September 10, 2016

लालबागचा राजा आणि मी



गेल्या काही वर्षापासून  ' लालबागचा राजा ' अनेक कारणांनी चर्चेत आहे. (यातील वाईट गोष्टीचे बिलकुल समर्थन करायचे नाही ).  दादर परळ  भागातील गणेश मंडळातील स्पर्धा , जहिरातीतून मिळणारा पैसा, मीडिया , सोशल मिडिया , धक्काबुक्की , कार्यकर्त्ये , त्यांचे  वर्तन , भ्रष्टाचार  याबाबत न बोललेले बरे . तो आपला प्रात नाही. देव करो आणि असे सगळीकडचे प्रकार बंद  होवोत .
पण याबाबत सोशल मीडियावर जे चालू आहे  त्यातील काही गोष्टीचे मला आश्चर्य  वाटते 
१) स्वतः: आयुष्यात  कधीही  लालबागच्या राजाला न गेलेले  सोशल मीडियावर  ' राजाचे ' मेसेज  हिरीरीने पुढे ढकल आहेत 
२) जे आज पर्यत जाऊन आलेले आहेत ते अचानक मूग गिळून गप्प बसले आहेत ( अचानक भक्तीचा झरा आटला ? )

अस म्हणतात की हा राजा पूर्वी ' मार्केटचा राजा ' म्हणून प्रसिध्द्व होता.  मुंबईत  व्यापार करून  आणलेला माल आपापल्या गावात जाऊन विक्री करणारा व्यापारी न चुकता  गणेशोत्सवात  त्याचे दर्शन घेतो . आणि मग वर्षभर त्याचा व्यवसाय तेजीत चालतो . आता खरं खोट  तो बाप्पा  जाणे आणि तो व्यापारी 

थोडं विषयांतर : - 

मी अमुक एका मोबाईल कंपनीचे कार्ड वापरतो कारण मला त्याची सर्वीस आवडते त्यासाठी मी जे काही पैसे आहेत  ते मोजतो ..आणि मी लाभ करून घेतो 
त्या कपंनीच्या  मालक यातून करोडो रुपये जमवतो आहे का अब्ज यांच्याशी मला काही देणे घेणे नाही ....  बस 
 माझ्यासारख्या सामान्य भकतांसाठी राजाचे वर्षातून एकदा होणारे दर्शन हे सुखावह ठरत असेल ( भावनिक गरज पुर्ण  होत असेल ) तर  त्या मंडळाने करोडो रुपये मिळवले काय अन लाखो.  ते बघायला सरकार , नास्तिक लोक , टिवटिव करणारे , धर्मादाय  आयुक्त , इकडून तिकडे मेसेज पाठवणारे  आहेतच 

ज्याप्रमाणे प्रभादेवीचा सिद्धिविनायक , तिरुपती  बालाजी , शिर्डिचे  साईबाबा  ( अखंड गर्दीची ठिकाणे )   पुण्याचा दगडूशेठ, सांगलीचा संस्थान गणपती , टिटवाळ्याचा महागणपती  हे आमचे श्रद्धास्थान  आहे त्याच प्रमाणे वर्षातून एकदा येणारा ' लालबागचा राजा ' ही  आमचे कायमचे श्रद्धा स्थान राहील यात शंका नाही 

एक गणेश भक्त




No comments:

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या