September 30, 2008

नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा !

-------------------------------------------------------------------

सर्व मंगल मांगल्ये

शिवे सर्वार्थ साधिके ।

शरण्ये त्र्यम्बके गौरि

नारायणि नमोऽस्तु ते ...!!


------------------------------------------------

( सौजन्यः इ-सकाळ आवृत्ती )

September 29, 2008

आजचा दिवस आणि टॅरो कार्ड

टॅरो कार्ड शिकायला लागून आज एका वर्षाहून अधिक काळ झाला आहे. सुरवातीला टॅरो कार्डस शिकताना अनेक जाणकारांनी सांगितले की सकाळी रोज एक कार्ड स्वतःसाठी काढावे जे आजच्या दिवसाचा सारांश सांगेल. थोडक्यात आजचा दिवस कसा जाइल ते सांगेल.
दिवसाच्या शेवटी दिवसभराच्या घटना आठवूण , सकाळी काढलेले कार्ड याच्यात काही साम्य आहे का ? घडलेल्या घटना आणि कार्डावरील चित्र यांच्यात काय साम्य आहे ? याचा अभ्यास करावा.
आजतागायत दररोज सकाळी एक कार्ड काढायचे या नियमात काही अपवाद वगळता खंड पडलेला नाही. याचा मुख्य उपयोग कार्डाचा अगदी खोलवर जाऊन अभ्यास करण्यासाठी होतो. एकच कार्ड किती वेगळ्याप्रकारे प्रकारे अर्थ ( जो आपण लक्षात घेतलेला नसतो ) सांगत असते ते शिकायला मदत होते.
आता आजचे उदाहरण ।



आजचा माझा दिवस कसा जाईल ? ऑफीसला जाण्याआधी मी कार्ड काढले - ८ ऑफ वॉन्ड
याचा अर्थ आहे- प्रवास योग,चांगली बातमी कळणे ( खाली मायनर कार्ड -१ मधे पहा )
ऑफीस मधे आल्यावर सोमवार सकाळची कामे सुरु करण्याआधी महाजालावर फेरफटका मारला तेंव्हा आश्चर्याचा सुखद धक्का बसला.
ज्योतिषशास्त्राचे गाढे अभ्यासक आदरणीय धोंडोपंत आपटे यांनी '
धोंडोपंत उवाच' या त्यांच्या ब्लॉगवर ' भविष्याच्या अंतरंगात ' या ब्लॉगचा टॅरो विषयाची मराठीतून माहिती देणारा एक चांगला ब्लॉग म्हणून उल्लेख केलेला आढळला. आणि जगभरातील वाचकांनी हा ब्लॉग पहावा अशी विनंती ही त्यांनी केलेली आढळली. अतीशय आनंद झाला.
पंतांचे मी या बद्दल आभार मानू इच्छितो . त्यांनी दिलेल्या शाबासकीने आणखी काम करण्याची स्फुर्ती मिळाली आहे. यापुढे ही जास्तिजास्त चांगल्या प्रकारे या विषयाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे.
असो. आणखी एक
८ ऑफ वॉन्ड कार्डाने ने दाखवून दिले की आज चांगली बातमी मिळणार होती ती मिळाली आहे.
आपला
( रोजच्या दिवसावर अवलंबून असणारा ) अमोल केळकर

September 22, 2008

टॅरो कार्डस आणि मह्त्वाचे आजार

रिडिंग घेताना काही विशिष्ठ कार्डे विशिष्ठ जागेवर आली असता, तब्येतीच्या दृष्टीने काळजीपुर्वक पहावीत.
ही काही कार्डे ठराविक आजार दर्शवतात।


३ ऑफ स्वॉर्ड - हृदया संबंधी तक्रारी
चॅरिओट ( उलटे कार्ड ) - पोटासंबंधी तक्रारी
१० ऑफ स्वॉर्ड / - बॅक पेन / पाठ दुखी इ.
९ ऑफ स्वॉर्ड - खिन्नता, उदासिनता ( डिप्रेशन )
टॉवर कार्ड - भाजणे , अपघात
हँन्गड मॅन - पायाचे विकार , गुढगे दुखी
जस्टीस ( उलटे कार्ड ) - किडनी संबंधी तक्रारी
हर्मीट ( उलटे कार्ड ) - आतड्या संबंधी विकार
इंप्रेस - घशाचा विकार
४ ऑफ स्वॉर्ड - अतीश्रमाने आजारी
१० ऑफ वॉन्ड - सांधे दुखी

