December 11, 2009

ने मजसी ने परत मातृभूमीला

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेल्या ' ने मजसी ने परत मातृभूमीला , सागरा प्राण तळमळला.. ' या काव्याला १० डिसेंबरला शंभर वर्षे पूर्ण झाली.

हे अप्रतीम गाणे इथे पहा।




ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा , प्राण तळमळला
भूमातेच्या चरणतला तुज धूतां । मी नित्य पाहिला होता
मज वदलासी अन्य देशिं चल जाऊ । सृष्टिची विविधता पाहू
तइं जननी-हृद् विरहशंकितहि झालें । परि तुवां वचन तिज दिधलें
मार्गज्ञ स्वयें मीच पृष्टि वाहीन । त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनी । मी
जगदनुभव-योगे बनुनी । मी
तव अधिक शक्त उध्दरणी । मी
येइन त्वरें कथुन सोडिलें तिजला । सागरा , प्राण तळमळला
शुक पंजरिं वा हरिण शिरावा पाशीं । ही फसगत झाली तैशी
भूविरह कसा सतत साहु यापुढती । दशदिशा तमोमय होती
गुण-सुमनें मी वेचियली ह्या भावें । कीं तिने सुगंधा घ्यावें
जरि उध्दरणी व्यय न तिच्या हो साचा । हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता । रे
नवकुसुमयुता त्या सुलता । रे
तो बाल गुलाबही आता । रे
फुलबाग मला हाय पारखा झाला । सागरा , प्राण तळमळला
नभि नक्षत्रें बहुत एक परि प्यारा । मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परी मज भारी । आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य , मज प्रिय साचा । वनवास तिच्या जरि वनिंच्या
भुलविणें व्यर्थं हें आता । रे
बहु जिवलग गमतें चित्ता । रे
तुज सरित्पते । जी सरिता । रे
तद्विरहाची शपथ घालितो तुजला । सागरा , प्राण तळमळला
या फेन-मिषें हससि निर्दया कैसा । का वचन भंगिसी ऐसा
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते । भिउनि का आंग्लभूमीतें
मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी । मज विवासनातें देशी
तरि आंग्लभूमी-भयभीता । रे
अबला न माझिही माता । रे
कथिल हें अगस्तिस आता । रे
जो आचमनी एक पळीं तुज प्याला । सागरा , प्राण तळमळला

November 26, 2009

अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन






श्री दत्त ज्योतिष विद्यालय, मुंबई यांच्या विद्यमाने दादर येथे रविवार दि. २४ जानेवारी २०१० रोजी ' ज्योतिष -अध्यात्म व साधना ' या विषयावर एक दिवसाचे अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन आयोजित करण्यात येत आहे। सदर अधिवेशनामध्ये खालील मान्यवरांची विविध विषयांवर व्याख्याने होणार आहेत.

१) रामायण व महाभारतकालीन ग्रहस्थिती - डॉ. प. वि. वर्तक
२) ज्योतिष व साधना - विद्या वाचस्पती, श्री. आदिनाथ साळवी
३) कर्म सिध्दांत व नियतीचे संकेत - श्री. विजय हजारी
४) ज्योतिष व अंधश्रध्दा निर्मुलन - श्री. संजय उपाध्ये ( प्रवचनकार )


तसेच याप्रसंगी श्री.विजय हजारी लिखित , 'भाव नवमांश रहस्य' या महान ग्रंथाच्या सुधारीत आवृत्तीचे प्रकाशन करण्यात येणार आहे।

या अधिवेशनासाठी प्रवेश फी रु. ३५०/- आहे. इच्छुकांनी या रकमेचा चेक / डी.डी V. D. HAJARI यांच्या नावाने १० डिसेंबर पुर्वी मिळेल अशा बेताने खालील पत्त्यावर पाठवावा.
V. D. HAJARI
FLAT NO 403, GOD'S GIFT 'A' WING CO-OP. HSG. SOCIETY,
N.M.JOSHI MARG, ( NEAR MATHURDAS MILL COMPOUND ),
LOWER PAREL ( WEST ) , MUMBAI - 400013

अधिक माहितीसाठी श्री वरदविनायक यांच्याशी ९८२०५३०११३ या नंबरावर संपर्क साधू शकता।


धन्यवाद
अमोल केळकर







November 11, 2009

विश फॉर्म्यूला

मॅजीशीयन हे टॅरो कार्ड मधील एक महत्त्वाचे कार्ड आहे. मॅजीशीअन म्हणजे जादुगार. जादुगार आपल्या कृतीने / क्लूप्तीने आश्चर्य कारक गोष्टी करुन दाखवतो जी सर्वसामान्य माणसे करु शकत नाहीत.
हे कार्ड जेंव्हा रिडिंग मधे येते तेंव्हा काही आश्चर्यकारक गोष्टी घडवून आणण्याची क्षमता आपल्यात आहे असे दर्शवले जाते. खालील एक विश फॉर्म्यूला (WISH ) लक्षात घेण्या सारखा आहे.
W - ( Will Power ) - इच्छा शक्ती
I - Information - माहिती
S - Set Purpose - ध्येय निश्चिती
H - Hard work - कष्ट चेण्याची तयारी




वरील विश फॉर्म्यूला वापरुन आपल्यातील जादुगार कुठलीही अशक्य गोष्ट पुर्णत्वास नेतो.

