एखादा सिनेमा, त्यातील एखादी पंच लाईन डोक्यात अशी फिट्ट बसते की बस रे बस!
नुकत्याच आलेल्या सिनेमातील एक वाक्य जाम फिट बसलय. 👇🏻
"सवाल ये नही की, आपकी आँखो के सामने क्या है, सवाल ये है की
आप देख क्या रहो हो" 🧐
सिनेमाची सुरवात एका स्वगताने होते त्यातील मला भावलेल्या या दोन ओळी.
अनेक मोटिव्हेशनल सेमिनार, व्यक्तीमत्व विकास शिबीरं, OBT टेक्नॉलॉजी वगैरे शिकताना अगदी कुठेही हे लागू पडेल.
ज्योतिषशास्त्राचा विचार केला तर हे वाक्य म्हणजे
'ज्योतिष शास्त्राची गुरूकिल्ली ' असं म्हणले तर चुकीचे ठरू नये.
गेली अनेक वर्ष वेगवेगळ्या माध्यमातून ज्योतिषाचा अभ्यास करत असताना, वेगवेगळ्या पुस्तकात दिलेली माहिती वाचताना, यू-ट्यूबवरचे विविध विषयांवरचे व्हिडिओ पाहताना अनेक मान्यवर अभ्यासक, शिक्षक, लेखकांनी हे ब-याचदा या आधीच सांगितले आहे. ज्योतिषाला पत्रिका पाहताना एक खास दृष्टी पाहिजे. नामवंत ज्योतिषी व.दा भट यांनी तर त्यांच्या अनेक पुस्तकात वेळोवेळी एक उल्लेख केलाय तो म्हणजे ज्योतिषांना 'पत्रिकेतील निर्णायक घटक' ओळखता आला पाहिजे.
समोर असणाऱ्या चौकोनाच्या १२ भागात, १२ राशी आणि त्यात वेगवेळ्या ठिकाणी किंवा काही वेळा काहीजण मिळून एकत्रीत येणारे असे एकंदर १२ ग्रह हे पत्रिकेचे दिसणारे "दृष्यम " स्वरूप.
हे सगळं तुमच्या समोर आहे पण इथे अनेक 'अदृष्यम गोष्टी ' ज्या पत्रिकेचा निर्णायक घटक ठरू शकतात त्या शोधण्यासाठी योग्य दृष्टी आणि तेवढा अभ्यास असणे आवश्यक.
समुद्रातल्या लाटांशी आपला संबंध आपण जेवढा वेळ समुद्रात असतो तेवढाच असतो. एकदा तेथून बाहेर आलो की आपला लाटांशी संबंध संपला. पण म्हणून लाटा थांबत नाहीत. तसंच प्रत्येक क्षणी नवीन पत्रिका तयार होत असते त्या प्रत्येक क्षणाच्या पत्रिकेचा अभ्यास करणे निव्वळ अशक्य. समुद्रांच्या लाटांप्रमाणे निर्माण झालेल्या पत्रिकेतून आपल्या कडे मार्गदर्शनासाठी पत्रिका येणे यामागे अर्थातच नियतीचीच योजना असणार
अशा आलेल्या जातकांना मात्र योग्य न्याय देणे हे जमलं पाहिजे
यासाठी परत परत आपली तयारी वाढवायची आणि पत्रिकेच्या अदृष्यम गोष्टी, निर्णायक घटक शोधण्याचा प्रयत्न करायचा. त्यासाठी वरची पंच लाईन कायम लक्षात ठेवायची
( अभ्यासू) अमोल केळकर
विनायक चतुर्थी ( मार्गशीर्ष)
२७/११/२२ 📝
No comments:
Post a Comment