July 2, 2025

मनोहर पादुका - नरसोबावाडी

भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज कृष्णा पंचगंगा संगमावर तपश्चर्येसाठी बारा वर्षे राहिले. त्यानंतर ते गाणगापूरला गेले. जाण्यापूर्वी त्यांनी एका पाषाणावर मनोहर पादुका प्रकटवल्या त्या योगिनींच्या स्वाधीन गेल्या आणि भैरंभट नामक वृद्ध ब्राह्मणास तेथे पूजक म्हणून नेमले. परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या उक्ती नुसार प्रत्यक्ष भगवान दत्तात्रय पादुकांच्या रूपाने तेथे अखंड वास्तव्य करीत आहेत.
 पादुका 'चंद्रकांत' नावाच्या पाषाणावर प्रकटविलेल्या आहेत. अशा पाषाणावर जेव्हा चंद्रकिरण पडतात तेव्हा त्यापासून अमृताचे क्षरण होत असते. भगवान श्री दत्तात्रेय हे सूर्य चंद्राचेच नव्हेत तर सकळ विश्वाचे अधिपती आहेत. त्यामुळे पादुका धारण करणाऱ्या या पाषाणातून नित्य अमृतबिंदूंचे क्षरण होत असते.

श्रींच्या मनोहर पादुकांवर वीस शुभचिन्हे आहेत. वाडी मध्येच होऊन गेलेले श्रेष्ठ पुजारी 'श्रीगुरुभक्त'; म्हणजेच विठ्ठल अपानभट ढोबळे पुजारी यांनी या शुभ चिन्हांची नावे एका आरतीमध्ये दिलेली आहेत.

उभयपादुकांवरील प्रत्येक अंगुलीवर एक एक चक्र आहे. प्रत्येक चक्राखाली तीन उभ्यासमांतर रेषा आहेत. याशिवाय दोन्ही पावलांवर टाचे पासून अंगुलीपर्यंत वक्ररेषा आहेत. उजव्या पावलावर ध्वज, वज्र, अंकुश, स्वस्तिक, छत्र, जम्बुफळ, यव ,अष्टकोन, पद्म आणि गात्र (चाबूक) अशी चिन्हे आहेत.  डाव्या पावलावर त्रिकोण, गोष्पद अर्धचंद्र, धनु, कमंडलू, मत्स्य, शंख, अमृतपात्र आणि चक्र अशी चिन्हे आहेत. या पादुका संनिध श्रीलक्ष्मीचे अखंड वास्तव्य आहे.

विश्वातील यच्चयावत शुभचिन्हे व अनंतकोटी तीर्थे या चरणांवर अधिष्ठित आहेत. या मनोहर पादुकांच्या रूपाने श्रीक्षेत्र नृसिंहवाडीत राहणारे भगवान श्री दत्तात्रेय हे साक्षात परब्रम्ह आहे.
संदर्भ-
पुण्यभूमी_नृसिंहवाडी

साभार : फेसबुक 

No comments:

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या