यमुना झाली व्याकुळ..
देवकीनंदनाच्या आगमनाने
अवघे आनंदले गोकुळ
लहानपणापासून श्रीहरींच्या अनेक लीला आणि समृध्द गोकुळाची अनेक वर्णने आपण वाचली आहेत. याचा थोडा तरी अनुभव घ्यायचा असल्यास गोंदवले इथे काकड आरतीला उपस्थित रहायचे.
नित्य आरतीत म्हणले जाणारे हे पद गायचे 👇🏻 अन लोण्याच्या गोळ्याचा प्रसाद तळहातावर घेऊन इथल्या 'गोकुळी' रंगून जायचे
तू खाय बा साखर लोणी !
माझिया बाळा! तू खाय बा साखर लोणी !
नव लक्ष गोपाळ गडी! वाट पाहती यमुनास्थळी !
मिळूनी मेळा! तू खाय बा साखर लोणी !
बाळ मुकुंद खातो लोणी! कौतुक पाहे नंदराणी!
भरुनी डोळा! तू खाय बा साखर लोणी !
भानुदास विनंती करी! प्रसाद द्यावा मज श्रीहरी!
त्रिभुवनपाळा ! तू खाय बा साखर लोणी !
" गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा " 🙏🪷
देवा तुझ्या द्वारी आलो
श्रीकृष्ण जन्माष्टमी
१८/०८/२२ 📝