November 10, 2009

यंदा कर्तव्य नाही


स्टार माझा या वाहिनीचा लग्नाच्या मुहुर्तांसंबंधीचा हा व्हिडीओ। यात असे म्हणले आहे की या वर्षी लग्नाचे फक्त ४१ मुहुर्त आहेत. गुरु शुक्र अस्त तसेच अधिक मास यामुळे असे आहे. अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पहा.

November 6, 2009

सचिन अभिनंदन !


एकदिवशीय क्रिकेटमधे १७,००० धावांचा टप्पा पार केल्याबद्दल लादक्या सचिनचे अभिनंदन. आपला आवडता प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलिया विरुध्द त्याने ही कामगिरी केली आहे. भारतीय संघाचा विजय झाला असता तर आणखी आनंद झाला असता.


सचिनला त्याचा पुढील वाटचालिस अनेक शुभेच्छा !



October 15, 2009

धन्वंतरी आणी टेंम्परन्स टॅरो कार्ड

धन्वंतरी हा देवांचा वैद्य आहे. समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृताचा कुंभ घेऊन आला होता. आज धनत्रयोदशी या दिवशी धन्वंतरीची पुजा केली जाते।

टॅरो डेक मधे ही टेम्परन्स हे मेजर कार्ड आरोग्याशी संबंधीत आहे. आजारी व्यक्तीच्या संबंधीत हे कार्ड रिडींग मधे आल्यास आजारात सुधारणा होणे दर्शवते. तसेच समतोलपणा राखणे हे ही या कार्डाचे वैशिष्ठ आहे.










आपणास दीपावलीच्या हार्दीक शुभेच्छा

अमोल केळकर

October 3, 2009

नवीन युती / दोस्ताना

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्याने सध्या सर्वत्र चांगलेच वातावरण तापले आहे.. सर्वच पक्षात बंडखोरी झाली आहे. जुने शत्रू आता मित्र झाले आहेत. नवनवीन आघाड्या / युत्या केल्या जात आहेत. बेरजे बरोबरच वजाबाकीचे ही राजकारण सुरु झाले आहे.
या सर्व गोष्टींशी संबंधीत टॅरो डेक मधील ३ ऑफ कप हे कार्ड आहे. नवीन दोस्ती करणे/ जुळणे. नवीन ओळख वाढवणे, समारंभ इ. गोष्टी हे कार्ड दर्शवते।

September 25, 2009

व्हॉटस युवर राशी ?

व्हॉटस युवर राशी ? आप की राशी क्या है?




माणसाने कितीही म्हणले की माझा भविष्यावर विश्वास नाही तरीही पुढे घडणार्‍या घटनांबाबत माणसाला उत्सुकता ही असतेच. मजा म्हणुन का होईना माणुस भविष्य पाहतोच. भविष्यविषयाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहतो।



श्री. शरद उपाध्दे यांच्या 'राशीचक्र' या कार्यक्रमाला अभुतपुर्व प्रतिसाद मिळाला. यातील प्रत्तेक राशीची वैशीष्ठे सांगून, मजेशीर उदाहरणे देऊन उपाध्दे साहेब प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी झाले. आपल्या राशी बद्दल काय काय रोचक माहिती सांगितली जात आहे किंवा आपल्या राशीची काय गुण्/अवगुण आहेत हे पाहण्यासाठी सर्वच राशीचे लोक कार्यक्रमाला उपस्थित राहू लागले आणि कार्यक्रम यशस्वी झाला.
सध्या हिंदीत ही अशीच एक थीम घेऊन एक सिनेमा येत आहे ' व्हॉटस युवर राशी ? '. अर्थात राशीचक्रा प्रमाणे हा सिनेमा देखील चांगला चालेल हे सांगायला कोण्या भविष्यवेत्त्याची गरज आहे का ?



टॅरो कार्ड मधे देखील प्रत्तेक १२ राशी दर्शवणारी १२ कार्डे आहेत. ती खालील प्रमाणे. त्या प्रत्तेक कार्डाचे गुण/ माहिती त्या त्या राशील अगदी योग्य प्रकारे लागू होते.

