February 17, 2010

आजचे कार्ड - ३ ऑफ स्वॉर्ड

आज सकाळी उठल्यापासून निराश वाटत होते. आवरायला अशीर झाला. नेहमीची ऑफीसला यायची बस चुकली. दुसर्‍या बसमधे जास्तच गर्दी होती. ऑफीसला पोचायला उशीर झाला. इमेल बॉक्स मधे नको असलेल्या कस्टमरचे नको असणारे इमेल्स . साहेबाच्या फालतू मिटिंग्स . भरपुर मनस्ताप. अपेक्षाभंग

वरील सर्व वर्णने ही ३ ऑफ स्वॉर्ड या कार्डासाठी लागू होतात. टॅरो कार्ड मधील हे एक मायनर कार्ड. प्रश्नकर्त्याने रिडिंग घेताना हे कार्ड काढले असता इच्छित प्रश्नाचे नकारअर्थीच उत्तर द्यावे. प्रेमभंग, जवळच्या व्यक्तीकडून दुखावले जाणे, या सर्व बाबतीत हे कार्ड हमखास रिडिंग मधे येते.


थोडक्यात काय सकाळी घरातून निघताना आजचा दिवस कसा जाईल असा प्रश्न विचारुन जर टॅरो कार्ड मधील ३ ऑफ स्वॉर्ड हे कार्ड निघाले तर समजावे की आज काही खरं नाही. आजचा दिवस मनस्ताप देणारा असणार आहे. प्रत्तेक गोष्ट जपून करायला हवी.

3 comments:

वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र मार्गदर्शन शिकवणी वर्ग said...

हे कार्ड निघाले असताना शक्यतो जातकाने मौन पाळायचे असते. जर जमत नसेल तर राहू काळात मौन पाळणे फ़ार गरजेचे आहे. नाहीतर निराश होणार हे १०० टक्के खरे आहे. या कार्डावर मिथुन, तुला, कुंभ राशीचा प्रभाव आहे. उपासना देवता बुध.
संजीव

अमोल केळकर said...

वा संजीव साहेब , क्या बात है !

तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे. टॅरो कार्ड मधील स्वॉर्ड सूट हा वायूतत्त्वाचा सुट आहे. त्यामुळे सहाजिकच तुम्ही उल्लेख केलेल्या वायू तत्त्वाच्या राशी मिथून , तुळ , कुंभ यांचा या कार्डावर प्रभाव अधिक आहे. प्रामुख्याने तुळ राशीतील शनीचा या कार्डावर अधिक प्रभाव आहे. पारंपारिक जोतिष शास्त्रात तुळ रास ही शनीची उच्चीची मानली जाते. आता हे कार्ड आणि तुळेचा शनी याचा परस्पर संबंध काय हे तुम्हीच जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकाल.

वास्तुशास्त्राप्रमाणे टॅरो पध्दतीचा ही आपला व्यासंग दांडगा आहे हे माहित नव्हते. वेळोवेळी असेच मार्गदर्शन करत रहावे ही विनंती

आपला

अमोल केळकर

वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र मार्गदर्शन शिकवणी वर्ग said...

हे कार्ड आणि तुळेचा शनी याचा परस्पर संबंध काय हे तुम्हीच जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकाल.

शनीच्या दृष्टीने ही एक महत्त्वाची राशी आहे, शुक्र वृषभ वा मीन राशीत असल्यास हा शनी चांगली फ़ळे देताना आढळतो. रवि वा मंगळाच्या प्रतियोगात असता त्या प्रमाणात चांगली फ़ळे देत नाही. क्रेंद्रात असताना जास्त चांगला कुंडलीत इतर ग्रहयोग चांगले असल्यास चांगल्या कुटुंबात जन्म देतो व स्वत: उत्तर्धात भाग्योदय करतो. कायदेशास्त्र व इतर शास्त्रीय अभ्यास ह्या दृष्टीने हा शनी चांगली फ़ळे देतो. हे लोक वुद्धीमत्तेने चांगले असतात. चित्रा नक्षत्रात सामाजिक प्रियता, राजकारण, मुत्सद्दीपणा ह्या दृष्टीने चांगली फ़ळे देतो. विशाखा नक्षत्रात ( शुक्र बिघडला असल्यास ) वैवाहिक जीवनात असमाधानकारक फ़ळे देतो हा एक महत्त्वाचा शनी आहे. रवि वा गुरु ह्यांच्या त्रिकोणात असल्यास कुंडलीत भाग्यकारक ग्रह होऊ शकतो.

मी सांगितलेला उपाय म्हणजे शनिचा मित्र ग्रह राहू
ह्याच्या काळात जर शांत राहीले तर निश्चित राहू आपल्या जातकाचे दुख: ओळखुन आपल्या भक्ताला योग्य मार्ग देतो व त्याच्या अंतकरणाचे दुख: दुर करतो.

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या