September 20, 2008

टॅरोट - ट्री ऑफ लाईफ

सर्व ही टॅरो कार्डे एका विशिष्ठ पध्दतीने ( चित्रात दाखवल्या प्रमाणे ) मांडली असता जी रचना तयार होते त्याला टॅरोट - ट्री ऑफ लाईफ म्हणतातात





















September 16, 2008

उच्च-शिक्षण/व्यवसाय संदर्भात मार्गदर्शन आणि टॅरो कार्ड.

माझ्याकडे १२ वीत ला एक जण आला होता. त्यावेळेला जसे आपण सर्वांना विचारतो तसे त्याला विचारले की १२ वी नंतर कुठली साईड निवडणार आहेस ? त्यावर तो म्हणाला मेडिकल साईडला जायची ईच्छा आहे. म्हणलं बघु यात टॅरो कार्ड्स काय सांगतात ते?

टॅरो डेक त्याला देऊन सांगितले की सर्व पत्ते व्यवस्थित पिसून १ कार्ड काढ.

त्याने कार्ड काढले ९ ऑफ स्वॉर्ड . - जे मेडिकल लाईन दर्शवते.

आज त्याने १२ वी नंतर बि.फार्म अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे.

जेंव्हा हे रिडिंग घेतले त्याच्या मनातील ( सब कॉन्सस माईंड ) इच्छा चित्राच्या रुपाने प्रकट झाली. त्याचे योग्य विश्लेषण आपण करु शकलो तर टॅरो कार्डेस द्वारे आपण आपले जीवन घडवू शकतो.

अशीच काही कार्डे जी एखादा विशेष करिअर / व्यवसाय दर्शवतात.

१० ऑफ पेन्टॅकल - इस्टेट एजंट
७ ऑफ पेन्टॅकल - शेतकरी / शेती व्यवसाय संबंधीत
५ ऑफ पेन्टॅकल -हॉस्पिटल सेवक
३ ऑफ पेन्टॅकल - बांधकाम व्यवसाय
९ ऑफ पेन्टॅकल - शेअर ब्रोकर, गुंतवणूक सल्लागार
किंग ऑफ स्वॉर्ड - सिनिअर मॅनेजमेंट
क्नाईट ऑफ स्वॉर्ड - सैन्य दल / मिलिटरी
पेज ऑफ स्वॉर्ड - गुप्तहेर यंत्रणा
६ ऑफ स्वॉर्ड - ट्रॅव्हल एजंट
२ ऑफ स्वॉर्ड - वकिल
किंग ऑफ कप - डॉक्टर / नर्स
९ ऑफ कप - मार्केटिंग
७ ऑफ कप - ऍक्टर / नट
६ ऑफ कप - फोटोग्राफी
८ ऑफ वॉन्ड - ऍव्हिऐशन / विमान सेवा संबंधीत व्यवसाय
६ ऑफ वॉन्ड - कुरिअर / शिपिंग
५ ऑफ वॉन्ड - राजकारण / पुढारी
टॉवर - आपत्ती सुरक्षा व्यवस्थापन
मून - भविष्यवेत्ता
जस्टिस - न्यायाधिश
चॅरिओट - ड्रायव्हर
ऍम्परर - पंतप्रधान / अतीमहत्वाची व्यक्ती

मॅजीशिअन - इंजिनिअर, शास्त्रज्ञ

September 15, 2008

लालबागचा राजा - टॅरोट कार्ड














  लालबागचा राजा २०१३








टॅरोट कार्ड मधे हाय प्रेस्टीस हे कार्ड टॅरोट कार्डची देवता मानतात.
आपण जर लालबागचा राजा आणि हे कार्ड यांचे निरिक्षण केले तर बर्‍याच गोष्टीत साम्य दिसते. विशेषतः बसण्याची पध्दत , बाजुचे दोन डांब .
आपण काही साम्य शोधू शकाल ?