मेष ----------वृषभ------------ मिथून







कर्क ------------सिंह -----------कन्या




तुळ------------- वृश्चिक ------------धनु




मकर ------------कुंभ -----------मीन

September 8, 2009

सांगली / मिरजेतील जातीय दंगल -

सध्या सांगली आणि मिरज परिसरात राजकीय हेतूने प्रेरीत दंगा चालू आहे. सगळे राक्षस एकमेकांचे नुकसान करण्यात गुंतले आहेत जणू काही डेवीलच यांच्यात संचारला आहे.

टॅरो कार्ड मधील डेव्हील हे कार्ड हे सर्व स्पष्ट करते।

सरकारच्या प्रबळ इच्छाशक्तीने आणि सर्वच राजकीय पक्षांच्या सहकार्याने हा अशांततेचा डेव्हील लवकरात लवकर नष्ट होऊ दे हीच प्रार्थना


जय भवानी ! जय शिवाजी !!


September 7, 2009

श्री. भाऊसाहेब पडसलगीकर यांचे निधन

सांगलीतील जेष्ठ बुध्दीबळ प्रशिक्षक श्री भाऊसाहेब पडसलगीकर यांचे आज दु:खद निधन झाले।
त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली।

देशातील अनेक उत्तोमत्तम बुध्दीपळपटू बनवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.
सांगलीतील नुतन बुध्दीबळा तर्फॅ आयोजीन करण्यात येणारी बुध्दीबळ स्पर्धा थोड्याच कालावधीत देशातील एक नामांकीत स्पर्धा म्हणून ओळखली जाऊ लागली। अनेक नामांकीत खेळाडू या स्पर्धेत हजेरी लावत असत.


अत्यंत शिस्तप्रिय, निर्व्यसनी, कुशल संघटक व प्रशिक्षक असणारे भाऊसाहेब पडसलगीकर हे सांगलीचे एक मोलाचे भूषण होते.



August 22, 2009

गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा !

हे गजानना, अवघ्या देशावर असणारे दुष्काळ, महागाई, स्वाईन फ्लू चे संकट दूर होऊ दे !!




July 7, 2009

गुरुविण कोण दाखविल वाट

आज गुरुपोर्णीमा. आयुष्याच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीत ज्यांनी इथंपर्यंत येण्याचे बळ दिले त्या सर्वांबद्दल याप्रसंगी आदर व्यकत करतो.

गुरुविण कोण दाखविल वाट
आयुष्याचा पथ हा दुर्गम, अवघड डोंगर-घाट

अजाणता मी पथिक एकटा
झांजड पडली, लपल्या वाटा
अवतीभवती किर्रर्र दाटले काटेबन घनदाट
दिशा न कळती या अंधारी
नसे आसरा, नसे शिदोरी
कंठ दाटला आले भरुनी, लोचन काठोकाठ
क्षणभंगुर हे जीवन नश्वर
नेतिल लुटुनी श्वापद तस्कर
ये श्रीदत्ता सांभाळी मज, दावी रूप विराट


June 8, 2009

परिस्थितीचा गुलाम - ८ ऑफ स्वॉर्ड. कार्ड

आपण बर्‍याचदा जेंव्हा वाईट परिस्थितीत सापडतो आणि त्यावेळेला आपल्या हातात फार कमी पर्याय असतात ( त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी ) त्यावेळी ८ ऑफ स्वॉर्ड. हे कार्ड हमखास रिडिंग मधे येते।

' परिस्थितीचा गुलाम होणे ' , स्वातंत्र्य नसणे असा अर्थ ही हे कार्ड सुचवते। चित्रात दाखवल्याप्रमाणे अशी व्यक्ती सर्वबाजूनी बंधनात, हात पाय बांधलेले अशी असते की ती मुक्तपणे स्वातंत्र्य उपभोगू शकत नाही. अशा परिस्थितीत अगदी लहान सहान गोष्टीत ही मनस्ताप होतो।



solutions are not always easy, but they exist. इच्छाशक्ती असेल तर यातूनही आपण बाहेर येऊ शकतो यासाठी आवश्यक्ता आहे ती अंतीम ध्येय स्पष्ट करण्याची आणि त्यासाठी पहिले पाऊल उचलण्याची.
जाता जाता - कृष्णमुर्ती ज्योतीष पध्दतीत ८ वे स्थान हे मनस्तापाचे स्थान मानले आहे. टॅरो कार्ड मधील ८ नंबरची चारही कार्डे ( ८ ऑफ वॉन्ड, ८ ऑफ कप, ८ ऑफ स्वॉर्ड, ८ ऑफ पेन्टॅकल ) या ना त्या प्रकारे मनस्तापच दर्शवतात.

June 5, 2009

शिवराज्याभिषेक दिन -

आज ५ जून शिवशक ३३६ जेष्ठ शुध्द त्रयोदशी म्हणजेच शिवराज्याभिषेक दिन. यानिमित्याने
रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा !!


