संकष्टी चतुर्थी
वेगवेगळ्या ठिकाणच्या गणेशाची माहिती संकलीत करण्याच्या उद्देशाने चालू केलेल्या या लेखन मालेच्या शेवटच्या अकराव्या भागात आज आपण माहिती घेऊ गणपती पुळे येथील गणपतीची
गणपतीपुळे - महागणपती इतिहास
मुद्गलपुराणात या गणपतीचे माहात्म्य विशद केले आहे. देशात चार दिशांना चार मंगलमूर्तींची महास्थाने आहेत. त्यांना द्वारदेवता अशी संज्ञा आहे. त्यापैकी कोकण किनारपट्टीत समुद्रतीरावरील ही पश्चिम द्वारदेवता आहे.
समुद्र किनारी असलेल्या देवळाच्या पार्श्र्वभूमीवरील डोंगरही जणू गणपतीच्या आकाराचा आहे. पुळणीवर प्रकट झालेला गणपती म्हणून गणपतीपुळे. ‘पुळ्याचा गणपती’ असाही शब्दप्रयोग वापरला जातो.
इ.स. 1600 मध्ये मोगलाईच्या काळात गणेशभक्त असलेले बाळभटजी भिडे या ठिकाणी येऊन राहिले. त्यांना गणेशाचा दृष्टांत झाल्याप्रमाणे त्यांनी येथील जंगल तोडून जागा स्वच्छ केली. तेव्हा दोन गंडस्थळे आणि दंतयुक्त स्वरूप त्यांच्या दृष्टीस पडले. त्यांनी त्या ठिकाणी गवताचे छप्पर उभारून पूजा-अर्चेस सुरवात केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्तो यांनी छपराच्या जागी घुमट बांधला, तर पेशव्यांचे सरदार बुंदेले यांनी सभामंडप बांधला. कोल्हापूर संस्थानचे कारभारी बर्वे यांनी नंतर सोन्याचा मुलामा दिलेला घुमटाकार कळस चढवला. नानासाहेब पेशवे यांनी नंदादीप दिला, तर चिमाजी अप्पांनी नगारखान्याची व्यस्था केली. माधवराव पेशवे व रमाबाईंनी दगडी धर्मशाळा बांधली आहे. – अशा अनेक नोंदी या मंदिराच्या इतिहासात आढळतात.
भगवान परशुरामांनी चिपळूणजवळ परशुरामक्षेत्र निर्माण केले. उपासनेसाठी गणपतीचे अस्तित्व असावे म्हणून प्रार्थना केली. त्यामुळे हा स्वयंभू गणपती प्रकट झाला. अशी आख्यायिका आहे तर गणेशगुळे येथील गणपती तेथून गणपतीपुळे येथे आला अशी सुद्धा आख्यायिका सांगितली जाते.
,सांगलीच्या पटवर्धन राजघराण्याचे मूळ पुरुष हरभटबुवा हे कोकणातील गणपतीपुळे येथे एक तप तपश्चर्येला बसले होते. माधवराव पेशवेसांगली संस्थानचे पटवर्धन अशा अनेक थोर लोकांनी या गणेशाची उपासना केली आहे. टेकडीच्या पायथ्याशी किना-यालगत गणपतीचे तोंड, पोट दिसेल अशा आकाराचा नैसर्गिकरीत्या तयार झालेला भाग होता. दोन गंडस्थळे, नाभी आणि एकदंत असलेली मूर्ती, चंदनाच्या गंधाने तोंड, डोळे, कान, यांचे रेखाटन केले जाते.
गणेश चतुर्थी, माघी चतुर्थी, अंगारकी अशा दिवशी लाखो भाविक येथे येतात.
निसर्गरम्य समुद्रकिनारा लाभलेले हे गाव असून, किना-याला लागूनच सुमारे तीनशे फूट उंचीची आणि एक किलोमीटर परिघाची टेकडी आहे. या टेकडीच्या पायथ्याशी समुद्राकडे तोंड करून पश्चिम दिशेला गणपतीचे मंदिर आहे.
मंदिराचा गाभारा दगडांनी बांधलेला आहे. गाभा-यात जाण्यासाठी पाय-या उतरून आत जावे लागते. सभामंडप असून, तो अलीकडेच नव्याने बांधलेला आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ मोठा पितळेचा मूषक म्हणजे मोठा उंदीर असून, त्याच्या कानात भाविक लोक आपली इच्छा प्रकट करतात. टेकडीला प्रदक्षिणा घालण्यासाठी गोलाकार प्रदक्षिणा मार्ग तयार करण्यात आला आहे. रत्नागिरीतील जांभ्या दगडाचे येथील सौंदर्य आपले मन वेधून घेते.
येथील वैशिष्ट्य हेच, की ज्या टेकडीच्या पायथ्याशी ही गणेशमूर्ती आहे, तिलाच गणेशस्वरूप समजले जाते.त्यामुळे गणेशाला प्रदक्षिणा घालायची असेल तर संपूर्ण टेकडीलाच अनवाणी प्रदक्षिणा घालावी लागते. अशी प्रदक्षिणा घालणे हा येथील उपासनेचा महत्त्वाचा धार्मिक विधी समजला जातो.
खळाळत्या समुद्रकिनाऱ्यालगत आणि गर्द वृक्षराजींच्या सान्निध्यात वसलेले हे गणेशस्थान येणाऱ्या भाविकांना समाधान आणि शांतता प्रदान करत असते.
दरवर्षी २ ते ८ फेब्रुवारी आणि २ ते ८ नोव्हेंबर या दिवसात सूर्यास्ताची किरणे गणेशमूर्तीवर पडतात.
माहिती सग्रहित
यापूर्वीचे भाग वाचण्यासाठी खालील लिंकला भेट देऊ शकता
भाग १- कसबा पेठ गणपती ( मानाचा पहिला ) ,
भाग २- तासगावचा गणपती
भाग ३ - दशभूजा गणपती हेदवी
भाग ४ - वाईचा ढोल्या गणपती
भाग ५- सांगलीचा संस्थानाचा गणपती
भाग ६ - टिट्वाळा महागणपती
भाग ७ - सारसबाग गणपती
भाग ८ - टेकडी गणेश , नागपूर
भाग ९ - चिरनारचा महागणपती
भाग १० - दगडूशेठ गणपती, पुणे
यापूर्वीचे भाग वाचण्यासाठी खालील लिंकला भेट देऊ शकता
भाग १- कसबा पेठ गणपती ( मानाचा पहिला ) ,
भाग २- तासगावचा गणपती
भाग ३ - दशभूजा गणपती हेदवी
भाग ४ - वाईचा ढोल्या गणपती
भाग ५- सांगलीचा संस्थानाचा गणपती
भाग ६ - टिट्वाळा महागणपती
भाग ७ - सारसबाग गणपती
भाग ८ - टेकडी गणेश , नागपूर
भाग ९ - चिरनारचा महागणपती
भाग १० - दगडूशेठ गणपती, पुणे
भाग ११ - गणपतीपुळे चा गणपती
For blog article on whatsapp contact on 9819830770
No comments:
Post a Comment