August 10, 2020

गीतरामायणातील निवेदन 📝 भाग ३

गीतरामायणातील निवेदन 📝

भाग ३
---------------------------
"उगा कां काळिज माझे उलें?  पाहुनी वेलीवरची फुले"
- महाराणी कौसल्या अशा चमत्कारिक मन:स्थितींत असतांनाच, महाराज दशरथ अंत:पुरांत आले. आपल्या लाडक्या राणीला ते सांगूं लागले.
🎼
उदास कां तू?  आंवर वेडे,
 नयनांतिल पाणी
लाडके, कौसल्ये राणी.

सरयूतीरीं यज्ञ करुं गे, मुक्त करांनी दान करुं
शेवटचा हा यत्न करुं गे, अंतीं अवभृत स्नान करुं
इप्सित तें तो देईल अग्नि,अनंत हातांनी


" इप्सित तें तो देईल अग्नि,अनंत हातांनी"
- या इच्छेने दशरथाने यज्ञाश्व सोडला,पुढें एका संवत्सरानंतर तो यज्ञीय अश्व परत आला.राजा दशरथाच्या विनंतीनुसार ऋष्यशृंगानें यज्ञ मांडला.एका शुभवेळी यज्ञीय ज्वालेंतून एक रक्तवर्ण महापुरुष प्रकट झाला,आणि दुंदुभीसारख्या कणखर पण मधुर सादानें तो राजा दशरथाला म्हणाला-

🎼
दशरथा, घे हें पायसदान
तुझ्या यज्ञिं मी प्रगट जाहलों हा माझा सन्मान

क्रमश:
----------------------------------------
देवा तुझ्या द्वारी आलो🙏🏻🌺
kelkaramol.blogspot.com


गीतरामायण हे आधुनिक शतकातील 'महाकाव्यच'. गदिमा आणि सुधीर फडके यांनी  या महाकाव्याला एका वेगळ्याच. उंचीवर नेऊन ठेवले आहे . यातील अनेक गाणी आपणाला तोंड पाठ आहेत. या गाण्यांबरोबरच  दोन गाण्यांचे एकत्र गुंफण करणारे आणि गाण्याबद्दलची पार्श्वभूमी सांगणारे तितकेच छान निवेदन. तर प्रत्येक गाण्याआधी सादर झालेल्या निवेदनाची ही क्रमशः मालिका 
प्रभू श्रीरामचरणी अर्पण 🙏🏻🚩
----------------------------------------

No comments:

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या