथेही दिसून येतो
देहू, आळंदीच्या दिंड्या या पुण्यापासून दोन वेगळ्या मार्गाने पंढरपूरला पोहोचतात. हे मला महाबळेश्वरला उगम पावलेल्या कृष्णा - कोयना जशा वेगळ्या मार्गाने निघून कराडला जसा त्यांचा 'प्रिती संगम' होतो अगदी तसे वाटते.
कृष्णा कोयना - भगिनी
तुकोबा- ज्ञानेश्वर - बंधू
प्रिती- भक्ती संगमाचे खूप छान उदाहरण यात बघायला मिळते.
इतर पालख्या यात सामील होणे म्हणजे इतर नद्या कृष्णा- कोयनेला मिळण्यासारखे
"भेटी लागे जीवा, लागलीस आस"
अशी अवस्था होऊन जेंव्हा माऊलीच्या भेटीचा क्षण येतो तेंव्हा सगळ्यांना अगदी धन्य झाल्यासारखे वाटते.
आणी शेवटी उरते ते नतमस्तक होणे
काय तुझे उपकार पांडुरंगा
सांगो मी या जगामाजी आता!
जतन हे माझे करोनि संचित
दिले अवचित आणूनियां !
घडलिया दोषांचे न घाली भरी
आली यास थोरी कृपा देवा!
नव्हते ठाऊकें आइकिलें नाही
न मागता पाही दान दिले!
तुका म्हणे याच्या उपकारासाठी
नाही माझें गाठी काहीं एक!
//
'मानस पूजे' सारखी यंदाही परिस्थितीमुळे आषाढीपर्यत 'मानस वारी ' करावी लागतीय. हरकत नाही तरीपण
'विठ्ठल आवडी प्रेमभावो " 🚩🙏🌺
देवा तुझ्या द्वारी आलो 📝
ज्येष्ठ कृ. सप्तमी
१ जुलै २०२१
www.kelkaramol.blogspot.com
Subscribe to:
Posts (Atom)