March 29, 2016
March 27, 2016
संकष्टी चतुर्थी
संकष्टी चतुर्थी - २७/३/२०१६
वेगवेगळ्या ठिकाणच्या गणेशाची माहिती संकलीत करण्याच्या उद्देशाने चालू केलेल्या या लेखन मालेच्या सहाव्या भागात आज आपण माहिती घेऊ टिटवाळ्याच्या महागणपतीची
पेशव्यांचा कुलस्वामी गजानन . श्रीमंत माधवरावांच्या कारकिर्दीत एक घटना घडली .
कारभारी रामचंद्र मेहंदळे यांनी टिट्वाळ्या गावातील वस्तीला आणि शेतीभातीला पाण्याचा उपयोग होईल या हेतूने अनेक वर्ष बंद असलेल्या तळ्याचा उपसा चालू केला . त्याचवेळी पुण्यात श्रीमंताना स्वप्नी दृष्टांत झाला की मजूर खोदकाम करत आहेत , एक एक कंगोरेदार पायरी उत्खननातून वर येत आहे आणि एके ठिकाणी अवचित सिंधुरी प्रकाशाचा झोत वर उसळतो आहे . श्रीमंत घाईने म्हणतात अरे तिथं बघा . त्या तिथं . . . . . . . .
इकडे रामचंद्रपंतांना सुमारे साडेतीन फूट उंचीची गणपती मूर्ती सापडली. तेथून अलगद उचलून त्यांनी ती काठावर आणली. रामचंद्रपंतांना जाणवले की भवतीचा परिसर अलौकिक तेजाने भरून गेला आहे , प्रासादिक सुगंधाने परिमळू लागला आहे.
श्रीमंतांच्या धार्मिक आणि भाविक सातेने मग मंदिर उभे राहिले आणि त्यांच्या उपस्थितीत गणराज्य महोत्सव साजरा झाला .
पेशव्यांनी भाविकतेने मखर दिले आणि आज एक भव्य मंदीर त्याच तळ्याकाठी उभे आहे . तोच महागणपती तिथे वस्तीला आहे व भक्तांच्या सर्व मनोकामना तो पुरवत आहे
या महागणपतीची एका भक्ताने केलेले स्तवन
कोकण प्रांती गणेश स्थान क्षेत्र टिट्वाळा
दासावरती करितो दया लाउनी जिव्हाळा
महागणपती असे सुंदर मूर्ती मनोहर
कंठी हार मस्तकी दुर्वा दिसे डौलदार
तीन्ही त्रिकाळी चाले पूजा दुर्वा शमिपत्रे
नैवेद्यासी असती मोदक अति आदरार्थे
तीन्ही त्रिकाळी चाले आरती अहो गणेशाची
गणेश दर्शना रीघ लागते आर्त भाविकांची
दासांचे आर्त भाव ऐके गणपती
प्रसन्नत्वे होऊनी दासा करि कामनापूर्ती
ऐसी असे ही वरद मूर्ती दासावर दात्री
भावे नमितो साष्टांगेसी होऊनी शरणार्थी
शरण येतो दिना नाथा अहो गजानना
माझे मनींची पूजा स्वीकारा अहो दयाघना
दयेचे सागर तुम्ही अहा मूर्तीमंत
पंचोपचारे करितो पूजा घेई पदरांत
दुर्वा शमीपत्रे अर्पूनी अर्पितो मांदारा
नैवेद्यासी मोदक देवा कैसे सुंदरा
मोदकाचा नैवेद्य अर्पूनी घालितो नमस्कार
घ्यावी सेवा गोड करुनी मागणे निरंतर
गणपती बाप्पा मोरया
For blog article on whatsapp contact on 9819830770
March 12, 2016
March 9, 2016
March 8, 2016
खग्रास सूर्यग्रहण ९ मार्च
बुधवार, ९ मार्च २०१६ खग्रास सूर्यग्रहण ( ग्रस्तोदित) 🌚 संबंधी माहिती
संदर्भ : दाते पंचांग 📝
हे ग्रहण खग्रास असले तरी संपुर्ण भारतात हे खंडग्रास दिसणार आहे. भारतात जिथे दिसणार आहे तिथे ग्रस्त झालेले सूर्यबिंब उदयास येईल
पुण्यकाल : सूर्योदयापासून ग्रहण मोक्षा पर्यंत
वेध: ८ मार्च सूर्यास्तापासून ग्रहण मोक्षा पर्यंत
लहान मुले, आजारी अशक्त व्यक्ती, गर्भवती स्त्रियांनी मंगळवारी रात्री ९ पासून वेध पाळावेत
मेष, वृषभ, कन्या, धनु राशींना ग्रहण शुभ.
