या कार्डाला विश कार्ड ( इच्छा पुर्ण करणारे कार्ड ) असे म्हणतात. टॅरो कार्ड डेकमधील हे सुध्दा एक चांगले कार्ड आहे. जातकाच्या इच्छापुर्तीचे कार्ड आहे असे म्हणल्यास वावगे ठरु नये. साधारणपणे विवाह, संतती आणि रिलेशन, भावनिकतेसंबंधीचा प्रश्न असता हे कार्ड रिडिंग मधे येते आणि अशावेळी जातकाच्या प्रश्नाच्या दृष्टीने होकारार्थी उत्तर येते. समाधानी, तृप्त, आनंदी व्यक्तीमत्वाचा माणूस या कार्डावर दाखवून एक प्रकारे मिळणार्या उत्तराचा परिणामच दर्शवला आहे.

No comments:
Post a Comment