दि. २४ फेब्रुवारी २०११, श्री गजानन महाराज प्रकट दिन
मराठी विकिपिडीयात मिळालेली काही माहिती
माघ वद्य ७ शके १८०० , २३ फेब्रुवारी १८७८ या दिवशी ऐन तारुण्यात ते शेगांव
जि. बुलढाणा येथे दिगंबरावस्थेत दृष्टीस पडले . त्या वेळी ते देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या शिते उचलून खात होते. ह्या संदर्भात दासगणूंनी लिहिले आहे,
"गण गण गणात बोते," हा त्यांचा आवडता मंत्र, ज्याचा ते अखंड ते जप करीत. किंबहुना, त्यामुळेच त्यांना 'गिणगिणेबुवा' 'गजानन महाराज' अशी नावे पडली. वर्हाडातील भक्त त्यांना प्रेमाने 'गजानन बाबा' म्हणतात. दासगणूंनी ह्या संदर्भात लिहिले आहे, "मना समजे नित्यजीव हा ब्रह्मास सत्यमानू नको तयाप्रतनिराळा त्या तोची असे." ह्या मंत्राचा अर्थ असा आहे की जीव आणि ब्रह्म हे एकच आहेत आणि त्यांना निराळे समजू नये.
आपल्या अवतारकार्यातील ३२ वर्षांचा काळ त्यांनी संपूर्णपणे शेगांवमध्ये व्यतीत केला असला तरीही कारणपरत्वे महाराजांची भ्रमंती अकोला , मलकापूर , नागपूर , अकोट , दर्यापूर , अकोली - अडगाव , पिंपळगाव , मुंडगाव , रामटेक , नांदुरा , अमरावती , खामगाव या विदर्भातल्या प्रमुख भागांतल्या खेड्यापाड्यांतून झालेली आहे . उन्हापावसातून वस्त्रविहीन अवस्थेत भरभर चालणाऱ्या महाराजांची चालगती गाठण्यासाठी त्यांच्या भक्तांना अक्षरश : धावावे लागे .
महाराज आपल्या भक्तांसोबत वारीच्या निमित्ताने दरवर्षी पंढरपूर येथे जात असत . त्याचप्रमाणे नाशिक - त्र्यंबकेश्वर येथेही नित्यनेमाने जात . नाशिक येथील कुशावर्त तीर्थाजवळील निलांबिका देवीचा डोंगर तसेच ब्रह्मागिरी पर्वतावरही ते आवर्जून जात असत. ब्रह्मागिरी पर्वताची उंची छाती दडपून टाकणारी आहे . सर्वसामान्य माणसास तिथे जाण्यापूर्वी दहावेळा विचार करावा लागतो . शे - सव्वाशे वर्षांपूर्वी तर ही स्थाने फारच दुर्गम होती . महाराज मात्र हा संपूर्ण पर्वत चढून जात असत . ब्रह्मागिरी पर्वतावरील गहिनीनाथांची गुंफा आणि निवृत्तीनाथांच्या मंदिराला महाराज आवर्जून भेट देत व तिथे काही क्षण घालवत . नाथसंप्रदायात नवनाथांनी जे चमत्कार केले त्यातलेच काही गजानन महाराजांनीही त्यांच्या अवतार कार्यात केलेले ढळतात
लोकमान्य टिळकांनीही त्यांची भेट घेतली होती. अकोल्यात शिवजयंतीसंदर्भात झालेल्या एका सभेला, टिळकांबरोबर गजानन महाराजही व्यासपीठावर बसले होते. लोकमान्य आणि अमरावतीचे दादासाहेब खापर्ड्यांसमवेत ते अकोल्यातील प्रभू रामचंद्राच्या मंदिरात दर्शनालाही गेले होते.जेव्हा लोकमान्य टिळकांना कैद झाली त्यावेळी महाराजांनी कोल्हटकरांच्या हातून त्यांच्याकरिता भाकरीचा प्रसाद पाठविला आणि भविष्य वर्तवले की टिळकांना शिक्षा अटळ आहे तसेच त्यांना खूप दूरहीलागेल, परंतु ते तुरुंगात मोठी कामगिरी करणार आहेत. महाराजांच्या भविष्यवाणीनुसार ब्रह्मदेशातील मंडालेच्या तुरुंगात टिळकांनी 'गीतारहस्य ही भगवदगीतेवर टीका लिहिली. "गीतेचा अर्थ कर्मपर लावी बाळ गंगाधर त्या टिळकांचा अधिकार वानाया मी समर्थ नसे," अशा स्तुतिपर शब्दात दासगणूंनी टिळकांचा गौरव केला आहे.
काही उपयुक्त संकेतस्थळ ( श्री गजानन विजय चे अध्याय खालील संकेत्स्थळावर मिळू शकतील )
http://balsanskar.com/marathi/lekh/cid_125.html
माघ वद्य ७ शके १८०० , २३ फेब्रुवारी १८७८ या दिवशी ऐन तारुण्यात ते शेगांव
"कोण हा कोठीचा काहीच कळेना ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ति आलीसे प्रचिती बहुतांना "
जसा कुशल जवाहीर कोळशाच्या तुकड्यांमधून अनमोल हिरा शोधून काढतो त्याप्रमाणे बंकटलाल आगरवाल ह्याने त्यांचे महत्त्व ओळखले. त्याला महाराजांचे प्रथम दर्शन झाले ते असे, "दंड गर्दन पिळदारभव्य छाती दृष्टी स्थिरभृकुटी ठायी झाली असे." जेव्हा बंकटलालने त्यांना जेवणाविषयी विचारले त्यावेळी महाराजांनी नुसतेच शून्य दृष्टीने त्याच्याकडे पाहिले. कारण महाराज त्यावेळी तुर्या (जागृति म्हणजे जागे असणे, सुषुप्ति म्हणगे झोपणे आणि स्वप्नावस्था ह्या तीन अवस्थांच्या पलीकडील स्थितीस तुर्या अवस्था अथवा व्रह्मस्थिति अथवा सहजसमाधि असे म्हणतात) अवस्थेत होते. महाराज एक महान आणि असामान्य असे योगी आहेत ह्याची बंकटलालला तत्काळ आणि मनोमन खात्री पटली. त्या महान भक्ताने त्यांचे श्रेष्ठत्व ओळखून त्यांना स्वगृही आणले. जेथे संतांचा वास तेथेच भगवंताचा निवास, ह्या उक्तीप्रमाणे, "बंकटलालाचे घरझाले असे पंढरपूरलांबलांबूनीया दर्शनास येतीलोक ते पावती समाधान," बंकटलालाचे घर भक्तांनी दुमदुमून गेले.