सामान्य माणसांना हा पडणारा रोजचा प्रश्ण. या प्रश्णाचे उत्तर घेण्याचा जो तो आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत असतो. पंचांग, पेपरातले एका वाक्यातील राशी भविष्य, पत्रिकेनुसार आजचे ताराबळ,चंद्रबळ, राहू काळ,अमृत काळ,टॅरो कार्ड इ इ .
( एका दिवसासाठीच्या प्रश्णासाठी मला स्वतःला टॅरो कार्डचा अनुभव खूप चांगला आला आहे).
आज तुम्हाला मी या लेखाद्वारे दक्षिण भारतात प्रसिद्ध असणाऱ्या एका पध्दतीची माहिती सांगणार आहे जी मलाही नुकतीच समजली.
यात तुम्हाला तुमचे जन्म नक्षत्र आणि तुमचा जन्म शुक्ल पक्षात झालाय की कृष्ण पक्षात एवढीच माहिती पुरेशी आहे.
पुढंच सगळं काम अँप वर सोपवायचं, रोजच्या दिवसातील कुठली वेळ सर्वोत्तम ,कुठली बरी, कुठली वाईट हे सगळं अँप वर बघायला मिळेल.
या पद्धतीचे नाव आहे 'पंचपक्षी' पध्दत. या पद्धतीचा थोडक्यात परिचय करुन देतो
प्रत्येक व्यक्तीला जन्म नक्षत्र, पक्ष ( राजकीय नव्हे) नुसार गिधाड,घुबड,कावळा,कोंबडा,मोर यातील एक पक्षी मिळतो
या पक्षांची कामे ५
शासन
जेवण
फिरणे
झोप
मृत्यू
या पध्दतीत प्रत्येक दिवसाचा - रवि ते शनिवार, दिवसाचे १२ तास आणि रात्रीचे १२ तास, शुक्ल/ कृष्ण पपक्षानुसार ( पोर्णीमेचा दिवस शुक्ल, अमावस्येचा दिवस कृष्ण पक्ष)
कोणता पक्षी कोणत्या वेळेला वरील पैकी कोणती क्रिया करणार हे ठरलेले असते. एका ठराविक वेळी वरील पाच पक्षी पाच क्रिया वाटून घेतात.
प्रतेक क्रिया २ तास २४ मिनीटाची. नंतर हे कोष्टक बदलते. असे दिवसाचे ५ टप्पे, रात्रीचे ५ टप्पे
जेंव्हा तुमचा पक्षी ' शासन' करत असेल ती वेळ सर्वोकृष्ट
त्याखालोखाल जेवण,नंतर फिरणे,
झोपणे - ही क्रिया असणारी वेळ वाईट ,मृत्यू - सगळ्यात वाईट
'panchpakshi' असं नाव लिहून प्ले स्टोअर वरुन तुम्ही अँप घेऊ शकता आणि रोजच्या दिवसातील चांगल्या/ वाईट वेळेचा अंदाज बांधू शकता.
मी वापरत असलेल्या अँप्लीक लिंक
https://play.google.com/store/apps/details?id=com.ssprabhu.panchapakshi
( अभ्यासू) अमोल 📝
#पंचपक्षी
No comments:
Post a Comment