September 12, 2008

टॅरोट संबंधी काम करणार्‍या जागतिक संस्था

टॅरोट इंडिया

अमेरिकन बोर्ड फॉर टॅरोट सर्टीफिकेशन

अमेरिकन टॅरोट असोसिएशन

कॅनेडिअन टॅऱोट

टॅरोट सोसायटी ऑफ साऊथ अफ्रिका

टॅरोट असोशिएशन ऑस्ट्रेलिया

स्प्रेड

टॅरो रिडिंग घ्यायच्या ( रिडिंग घेण्यासाठी कार्डे मांडण्याच्या )वेगवेगळ्या पध्दती आहेत. त्याला स्प्रेड असे म्हणतात.
सुरवातीला आपण सगळ्यात सोपा स्प्रेड पाहू.
आपल्याला बर्‍याच वेळा एखाद्या प्रश्नाचे ' हो ' किंवा ' नाही' असे उत्तर हवे असते.
यासाठी एक स्प्रेड वापरला जातो. यात आपणाला १३ पानांचा एक हीप ( गठ्ठा ) असे ३ हीप करवयाचे आहेत.
७८ कार्डे हातात घेऊन , एकमेकांवर ओळीने १३ कार्डे रचत जावीत. ज्याक्षणी कुठलेही एस ( एक्का ) किंवा मॅजिशिअन, हे कार्ड येईल त्यावेळी थांबावे. जर या पैकी कुठलेही कार्ड आले नाही तर १३ कार्ड झाल्यावर थांबावे.
असेच आणखी २ वेळा करावे.
आता ३ गठ्ठ्यात ३ एक्के किंवा २ एक्का व मॅजिशिअन किंवा २ एक्के असल्यास तुमच्या प्रश्नाचे उत्तर होय
एक एक्का आणि मॅजीशिअन, फक्त मॅजिशिअन - होय असण्याची जास्त शक्यता
फक्त एक एक्का - नाही उत्तर असण्याची जास्त शक्यता
एकही एक्का, मॅजेशिअन नसल्यास - नाही उत्तर

टॅरो कार्ड्स इतिहास

- टॅरो कार्डसचा इतिहास सांगणारा हा व्हिडिओ आवर्जून पहा।


मायनर कार्ड माहिती -४

आता बघुयात पेन्टॅकल या कार्ड प्रकाराची माहिती . ही सर्व कार्डे पृथ्वीतत्वाची आहेत. माणसांची सांपत्तीक स्थिती, धन-दॉलत,भौतिक सुखे इ. ही कार्डे दर्शवतात
एस ऑफ पेन्टॅकल -
१ ऑफ पेन्टॅकल - सांपत्तीक स्थितीत चांगले बदल होण्याचे संकेत
२ ऑफ पेन्टॅकल -द्विधा मनस्थिती, गोंधळ, अनेक कामे एकाचवेळी करणे
३ ऑफ पेन्टॅकल - सर्वांना बरोबर घेऊन काम करणे, कामाचे व्यवस्थापन,
४ ऑफ पेन्टॅकल - उपभोग्य वस्तूंचा साठा, नवीन वस्तू मिळणे
५ ऑफ पेन्टॅकल - आजार, पैशाची टंचाई, कामात अडचणी
६ ऑफ पेन्टॅकल-मदत मिळणे, मदत कर्णे, पगार वाढ
७ ऑफ पेन्टॅकल -संयम ठेवणे, दुसर्‍या मार्गाचा विचार करणे
८ ऑफ पेन्टॅकल - नवीन गोष्ट शिकणे, नोकरी मिळणे, कामावर लक्ष केंद्रित
९ ऑफ पेन्टॅकल-गुंतवणूक करणे
१० ऑफ पेन्टॅकल - जीवनात स्थिरता
११ पेज ऑफ पेन्टॅकल - कामावर लक्ष केंद्रीत करणे
१२ क्नाईट ऑफ पेन्टॅकल - मकर राशीचे व्यक्तिमत्व असणारी माणसे
१३ क्विन ऑफ पेन्टॅकल - कन्या राशीचे व्यक्तिमत्व असणारी माणसे
१४ किंग ऑफ पेन्टॅकल - वृषभ राशीचे व्यक्तिमत्व असणारी माणसे

