December 22, 2011

श्री नवग्रह स्‍तोत्र - मराठी अर्थ




आमच्या स्नेही  वसुधा गोखले यांनी नवग्रह स्तोत्राचा  मराठी अनुवाद  पाठवला आहे. तो सर्वांसाठी इथे देत आहे.


त्यांचे मनःपुर्वक आभार
                        
सूर्य :  जास्‍वंदी फुलाप्रमाणे तांबडी वर्णकान्‍ती असलेल्‍या , कश्‍यकुलोत्‍पन्‍न , प्रखर तेजस्‍वी, अंधकाराचा शत्रू, सर्व पाप नाहीशी करणा-या दिवस नाथ सूर्याला मी वन्‍दन करतो. 

चंद्र :  दही व शंख यांच्‍या तुषाराप्रमाणे शोभणा-या, क्षीरसागरातून निर्माण झालेल्‍या भगवान  शंकराच्‍या मस्‍तकावर अलंकाराप्रमाणे शोभणा-या सशाचे चिन्‍ह धारण करणा-या चंद्राला मी नमस्‍कार करतो .

मंगळ :  पृथ्‍वीच्‍या उदरातून जन्‍म पावलेल्‍या, विजेप्रमाणे अंगकांती असलेल्‍या, हातात शक्‍ति धारण करणा-या, कुमार अवस्‍थेत असणा-या त्‍या मंगळाला मी प्रणाम करतो .

बुध :  अशोकपुष्‍पाप्रमाणे रक्‍त – श्‍यामलवर्ण असलेला अत्‍यंत रूपवान, बुद्धिमान , सोज्‍वळ, सरळ सुस्‍वभावी  बुधाला माझा नमस्‍कार असो.

गुरू : देव व ऋषींचा गुरू, सुवर्णाप्रमाणे कांती असलेल्‍या, बुद्धिमान, त्रैलोक्‍यश्रेष्‍ठ शा त्‍या बृहस्‍पतीला वन्‍दन असो.

शुक्र :  हिमकमळाच्‍या देठाप्रमाणे प्रभा असलेल्‍या, दैत्‍यांचा श्रेष्‍ठ गुरू, सर्वशास्‍त्रज्ञ भृगुकुलोत्‍पन्‍न शुक्राला मी नमस्‍कार करतो.

शनि :  नीलवर्णप्रभा असलेल्‍या , रिवपुत्र, यमाचा मोठा बंधु, सूर्याच्‍या छायेपासून निर्माण झालेल्‍या , त्‍या शनैश्‍वराला माझे वन्‍दन असो .

राहु :  अर्धे शरीर असलेल, वीर्यवान, चंद्रसूर्याला त्रास देणा-या , सिंहिकेपासून जन्‍म पावलेल्‍या  त्‍या राहूला मी वन्‍दन करतो .

केतु :  पळसफुलाप्रमाणे लाल, तारका व ग्रहांमध्‍ये श्रेष्‍ठ , भीतिदायक रूद्राप्रमाणे तापदायक अशा केतूला मी नमस्‍कार करतो .

याप्रमाणे व्‍यासमहर्षींच्‍या मुखातून आलेल्‍या नवग्रहस्‍तोत्राचे रोज दिवसा किंवा रात्री जो एकाग्रतेने पठन करील त्‍याच्‍या विघ्‍नांची शांती होईल.
नर, नारी आणि राजा यांचे दु:ख नाश पावेल आणि त्‍यांचे सर्वश्रेष्‍ठ ऐश्‍वर्य, आरोग्‍य यांची वृद्धी होईल .
ग्रह, नक्षत्र , चोर आणि अग्‍नी यांपासून होणारी पीडा संपूर्ण शांत होईल यात संशय नाही असे महर्षी व्‍यास म्‍हणतात .

No comments:

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या