खुप दिवसापासून अनेक जण या दिवसाची वाट पहात आहेत. ११ नोव्हेंबर ११ . अनेकांनी अनेक प्लॅन्स केलेले आहेत. मात्र चर्चा आहे ती आज जन्मणारी मुले. अनेक जणांनी सिझरींग करुन आपल्या बाळास या दिवशी जन्म द्यायची अनैसर्गीक योजना केली आहे. निसर्ग नियमानुसार ही अनेक जण आज जन्म घेतीलच
एक उत्सुकता म्हणून या तारखेची ११ वाजून ११ मिनिटे ११ सेकंदाची , मुंबई अक्षांश, रेखांशाची पत्रिका काढली आहे. आणि सहजच त्या पत्रिकेतील ठळक गोष्टी पाहिल्या. अभ्यासकही आपले विवेचन करु शकतील
१) आज ११ वा ११ मिनिटानी वाजता ज्यांचा जन्म झाला असेल त्यांची मेष रास असुन नक्षत्र कृतिका असेल . धनु लग्न असेल . (( दुपारे १ वाजून ४३ मि जन्मणार्या बालकाची वृषभ रास असेल )
२) लग्नेश गुरु ( वक्री ) पंचमात , गुरु पासून पंचमात मंगळ पापग्रह ( राशी कुंडलीत पंचमात मंगळ )३) पत्रिकेतील काही योग : - गुरु - मंगळ नवपंचम , चंद्र - शनी षडाष्टक, मंगळ - हर्षल षडाष्टक , बुध -शुक्र युती व्ययात
४) सप्तमेश बुध व्ययात , शनी - मंगळाची बुधावर दृष्टी ( राशी कुंडलीतील सप्तमेश शुक्र जो नवमांश सप्तमेश आहे त्यावर ही शनी -मंगळाची दृष्टी)
८) अष्टमेश चंद्र - कृतीका नक्षात्रात
९) दशमात शनी - दशमेश व्ययात
१०) उमेदीच्या काळात राहू महादशा
जाणकार अधीक मार्गदर्शन करु शकतील -
असो आज जन्म घेणार्या बालकाना ( ११ वाजून ११ मिनिटे ११ सेकंद ) अनेक शुभेच्छा.
No comments:
Post a Comment