September 11, 2008

मायनर कार्ड माहिती -३

आता घेऊया स्वॉर्ड या कार्ड प्रकाराची माहिती . ही सर्व कार्डे वायूतत्वाची आहेत. माणसांची वैचारिकता, बुध्दी ही कार्डे
दर्शवतात
एस ऑफ स्वॉर्ड - नवीन विचार, प्रामाणिकपणा
२ ऑफ स्वॉर्ड- सत्याचा स्विकार न करणे, निर्णय घेण्यास असमर्थ, धोक्यांकडे दुर्लक्ष
३ ऑफ स्वॉर्ड -अपेक्षाभंग, मनासार्खे न होणे
४ ऑफ स्वॉर्ड- मानसिक शारिरीक विश्रांतीची गरज
५ ऑफ स्वॉर्ड - फसवणे, खोटे समाधान, स्वार्थी विचारसरणी
६ ऑफ स्वॉर्ड - अडचणीतून मार्ग मिळणे, नवीन जागी प्रवास
७ ऑफ स्वॉर्ड- एकाकी रहावेसे वाटणे, पळून जाणे, काही तरी चोरी होणे
८ ऑफ स्वॉर्ड- परिस्थितीपुढे शरणागती, जास्त पर्याय उपलब्ध नसणे,स्वातंत्र न मिळणे
९ ऑफ स्वॉर्ड - पश्चाताप, मन उदास होणे, चलबिचलता
१० ऑफ स्वॉर्ड- जे काही वाईत होणार होते ते होऊन गेले आहे, नवीन विचारसरणी आवश्यक
११ पेज ऑफ स्वॉर्ड - कर्तव्याची जाणिव ठेवणे
१२ क्नाईट ऑफ स्वॉर्ड - तुळ राशीचे व्यक्तिमत्व असणारी माणसे
१३ क्विन ऑफ स्वॉर्ड - मिथुन राशीचे व्यक्तिमत्व असणारी माणसे
१४ किंग ऑफ स्वॉर्ड - कुंभ राशीचे व्यक्तिमत्व असणारी माणसे

मायनर कार्ड माहिती -२

आता घेऊया कप या कार्ड प्रकाराची माहिती . ही सर्व कार्डे जलतत्वाची आहेत. माणसांचे संबंध, भावनिकता, स्वप्न ही कार्डे
दर्शवतात
एस ऑफ कप - नवीन ओळख, नवीन संबंध निर्माण होण्याची शक्यता
२ ऑफ कप - दिन व्यक्तींमधील करार , विवाहयोग, चांगली बातमी
३ ऑफ कप - समारंभ, आनंदाचे प्रसंग
४ ऑफ कप -स्वतःच्या विचारत मग्न, संधी हुकण्याची शक्यता, जे पाहिजे ते न मिळणे
५ ऑफ कप - पराभव, दु:ख
६- ऑफ कप - भुतकाळात रमणे, जुने मित्र भेटणे
७ ऑफ कप - अनेक पर्याय उपलब्ध असणे
८ ऑफ कप- निराशा, जास्त काही करता न येणे, सोडून देणे
९ ऑफ कप -समाधान, मनातील इच्छा पुर्ण होणे
१० ऑफ कप -कौटुंबिक सोहळा, आनंदी वातावरण
११ पेज ऑफ कप: चांगली बातमी, चुकी बद्दल माफ करणे
१२ क्नाईट ऑफ कप- कर्क राशीचे व्यक्तिमत्व असणारी माणसे
१३ क्विन ऑफ कप- मीन राशीचे व्यक्तिमत्व असणारी माणसे
१४ किंग ऑफ कप - वृश्चिक राशीचे व्यक्तिमत्व असणारी माणसे