यानिमित्याने महाराष्ट्रातील तमाम नेत्यांनी सध्या होत असलेले जातीपातीचे, निवडणूक डोळ्यापुढे ठेवून करत असलेले राजकारण थांबवावे आणि एकजुटीने महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रयत्न करावेत अशी इच्छा व्यक्त करतो.

शिवराज्याभिषेक दिनाचे डेरवण येथील हे एक सुंदर शिल्प

June 1, 2009

राणीला ८० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !!

आज आपल्या सर्वांची लाडकी '' दख्खनची राणी ' ' ८० व्या वर्षात पदार्पण करत आहे।आज सकाळी पुणे रेल्वे स्थानकावर झालेल्या एका समारंभात नेहमी प्रवास करणार्‍या प्रवाशांनी इंजीनाची पुजा करुन आणि केक कापून 'राणीला' शुभेच्छा दिल्या.

आमचे मित्र श्री. अमेय पासलकर यांनी आजच्या समारंभाची काढलेली ही काही चित्रे।

------------------------------------------------------------------------------------


-----------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------------- या गाडीची काही वैशिष्ठे

१) भारतीय रेल्वेच्या इतिहासातील एक प्रतिष्ठीत गाडी
२) पहिले आय। एस. ओ. नामांकन मिळवणारी गाडी
३) खान पान सेवा आणि महिलांसाठी वेगळा डबा देणारी पहिली गाडी
४) पुणे - मुंबई मार्गावरील सर्वात जलद गाडी ( अंतर कापण्यास लागणारा वेळ ३।१५ मिनिटे )


या गाडीचे आणखी एक वैशिष्ठ म्हणजे मध्य रेल्वेचा एखादा इंजीन ड्रायवर जेंव्हा निवृत्त होणार असतो त्यावेळी त्याच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी त्याला ही गाडी चालवण्याचा बहुमान दिला जातो।

अशा या आमच्या लाडक्या राणीला ' वाढदिवसाच्या शुभेच्छा '






May 28, 2009

खा. प्रतीक पाटील यांचे अभिनंदन

सांगलीचे नवनिर्वाचित खासदार श्री। प्रतीक पाटील यांना नवीन मंत्रीमंडळात राज्यमंत्रीपदाचा. बहूमान मिळणार आहे.

त्यांचे हार्दीक अभिनंदन

वसंतदादांचे नातू असलेले श्री. प्रतीक पाटील यांनी दादांनी घालून दिलेल्या विकासाच्या मार्गावर यशस्वी वाटचाल करावी या त्यांना शुभेच्छा।
एक सांगलीकर म्हणून या घटनेचा विशेष आनंद झाला आहे. मॅनेजमेंटचे शिक्षण घेत असताना २००० साली 'प्रकाश अ‍ॅग्रो ' या कंपनीत प्रोजेक्ट करत असताना श्री प्रतिक पाटलांचा जवळून संबंध आला. त्यावेळी श्री. प्रकाशबाबू पाटील हे त्यांचे वडील खासदार होते. परंतू प्रतीक पाटील यांची साधी रहाणी विशेष लक्षात येत होती. सांगलवाडी सारख्या ठिकाणी उभारलेले या प्रकाश अ‍ॅग्रो प्रकल्पात मँगो पल्प, आणि इअतर फळांचे पल्प तयार करत असत. अत्याधुनीक मशीनरींनी , नवीन टेक्नॉलॉजी उभी करण्यात संचालक म्हणुन प्रतीक पाटील यांची दुरद्रुष्टी दिसून येत होती. या निमित्याने या सर्व आठवणींना उजाळा मिळाला. परत एकदा प्रतीक पाटील यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा.


शुभेच्छुक
अमोल केळकर
साखर कारखाना, सांगली
९८१९८३०७७०

May 25, 2009

जागतीक टॅरो दिवस



२५ मे हा दिवस जगभर जागतीक टॅरो दिवस म्हणून साजरा केला जातो. जगभरातील असंख्य टॅरो संस्था हा दिवस उत्साहात साजरा करतात. यानिमित्याने चर्चासत्रे आयोजीत केली जातात.
हा दिवस साजरा करण्याची काही प्रमुख उद्दिष्टे -

1) To promote Tarot's use beyond any public conception of it as 'evil' or Satanic.
2) To promote Tarot uses in honest manner with integrity.
3) To promote the use of Tarot in responsible manner beyond both use as an unsavory monetary "fortune-telling" scheme, as well as use as a crutch by those unwilling to take responsibility for their own future and/or behavior.
4) To promote Tarot use as a tool for self-examination, spirituality, and other self-aide methods of guidance.
5) To have at least one day to celebrate, share, and stimulate our love of the Tarot tool with each other, and to think about what we can 'give' to instead of what we can 'take' from the Tarot Community.

