त्यांचे हार्दीक अभिनंदन
वसंतदादांचे नातू असलेले श्री. प्रतीक पाटील यांनी दादांनी घालून दिलेल्या विकासाच्या मार्गावर यशस्वी वाटचाल करावी या त्यांना शुभेच्छा।
एक सांगलीकर म्हणून या घटनेचा विशेष आनंद झाला आहे. मॅनेजमेंटचे शिक्षण घेत असताना २००० साली 'प्रकाश अॅग्रो ' या कंपनीत प्रोजेक्ट करत असताना श्री प्रतिक पाटलांचा जवळून संबंध आला. त्यावेळी श्री. प्रकाशबाबू पाटील हे त्यांचे वडील खासदार होते. परंतू प्रतीक पाटील यांची साधी रहाणी विशेष लक्षात येत होती. सांगलवाडी सारख्या ठिकाणी उभारलेले या प्रकाश अॅग्रो प्रकल्पात मँगो पल्प, आणि इअतर फळांचे पल्प तयार करत असत. अत्याधुनीक मशीनरींनी , नवीन टेक्नॉलॉजी उभी करण्यात संचालक म्हणुन प्रतीक पाटील यांची दुरद्रुष्टी दिसून येत होती. या निमित्याने या सर्व आठवणींना उजाळा मिळाला. परत एकदा प्रतीक पाटील यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा.
शुभेच्छुक
अमोल केळकर
साखर कारखाना, सांगली
९८१९८३०७७०