मायनर कार्ड माहिती -१

आता आपण ५६ मायनर कार्डांचा अर्थ समजावून घेऊ. ही कार्डे दैनंदिन घडणार्‍या गोष्टी स्पष्ट करतात.
आता सुरवात करु या वॉन्ड या सूट पासून. ही सर्व कार्डे अग्नीतत्वाची आहेत. माणसाच व्यवसाय, नोकरी, पॅशन ही कार्डे
दर्शवतात
एस ऑफ वॉन्ड - एकाद्या चांगल्या गोष्टीची सुरवात
२ ऑफ वॉन्ड- आव्हान स्विकारणे
३ ऑफ वॉन्ड- नेहमीपेक्षा वेगळा विचार करणे, पुढचा आराखडा मांडणे
४ ऑफ वॉन्ड - स्वातंत्र्य, आनंददायक घटना.
५ ऑफ वॉन्ड- भांडण,मतभेद
६ ऑफ वॉन्ड - विजयाचे संकेत
७ ऑफ वॉन्ड -स्वतःच्या मताशी ठाम राहणे, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणे
८ ऑफ वॉन्ड - एखादी बातमी येणे, प्रवासाचा योग
९ ऑफ वॉन्ड - सातत्य ठेवणे, संयम, यशासाठी थोडी प्रतीक्षा
१० ऑफ वॉन्ड - कामात व्य्स्त, खुप काम, जबाबदारी
११ पेज ऑफ वॉन्ड - यशावर लक्ष केंद्रित करणे
१२ क्नाइट ऑफ वॉन्ड -मेष राशीचे व्यक्तिमत्व असणारी माणसे
१३ क्विन ऑफ वॉन्ड - धनु राशीचे व्यक्तिमत्व असणारी माणसे
१४ किंग ऑफ वॉन्ड - सिंह राशीचे व्यक्तिमत्व असणारी माणसे

टॅरो वरची पुस्तके

या विषयाचा अभ्यास करण्यासाठे अनेक चांगली पुस्तके आहेत. ऑन लाईन खरेदिची सुविधा देणार्‍या संकेतस्थळावर ही मिळू शकतात.

खाली काही पुस्तके दाखवली आहेत, जी या विषयाचा अभ्यास करण्यास उपयुक्त आहेत
.






















































११ सप्टेंबर - वर्ल्ड ट्रेड सेंटर

आज अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील दहशदवादी हल्ल्यास ७ वर्षे पुर्ण झाली.
त्या दिवसाची ही काही चित्रे।
















------------------------------------------------------------------------------------------------

टॅरो कार्ड मधील टॉवर हे कार्ड पहा दोन्ही चित्रात काही साम्य आहे का ?

September 10, 2008

मेजर कार्डस ( महत्वाची कार्डे )


टॅरोट मध्ये ही अतीशय महत्त्वाची कार्डे मानली जातात. बाजुच्या साईडबार मध्ये आपण ती कार्ड पाहू शकता.त्याचा अर्थ ही खाली दिला आहे. ही एकुण २२ कार्डे आहेत यांना ० (शून्य ) ते २१ असे नंबर दिलेले आहेत. जीवनातील महत्त्वाचे टप्पे ही कार्ड सांगतात. टॅरो रिडिंग घेताना मेजर कार्ड आली तर काळजीपुर्वक रिडिंग घेण्यात येते. जीवनात महत्त्वाचे बदल/ स्थित्यंतर ही कार्डे दर्शवतात.

ग्रह आणि मेजर कार्डस
रवी - सन कार्ड ( अग्नी तत्त्व )
चंद्र - हाय प्रेस्टिस ( जल तत्त्व )
बुध - मॅजीशिअन ( वायू तत्त्व)
शुक्र - इम्प्रेस ( पृथ्वी तत्त्व )
मंगळ - टॉवर ( अग्नी तत्त्व )
गुरु - व्हिल ऑफ फॉरच्यून ( वायू तत्त्व)
शनी - वल्ड ( पृथ्वी तत्त्व )
प्लूटो - जजमेन्ट (अग्नी तत्त्व )
नेपच्यून - हॅगड मॅन ( जल तत्त्व )
युरेनस - फूल ( वायू तत्त्व)
------------------------------------------------
राशी आणि मेजर कार्ड
मेष - एम्परअर (अग्नी तत्त्व )
वृषभ - हिरोफन्ट ( पृथ्वी तत्त्व )
मिथुन - लवर्स ( वायू तत्त्व)
कर्क - चारिओट ( जल तत्त्व )
सिंह - स्टेन्थ (अग्नी तत्त्व )
कन्या - हर्मीट ( पृथ्वी तत्त्व )
तुळ - जस्टीस ( वायू तत्त्व)
वृश्चिक - डेथ ( जल तत्त्व )
धनू - टेम्परन्स (अग्नी तत्त्व)
मकर - डेव्हील ( पृथ्वी तत्त्व )
कुंभ - स्टार ( वायू तत्त्व)
मीन - मून ( जल तत्त्व )

टॅरो डेक -

आपल्याला माहित आहे की खेळण्यातले पत्त्यांवर जशी वेगवेगळी चित्रे असतात तसेच टॅरो कार्डसही वेगवेगळ्या प्रकारात असतात , यांना टॅरो डेक असे म्हणतात.
उदाहरणा दाखल खालील चित्र पहा . यात व्हील ऑफ फॉरच्युन( महत्त्वाचे कार्ड / मेजर कार्ड नं -1० ) हे कार्ड वेगवेगळ्या डेक मधे कसे असते ते दाखवले आहे. प्रतेक डेक मधे चित्र जरी वेगवेगळे असले तरी कार्डाचा अर्थ मात्र सारखाच दर्शवतो.