आपल्या कडे मात्र अजून या पध्दतीचा फारसा वापर केला जात नाही. या विषयी काम करणार्‍या संस्था ही फार थोड्या आहेत. तसेच त्या फारशा संघटीत नाहीत. मात्र भारतात टॅरो कार्ड रिडिंग घेणारे खुप जण आहेत. या निमित्याने या सर्वांनी एकत्र येऊन , एकमेकांचे अनुभव शेअर करुन , टॅरो कार्ड पध्दत अधिक लोकप्रिय, अधिक अचुक कशी करता येईल हे पहाणे आवश्यक आके.
मी स्वतः टॅरो कार्ड संबंधीत काम करणार्‍या कुठल्याही संस्थेचा सदस्य नाही. टॅरो कार्ड रिडिंग नियमीत घेणारे किती मराठी लोकं आहेत याची ही कल्पना नाही.
टेरो कार्ड रिडिंग घेणारे / टेरो कार्ड संबंधी संस्थेत काम करणारे कोणी हा ब्लॉग वाचत असतील तर मला जरुर संपर्क करावा. या विषयात काही भरीव काम करायला मला नक्कीच आवडेल. .


जागतीक टॅरो दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा।!!

May 1, 2009

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा !!




गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो ।
स्फूर्ती दीप्तीधृतिही जेथ अंतरीठसो।
वचनी लेखनीही मराठी गिरा दिसो ।
सतत महाराष्ट्रधर्म मर्म मनी वसो ।
देह पडो तत्कारणि ही असे स्पृहा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।

April 1, 2009

टॅरो कार्ड - धाडसीपणा

टॅऱो कार्ड मध्ये फूल नावाचे एक कार्ड आहे. फूल याचा अर्थ आपणा सर्वांस माहित आहे.
१ एप्रिल ह्या दिवशी आपण एकमेकांना फसवतो. आजच्या या एप्रिल फूल निमित्याने टॅरो कार्ड मधील फूल या एका महत्त्वाच्या कार्डा विषयी माहिती।


फूल म्हणजे मुर्खपणा असा जरी अर्थ आपणास अपेक्षित असला तरी टॅरो कार्ड मधे याचा अर्थ धाडसीपणा ( अविचाराने , कमी माहिती असताना केलेला धाडसीपणा ) असा घेतला जातो.
हे कार्ड जेंव्हा रिडिंग मधे येते तेंव्हा प्रश्नकर्ता एकादी कृती अविचाराने करण्याची शक्यता असते.
असे म्हणले जाते की हा तरुण जीवनाच्या प्रवासास निघालेला आहे (न्युमरिक वॅल्यू म्हणूनच या कार्डाची शुन्य आहे ) त्यामुळे हे कार्ड रिडिंग मधे आल्यास नवीन गोष्टींची सुरवात होणे असे ही हे कार्ड दर्शवते। अतीधाडसी वृती ( एक पाउल जरी पुढे पडले तरी कडेलोट होणे ) , स्वच्छंदीपणा असे इतर काही गुण हे कार्ड दर्शवते.

March 27, 2009

शुभेच्छा

गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या सर्वांना हार्दीक शुभेच्छा


March 8, 2009

जागतिक महिला दिन.

८ मार्च जागतिक महिला दिन.
यानिमित्याने आपल्या कार्यक्षेत्रात उत्तुंग यश प्राप्त केलेल्या सावित्रीबाई फुले , मदर टेरेसा, इंदिरा गांधी, कल्पना चावला, मेधा पाटकर, किरण बेदी यांना प्रणाम



March 5, 2009

प्रतिसादा बद्दल धन्यवाद

'भविष्याच्या अंतरंगात ' या माझ्या ब्लॉगवर प्रकाशीत केलेल्या
भविष्य शास्त्रावर तुमचा विश्वास आहे का? या कौलाला २०० पेक्षा अधीक जणांनी आपले मत नोंदवून आपला सहभाग दर्शवला.


