नाम सदा बोलावे , गावे भावे जनांसी सांगावे
हाचि सुबोध गुरुंचा , नामापरते न सत्य मानावे !!
आज मार्गशीर्ष कृ १०
श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी
करीता नामस्मरण , उपजे सदबुद्धी
आनंद परमावधी रामनाम !!
नाम घेता घेता , जातील अवगुण
रामपदी मन अर्पी सदा !!
मन हे निष्काम , होईल निश्चित
जपता सदोदित राम राम !!
अंतरी शांतता, येईल तत्वता
नित्य वाचे म्हणता , राम राम
अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय !!!
!! श्रीराम जयराम जय जय राम !!
No comments:
Post a Comment