खालील चित्रातील डेकची नावे अशी आहेत.
पहिली रांग - डावीकडून
उजवीकडे
१) ऍनिमल टॅरोट २) ऍकवेटीक टॅरोट ३) ब्लू रोझ टॅरोट ४ ) कॉस्मिक ट्राईब टॅरोट ५) गोल्डन राईडर ६) मॅन्शन्स ऑफ द मुन ७) टॅरो ऑफ मार्सीली

दुसरी रांग - डावीकडून उजवीकडे
८) मिस्टीक आर्ट टॅरोट ९) मोर्गर ग्रीर डेक १०) फोनिक्स टॅरोट ११) रुट्स ऑफ एशिआ १२) स्टोन टॅरोट १३) टॅरो ऑफ ड्रिम्स १४) टॅरो ऑफ मार्सीली


शेवटची दोन कार्डे - डावीकडून उजवीकडे
१५) टॅरोट ऑफ द विचेस १६) वल्डट्री टॅरोट

September 9, 2008

टॅरो कार्ड माहिती - व्हिडीओ

टॅरो कार्डांविषयी माहिती देणारा हा व्हिडीओ जरुर पहा

September 8, 2008

टॅरोट म्हणजे काय असते?

आपल्याला सर्वांना खेळण्यातले पत्ते माहित आहेत। एका कॅट मध्ये ५२ पत्ते असतात. तसेच टॅरो डेक ( कॅट) मध्ये एकुण ७८ कार्डे असतात. यात २२ महत्वाची आणी ५६ कमी महत्वाची कार्डे असतात. प्रतेक कार्डावर एक चित्र असते आणी ते एक अर्थ प्रकट करत असते . कमी महत्त्वाच्या ५६ कार्डाचे ४ प्रकार (SUITE ) असतात ( जसे नेहमीच्या कॅट मधे चौकट, बदाम इ) . भविष्य पाहण्यासाठी पाने पिसुन , रॅन्डमली सिलेक्ट केलेली कार्डे एका विशिष्ठ पध्दतिने मांडतात . त्याला स्प्रेड (SPREAD ) म्हणतात. त्या स्प्रेड मधे मांडलेल्या प्रतेक जागा एक अर्थ सुचित करते( जसे आपल्या पत्रिकेतील स्थाने) . आणी त्याजागेवर पडणार्‍या कार्डावरुन भविष्याचा अंदाज व्यक्त केला जातो. हे थोडे लक्षात यायला अवघड आहे. सरतेशेवटी एक उदाहरण देउन हे स्पष्ट केले आहे.
आपण परत एकदा कार्डांची माहिती घेऊ। आधी म्हणल्या प्रमाणे एकुण ७८ कार्डे असतात. या कार्डांचे दोन प्रकारात वर्गीकरण केले आहे१) मेजर कार्डस - ( MAJOR CARDS ) एकुण कार्डे - २२ ( या कार्डाची सुरुवात शुन्य नं ते २१ नं ) - जिवनातील महत्त्वाच्या घटना/ ट्प्पे ही कार्डे सुचीत करतात.२) माइनर कार्डस ( MAJOR CARDS ) एकुण कार्डे - ५६ - जिवनातील दैनंदिन गोष्टी ही कार्ड सुचीत करतात.या ५६ कार्डाचे आणखी ४ प्रकार( SUIT ) पडतात. प्रतेक प्रकारात १४ कार्डे ( जसे एक्का, दुर्री, तिर्री, ४, ५,६,७,८,९,१०, राजकुमारी, राजकुमार, राणी, राजा)

आपल्या नेहमीच्या कॅट्मधे ५२ पत्ते असतात. इथे प्रत्तेक SUIT मधे राजकुमारी ( PRINCE ) चे कार्ड ज्यादा म्हणुन ४ कार्डे ज्यादा अशी ही ५६ कार्डे आहेत.आता आपण प्रत्तेक सुट काय सांगते ते पाहु.