मिथुन, सिंह, तुला. मकर यांना मिश्रफलदायी.
कर्क, वृश्चिक, कुंभ, मीन यांना अनिष्ट आहे त्यांनी आणी गरोदर स्त्रियांनी ग्रहण पाहू नये.
ग्रहण दिसणारे प्रदेश : सोलापूर, सांगली, लातुर, अहमदनगर, औरंगाबाद, नांदेड, जालना, जळगाव, नागपूर, इचलकरंजी, उदगिर, बारामती, अंबेजोगाई
संपूर्ण आंध्रप्रदेश, कारवार सोडून कर्नाटक, रतलाम सोडून संपूर्ण मध्य प्रदेश, तामिळनाडू, केरळ, उत्तर प्रदेश, दिल्ली, आग्रा
👆🏻 या भागात ग्रहण मोक्षापुर्वी सूर्योदय होणार असल्याने ग्रस्त सूर्यबिंब उदयास येऊन ग्रहण दिसेल
या भागात ग्रहणाचे वेधादि नियम पाळावेत व दुस-या दिवशी करिदीन पाळावा
खालील 👇🏻 ठिकाणी ग्रहण मोक्षानंतर सूर्योदय होत असल्याने ग्रहण दिसणार नाही तसेच नियम पाळण्याची आवश्यक्ता नाही
मुंबे, ठाणे, कोल्हापूर, पुणे, सातारा, कोकण, फलटण, कराड, मनमाड, दापोली, नाशीक, धुळे, चिपळूण, मालेगाव, संगमनेर, गुजरात, कारभार, कोटा सोडून संपुर्ण राजस्थान, पंजाब
📝
For blog article on whatsapp contact on 9819830770
March 3, 2016
श्रीराम वंदना
श्रीराम वंदना (शौनक अभिषेकींच्या आवाजातील)
नादातुनी या नाद निर्मितो
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
नाद निर्मितो मंगलधाम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
चैतन्यात आहे राम .
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
सत्संगाचा सुगंध राम .
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
आनंदाचा आनंद राम ..
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
त्रिभुवनतारक आहे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
सुखकारक हा आहे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
श्रद्धा जेथे तेथे राम .
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
शांती जेथे तेथे राम ..
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
सबुरी ठायी आहे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
चैतन्याचे सुंदर धाम .
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
पुरुषोत्तम परमेश राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
भक्तिभाव तेथे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
निर्गुणी सुंदर आहे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
लावण्याचा गाभारा
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
कैवल्याची मूर्ती राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
चराचरातील स्फूर्ती राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
अत्म्याठायी आहे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
पर्मात्माही आहे राम .
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
सगुणातही आहे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
निर्गुणी सुंदर आहे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
जे जे मंगल तेथे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
सुमंगलाची पहाट राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
सृष्टीचे ह्या चलन राम ..
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
कर्तव्याचे पालन राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
दु:ख निवारक आहे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
स्वानंदाच्या ठायी राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
सुंदर सूर तेथे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
शब्द सुंदर तेथे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
सकल जीवांच्या ठायी राम.
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
वात्सल्याचे स्वरूप राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
सुंदर माधव मेघ श्याम ..
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
दशरथ नंदन रघुवीर राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
अयोध्यापती योद्धा राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
रघुपती राघव राजाराम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
रामनाम सुखदायक राम ..
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
सकल सुखाचा सागर राम .
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
चराचरातील जागर राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
रामभक्त नीत स्मरतो राम .
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
कुशलव गायिणि रमतो राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
हनुमंताच्या हृदयी राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
जानकी वल्लभ राजस राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
चराचरातील आत्मा राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
समर्थ वचनी रमला राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
कुलभूषण रघुनंदन राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
राम गायिणि रमतो राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
स्वरांकुरांच्या हृदयी राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
भक्तीरंगी खुलतो राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
दाशरथी हा निजसुखधाम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
कौसल्यासुत हृदयनिवास
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
राजीवलोचन पुण्यनिध्य हा
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
सीतापती कैवल्य प्रमाण
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
पत्नीपरायण सीताराम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
लक्ष्मण छाया दे विश्राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
आदर्शांचा आदर्श राम
।। श्री राम जय र ाम जय जय राम ।।
एक वचनी हा देव महान
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
For blog article on whatsapp contact on 9819830770
March 2, 2016
Subscribe to:
Posts (Atom)