February 19, 2010

आजचे कार्ड - व्हील ऑफ फॉरच्यून

टॅरो कार्ड मधील २२ मेजर कार्ड पैकी हे एक महत्त्वाचे कार्ड . हे गुरुचे कार्ड आहे. आपल्याकडे असे म्हणले जाते की सुखी सोनाराकडे आणि दु:खी जोतिषाकडे.
जातक जेंव्हा असंख्य प्रश्नांनी त्रासलेला असतो तेंव्हाच तो जोतिषाकडे जातो. यात सर्व प्रकारचे जोतिष मग ते हात पाहून जोतिष सांगणारे असोत, चेहरा पाहून जोतिष सांगणारे असोत, पोपटा मार्फत जोतिष सांगणारे असोत, किंवा सध्याच्या काळात ए.सी मॉलमधे बसून पॅसेज मधे एक छोटासा स्टॉल टाकून टॅरो कार्ड काढणार्‍या सुंदर ललना असोत. थोडक्यात काय समस्येने ग्रासलेल्यालाच जोतिष आणि देव आठवतो.
तर अशा वेळी जातकाच्या प्रश्नासंबंधीत उत्तर देताना व्हील ऑफ फॉरच्यून हे कार्ड रिडिंग मधे आल्यास बदल तोही चांगला बदल घडणार आहे असे समजावे . परिस्थितीत नक्कीच सुधारणा होते. जातकाला सध्या भेसावणार्‍या समस्या पुढील काळात कमी होणे/ सुट्णे यासाठी संबंधीत बदलाची सुरवात होणे असे ही हे कार्ड सुचवते. नवीन संधी , नोकरीतील बदल आणि अपेक्षीत चांगल्या गोष्टी घडवून आणण्यास हे कार्ड समर्थ आहे असे समजण्यास हरकत नाही. ( आमच्या पंतांच्या भाषेत सांगायचे झाल्यास अष्टमाची महादशा संपून जातकाला दशमाची दशा सुरु होण्याची शक्यता / बदल हे कार्ड दर्शवते. )
त्यामुळे की काय टॅरो डेक मधील हे एक महत्त्वाचे आणि रिडिंग मधे हवेहवेसे वाटणारे हे कार्ड आहे.

1 comment:

वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र मार्गदर्शन शिकवणी वर्ग said...

Astrological ruler Jupiter
Key Number 21 cyclical change, good fortune, unexpected difficulties
Numerical Value 9
Hebrew Letter Kaph

हे कार्ड जरी शुभ असले तरी सुद्धा ह्या कार्डात एक अशुभ घटना आहे. सर्व रिर्डस या कार्डाला फ़ार महत्वा देतात. त्याचे बरोबर आहे. पण त्यातील एक गोष्ट महत्वाची आहे. मी फ़क्त त्याची तुम्हाला कल्पना देतो बाकी तुम्ही ठरवा मी येथे लिहणार नाही. ह्या कार्डात एक साप आहे त्याल्या तुम्ही संभाळा?

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या