प्रकार( SUIT ) प्रभाव काय सुचवते।
अ) WAND -( किल्वर) अग्नीतत्त्व करियर, बिझनेस, PASSION
ब) CUP - ( बदाम) जलतत्व रिलेशन, भावना , इमोशन , स्वप्न इ
क) SWORD ( इस्पिक ) वायुतत्त्व वैचारिकता,
ड) PENTACLE ( चौकट) पृथ्वीतत्व संपत्ती, पैसा, इस्टेट

इतिहास - १५ व्या शतकात साधारणपणे इटलीमध्ये याचा शोध लावला गेला. काही मतप्रवाहानुसार याचे मुळ इजिप्त मधे आहे. सुरवातीच्या काळात ब्रिज सारखा पत्यांचा खेळ खेळण्यासाठी याचा उपयोग केला जायचा. या कार्डांचा जनक कोण हे आजही खात्रिलायक कुणी सांगु शकत नाही.

टॅरो कसे काम करते?/ पत्ते भविष्य कसे सांगतात?
टॅरो कार्ड्स आपल्याला, आपल्या सध्याच्या परिस्थितीनुसार आपली दिशा योग्य आहे की नाही ( करियर, व्यवसाय, रिलेशन, पैसा, आणि इतर अनेक गोष्टी ज्यासाठी आपण ज्योतिषांकडे जातो) याबाबत मार्गदर्शन करते. आणी त्यावरुन ढोबळमानाने काय घडेल याचा अंदाज बांधता येतो. यातुन आपल्याला धोक्याचे संकेत मिळु शकतात आणी वेळीच योग्य पावले ( कृती) उचलल्यास आपण आपले नुकसान कमी करु शकतो.
आपण आपली कृती बदलली (परिस्थिती बदलली) की येणारे रिझल्ट बदलतात। याचा स्पष्ट अर्थ आहे की इतर जोतिष शास्त्राप्रमाणे या पध्दतीत एखाद्या गोष्टीबाबत असेच घडणार आहे असे भविष्यकथन ( भविष्यवाणी) करणे अवघड आहे. लाईफ लाँग / लाईफ टाईम भविष्य सांगणे अवघड आहे ( टॅरो क्षेत्रातले अभ्यासक कदाचीत असे भविष्य सांगत ही असतील पण मला तरी तसे वाटत नाही)


प्रामुख्याने थोड्या कालावधित ( आज, पुढिल आठवड्यात, २ महिन्यानी ते साधारणतः ५ वर्षापर्यंत ) आपल्या आयुष्यात काय घडू शकते ( करियर, व्यवसाय, लग्न, रिलेशनशिप, पैसा, आणि इतर ) याचा योग्य अंदाज या प्रकारात घेता येतो।
उदा। -- माझा आजचा दिवस कसा जाईल ?-
' हो ' किंवा 'नाही' उत्तर असलेले प्रश्न ( माझे या महिन्यातले टार्गेट पुरे होईल ? माझे आजचे ठरवलेले काम होईल?)
-नोकरीत पुढील १ वर्षात माझी काय स्थिती असेल ? ( सध्या पेक्षा काय प्रोग्रेस आहे?)
- अमुकएक ठिकाणचा प्रवास दौरा कसा होइल? ( काही अडचणी येतील का ?)
- होणारे बाळ मुलगी का मुलगा ( केवळ अंदाज व्यक्तकरण्यासाठी )
- पुढील काही कालावधीत माझ्या आयुष्यात काय घटना घडु शकतात। -