या सर्वांचे तसेच प्रतिसाद / मत न देणार्‍यांचे ही मनापासून आभार

आपला
अमोल केळकर

February 22, 2009

७ ऑफ पेन्टॅकल कार्ड-संयमाची जोपासना

ह.अ भावे यांच्या व्यक्तिमत्त्व आणि विकास या लेखमालेतून साभार-
संयमाची जोपासना -



काळ जरी कठीण असला तरी ईश्वरनिर्मीत या जगात प्रतीक प्रश्नाला उत्तर असतेच.
या कठिण काळावरही इलाज आहे. आणि तो इलाज खात्रीचा आहे. मानवाच्या इतिहासात असे कठीण काळ अनेक वेळा आले.
यावर उपाययोयना फार पुर्वीच सुचवली गेली आहे.ही उपाययोयना अनेक पुस्तकांत सापशेल. ती उपाययोजना बायबल मधे आहे,
ग्रंथसाहेबात आहे, वेद -उपनिषदात आहे, भगवद्दगितेत आहे. हे उपाय कालातीत व सार्वत्रिक आहेत. हे उपाय शेकडो वर्षे साठवले गेलेल्या
शहाणपणातून लिहिले गेले आहेत. परिस्थिती प्रत्तेक काळात वेगवेगळी असली तरीही हे उपाय चिरस्थायी आहेत.श्रीकृष्णाने अर्जुनाला कर्म्योगाचा
उपदेश केला, त्या उपदेशाचा उपयोग अर्जुनाला झाला, त्याप्रमाणे आजपर्यंतच्या पिढीलाही झाला. लोकमान्य टिळकांना गीतेत कर्मयोग सापडला.
शेकडो पिढ्या बदलल्या तरीही भगवदगीतेचे दीपगृह लोकांना प्रकाश दाखवतच आहे.
अर्जुनाच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता त्या वेळी अर्जुनाने श्रीकृष्णाला दुस-य़ा अध्यायात विचारले,’बुध्दी स्थिर झालेला स्थितप्रण्य कसा असतो? कसा राहतो?
कसा बोलतो? यावर श्रीकृष्णाने अर्जुनाला दुस-या अध्यायात पंचान्नव्या श्लोकापासून बहात्तराव्या श्लोकापर्यंत उत्तर दिले आहे.
या सर्व उत्तरात संयम कसा पाळावा, आपल्या आत्म्यावर विजय कसा मिळवावा, हेच सांगितले आहे. माणसामध्ये जो आत्मा असतो, ते परमात्म्याचेच प्रतिबिंब असते
माणसाचे शरीर नष्ट पावते पण कपडे बदलावे त्याप्रमाणे आत्मा दुसरे शरीर धारण करतो.
स्थितप्रद्न्य आणि संयमी माणूसच आत्मा आणि परमात्मा यांचे ऐक्य प्रस्थापित करु शकतो. म्हंणूनच मानवी जीवनामध्ये स्थितप्रद्न्येला आणि संयमाला फार महत्व आहे.
संयम धोरण म्हणून स्विकारा




संयम या एका शब्दात शांतता, सहनशीलता, आध्यात्मिकता , श्रध्दा इत्यादी अनेक शब्द भरलेले आहेत. संयम हा शब्द रत्नासारखा आहे. संयम पाळल्याने तुम्हाला
अनेक गुण बाळगता येतील. तुमचं स्वत:चं जगण्याचं तत्वद्न्यान त्यातून तयार होईल. सध्याचा काळ गोंगाटाचा व गोंधळाचा आहे. त्यातून ज्याला प्रगती करुन घ्यायची
आहे त्याला संयमाशिवाय तरणोपाय नाही.
संयम हा शब्द तुमच्या जीवनात मुरला पाहिजे, संयम हे तुम्ही धोरण म्हणून स्वीकारले पाहिजे. तरच सध्याच्या कठीण काळात तुम्हाला सुखाने जगता येईल.
तुम्ही आजचा दिवस उत्तम घालवा म्हणजे तुमचे आयुष्य सुखात जाईल. ’आजचा दिवस चांगल्या प्रकारे घालवा’ हा संदेश गौतम बुध्दाने दिला होता
बुध्दाने सांगितले होते, की ’या जगात आज दिसणारे निसर्गसौंदर्य, मैत्री भावन्न, उदात्त विचार, स्फूर्ती या जीवनातील अमोल गोष्टी आहेत.’उद्याची काळजी न करता
आजचा दिवस सुंदर जगा हीच शिकवण सर्व धर्मांनी दिली आहे. उद्याची चिंता परमेश्वरावर सोडा
.

February 14, 2009

टॅरोट कार्ड नं ६ - लव कार्ड

दाटून आलेल्या संध्याकाळी

अवचित ऊन पडतं

तसंच काहीसं पाऊल न वाजवता

आपल्या आयुष्यात प्रेम येतं - सुधीर मोघे



१४ फेब्रुवारी व्हॅलेन्टाईन दिवस . - प्रेमाचा उत्सव

आपल्याकडे ही अजाकाल हा उत्सव विविध प्रकारे साजरा केला जातो. बर्‍याच कॉलेजात रोझ डे, चॉकलेट डे अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम केले जातात. याच वेळी काही विद्यार्थी संघटना विरोध करतात. प्रेमाच्या संदेशाने बाजार सजतो, नटतो, गुलाबी रंगाने वातावरण भरुन जाते।



असो
टॅरो कार्डात एक मेजर कार्ड ( नंबर ६ ) लव कार्ड म्हणून आहे.
हे कार्ड अर्थात रिलेशनशीप बद्दल आहे.
प्रेम प्रकरण, लग्न , नवीन मैत्री यासंबंधी प्रश्नाबाबत हे कार्ड रिडिंग मधे हमखास सापडतेच.