रिडिंग कसे घेतात।
यात ज्याला एखाद्या गोष्टीबाबत जाणुन घ्यायचे आहे त्याने प्रत्यक्ष उपस्थित असणे जास्त चांगले. प्रश्नकर्त्याच्या हातुन कार्ड्स शफल ( पत्ते पिसणे ) करतात. असे म्ह्ट्ले जाते की ज्यावेळी प्रश्नकर्ता कार्डस पिसत असतो त्यावेळी त्या प्रश्नाबाबत प्रश्नकर्त्याच्या मनातील विचार / स्पंदने / एनर्जी त्या कार्डात येते आणि त्याप्रमाणे योग्य कार्ड निवडली जातात आणी त्या कार्डावरील चित्रांवरुन तुम्हाला संदेश / मेसेज / सल्ला/ रिझल्ट दिला जातो.
हेच टॅरोट मेथडचे प्रिन्सिपल / बेस आहे. हे का होते ? कसे होते ? यामागचे शास्त्रिय कारण काय ? हे बरोबर आहे का ? याची माहिती नाही. पण हे असेच आहे. कुणाला याबाबत अधिक माहिती असेल त्यांनी ती अवश्य द्यावी. मलाही काही ज्यास्त माहिती मिळाली तर देईन.
रिडिंग मधे आलेल्या कार्डांचा प्रश्नाशी संबंध लावुन त्याचे योग्य विश्लेषण करणे ही खरी कार्ड रिडरची कसोटी.प्रश्नकर्त्याच्या हाताची एनर्जी त्या कार्डांना लागणे आवश्यक असल्याने फोनवर दुसर्‍यांसाठी रिडिंग घेणे, कॉमप्युटर टॅरो प्रोग्रैम द्वारे रिडिंग घेणे याला मर्यादा येतात आणी कदाचीत रिडिंग चुकु शकते.
कुठलेही रिडिंग घेण्याआधी ७८ कार्डांचे अर्थ माहित असणे आवश्यक आहे।


---------------------------------------------------------------------------

आता आपण कशा पध्दतीने कार्ड्स मांडली जातात ते पाहु. - यात अनेक प्रकारचे स्प्रेड आहेत. आत्ता फक्त एका स्प्रेड ची माहिती देत आहे.भुत, वर्तमान, भविष्य स्प्रेड - यात क्लायंटने प्रश्न विचारुन , टॅरो कार्ड्स शफल करुन कुठलिही ३ कार्डे निवडावी आणी चित्रात दाखवल्याप्रमाणे १-२-३ अशी कार्डॅ मांडावी . यातेल १ ले कार्ड भुतकाळ ( त्या प्र्श्नासंबंधी) , २ रे वर्तमान ( आत्ताची स्थिती) ३ रे कार्ड - भविष्य ( आपली कॄती अशीच चालु राहिली तर त्या प्रश्नासंबंधी जे घडणार आहे ते) दर्शवते.आता या मेथडचा फायदा
समजा मला माझ्या काम करण्याच्या पध्दतीबद्दल माहिती जाणुन घ्यायची आहे. मी ३ कार्डे काढली .समजा ३ रे ( भविष्य ) कार्ड हे २ र्‍या( वर्तमान) कार्डापेक्षा वाईट ( कमी महत्त्वाचे) असले तर हा धोक्याचा सिग्नल समजावा. यातुन असे दिसुन येते की माझ्या आत्ताच्या परिस्थितीपेक्षा अगामी काळात येणारी परिस्थिती चांगली नाही. आणी ही वाइट परिस्थिती मला नको असेल तर आत्ताच्या माझ्या कामात योग्य ते चांगले बदल घडवुन आणणे आवश्यक आहे.
याठिकाणी मी माझ्या सध्याच्या कामात बदल केला तरच परिस्थिती बदलु शकते. हे मला कळले हा या पध्द्तीचा फायदाआता समजा ३ रे कार्ड ( भविष्य )हे २ र्‍या कार्डापेक्षा ( वर्तमानापेक्षा ) चांगले निघाले तर असे समजावे की माझा आत्ताचा मार्ग योग्य आहे आणि त्यात मला सातत्य टिकवायला पाहिजे.
यात या प्रश्नासंबंधी आपला भुतकाळ कसा होता हे १ ले कार्ड सांगते. ओव्हरऑल विश्लेषणासाठी या कार्डाचा उपयोग करतात
मला वाटत. वरील उदा वरुन लक्षात आले असेल की टॅरो कार्डस चा उपयोग प्रामुख्याने मार्गदर्शक म्हणुन जास्त चांगला करता येतो.




भविष्याच्या अंतरंगात !



टॅरो कार्ड विषयी मराठीतून माहिती देणारा हा ब्लॉग नवीन स्वरुपात सादर करताना मला आनंद होत आहे. माझा हा प्रयत्न तुम्हाला नक्कीच आवडेल याबाबत मला अजिबात शंका नाही.
आपल्या सुचना / प्रतिक्रिया पाठवत रहा.

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या