जाता जाता या जागतीक प्रेम दिनाच्या सर्वांना शुभेच्छा

February 9, 2009

कार्तिकीचे अभिनंदन !!!

माहेराहुनि गलबत आले
मला सखीचे स्वप्न जडे;
हृदयामधल्या गुपितामध्ये
निशिगंधाचे फूल पडे!
अंतर्ज्ञानी युगांप्रमाणे
शब्द परतले घरोघरी;
जडबंधाच्या मिठीत रुसली
चैतन्याची खुळी परी...
या वाटेवर रघुपति आहे
त्या वाटेवर शिळा;
सांग साजणी कुठे ठेवु मी
तुझा उमलता गळा?

सारेगम लेटीलचॅम्प स्पर्धेत अंतीम फेरीत विजयी ठरलेल्या कार्तिकी गायकवाड हिचे अभिनंदन.
भविष्यातील तिच्या संगीत कारकिर्दीस अनेक शुभेच्छा !!!!
ही तिच्या आयुष्यातील एक नवी सुरवात आहे ( एस ऑफ वॉन्ड ) . या स्पर्धेने तिला एक चांगली सुरवात मिळवून दिली आहे.
अजुन बराच मोठा पल्ला गाठायचा आहे। माउलीचे आशीर्वाद तिच्या पाठी सतत राहोत.




February 3, 2009

१० ऑफ कप टॅरो कार्ड -

या टॅरो कार्डाचा अर्थ आहे कौटूंबीक आनंदाचे वातावरण, उत्साह असा आहे.
यासंबंधी वपुर्झातील हा उतारा वाचण्यासारखा आहे.

जो तुमचा आनंद वाढवतो, तो धर्म.
आयुष्य एक सतारीसारखं वाद्य आहे.
ती सतार वाजवण्याचं सामर्थ्य आणि कला अवगत करुन घेणं, हाच धर्म.
तो धर्म समजला तर छोट्या बीजातून प्रचंड वृक्ष जन्माला येतो.
त्यावर पक्षी येऊन बसतात. गातात. त्यांचे संसार बहरतात.पैशाशिवाय. पक्ष्यांचं धन वेगळंच असतं.
गाणं हेच त्यांचं आयुष्यभरचं कार्य.
पक्षी पिल्लांसाठी घरं बांधतात.
स्वतः वळचणीखाली राहतात. मला सांगा,
एक तरी पक्ष्याची हाऊसिंग सोसायटी आहे का ?
तसं असतं तर झाडाझाडांवर राजीव, संजय, इंदिरा नावाच्या
अनधिकृत कॉलनीज दिसल्या असत्या.
बघा, असं होतं. 'पक्ष्यांचा' हा शब्द वापरल्याबरोबर मी भरकटले.'पाखरु' म्हणायला हवं होतं
पाखरं घरं बांधतात पिल्लांसाठी,
पिल्लाला मुक्त आकाश खुलं झालं की
घर आपण होऊन काटक्या टाकतं.
म्हणून झाडंही नोटिसा पाठवत नाहीत.
मनाचा हा मोठेपणा झाडं जमिनीपासून शिकतात आणि पावसाचा वर्षा करुन
आकाश जमिनीवर प्रेमाचा अभिषेक करतं
सृष्टीतलं हे नातं ओळखता आलं, की सतार
योग्य हातात पडली, असं समजावं. हाच धर्म.
- व.पु. काळे

January 22, 2009

मॅट्रीक्स सिनेमा आणि टॅरो कार्ड

कालच एक व्हिडिओ पहाण्यात आला. तो इथे देत आहे. आपल्या पैकी बर्‍याच जणांनी हा सिनेमा पाहिला असेल. यातील काही प्रसंग, व्यक्तीरेखा घेऊन टॅरो कार्डातील २२ महत्त्वाची/ मेजर कार्डस समजावून सांगितली आहेत.
अगदी चफखल पणे प्रतेक कार्ड आणि प्रसंग गुंफला आहे. आपल्याला ही हा व्हिडिओ नक्की आवडेल.




January 13, 2009

अंदाज अपना अपना







महाराष्ट्रातील असंख्य लोकांच्या आग्रहास्तव तसेच गायन क्षेत्रातील जाणकार परीक्षक , रसिक यांनी केलेल्या आग्रहास्तव काल अत्यंत नाट्यमय पध्दतीने ५ ही लिटील चॅम्पस 'महाअंतीम फेरीत' जाणार हे पल्लवी जोशी ने जाहीर केले आणि सर्वांना अतीशय आनंद झाला.


प्रत्यक्षत मोबाईल कंपन्यांचे हीत लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आला आहे यात शंका नाही. खरं म्हणजे ३ स्पर्धक अंतीम फेरीत असते तर जास्त मजा आली असती . पण आता ३ एवजी ५ स्पर्धक असल्याने या सर्वांचे सगे - सोयरे भरपुर एस एम एस करणार आणि जास्त फायदा मोबाईल कंपनी, प्रायोजक यांना होणार यात सगळे गणित आहे.
यावेळी असंख बक्षीसात विजेत्याला , उपविजेत्याला सेव्हींग सर्टीफीकिट देणार असल्याचे ऐकले। मला वाटते या मुलांच्या दृष्टीने हा खरोखरच एक चांगला निर्णय म्हणावा लागेल. पालकाना याचा उपयोग त्यांचे संगीत करीयर घडवण्यास नकीच
होईल


चित्र सौजन्य - झी मराठी वेबसाईट)

यानिमित्याने मी या महाअंतीम फेरीत पोचलेल्या मुग्धा वैशंपायन, अर्या अंबेकर, कार्तीकी गायकवाड, रोहीत राऊत, प्रथमेश लघाटे या सर्वांचे अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो.
या पंचरत्नातून कोहिनूर कोण ठरतो/ ठरते आहे ही उत्सुकता लागून राहिली आहे. प्रत्तेक जण आपला अंदाज व्यक्त करित असतो. मी माझे मत देणार आहे मुग्धाला.
पाहुया विजयाचे संकेत देणारे ६ ऑफ वॉन्ड हे कार्ड कुणाला विजय मिळवून देतो ते.

January 6, 2009

तारे आणि सितारे

नभांगणातल्या चांदण्या मोजायच्या नसतात. आपल्यावर त्यांचं छत आहे, या आनंदात विहार करायचा असतो. आनंद, समाधान तृप्ती, कृतज्ञभाव, स्नेह या भावनांना तराजू असते तर एव्हाना हे सगळे काळ्या बाजारात गेले असते. त्यांचं स्मगलिंग झालं असतं. इतकंच कशाला, त्याच्यावर इन्कमटॅक्शी बसला असता. मग एकही माणूस साधं हसला नसता. आनंदाच्या उकळ्या दाबून दाबून माणसं फुटली असती. तेव्हा 'नक्षत्रांचं देणं' कधीही चुकवता येत नाही यातच त्यांची उंची. तिथं हात पोहोचू नयेतच. कारण आम्ही माणसांनी, जिथं जिथं आमचे हात पोचले तिथं तिथं स्वतःचे शिक्के उमटवले. त्यापेक्षा अशाच काही अलौकिक चांदण्या, तेजस्वी तारे अवतीभवती वावरतात, तिथं माथा झुकवावा. पण आम्हाला सितारे ओळखायला येतात, तारे नाहीत.
( चित्र सौजन्य। - १ डिसेंबर २००८ चंद्र, शुक्र, गुरु युती )

हे दोन्ही ओळखणं खरं तर सोपं आहे. डोळे उघडल्याशिवाय जे दिसत नाहीत ते सितारे. जे मिटल्यावर दिसतात ते तारे.-

- व.पु. काळे

January 1, 2009

नवीन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा !!

काळ आणि वेळ हे कुणासाठी थांबत नाहीत। या सृष्टीची गती अव्याहत पणे सुरु आहे। परत एकदा आपण सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाच्या स्वागताला सज्ज झालो आहोत .
या वर्षात अनेक बरे वाईट अनुभवांची शिदोरी घेऊन आपण नवीन वर्षात एका नव्या जोमाने पदार्पण करणार आहोत.

हे वर्ष संपता संपता जागतिक मंदी, बेकारी, दह्शदवाद च्या रुपाने नवीन आव्हाने आपल्या समोर उभी राहिली आहेत. लोकसंख्या , जातीयवाद, प्रादेशिक वाद यांचा ही समर्थपणे मुकाबला करावयाचा आहे.

कवी मंगेश पाडगावकर यांच्या या ओळी या प्रसंगी आठवतात-

घावावचुन नसे देवपण
जळल्यावाचुन प्रकाश कोठुन?
अंधार दाटला घोर जरी

हा दीप तमावर मात करी !!





परिस्थिती कधीच कयम रहात नाही. सुखा नंतर दु:ख, दु:खानंतर सुख मिळत असते. व्हील ऑफ फॉर्चून हे कार्ड याचेच प्रतिक आहे. हे कार्ड जेंव्हा रिडिंग मधे येते तेंव्हा नशीब, परिस्थिती तुम्हाला अनुकुल असेल असे दर्शवते.
येणारे नवीन वर्ष आपणास असेच प्रगती करणारे ठरो। सध्याची निराशवादी परिस्थिती बदलून तुमच्या आयुष्यात एका नवीन आशावादी जिवनाची सुरवात होवो।


आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा !!

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या