August 22, 2020

धन्य_तुम्हारो_दर्शन_मेरा_मन_रमता

#धन्य_तुम्हारो_दर्शन_मेरा_मन_रमता



खूप छान वाटलं आज. गेल्या ५ एक संकष्ट्या, आणि २० एक मंगळवार तुझ्या दर्शनासाठी आम्ही रांग लावू शकलो नाही. परिस्थितीच अशी आलीय. पण सालाबादाप्रमाणे तू मात्र आज प्रत्येकाच्या घरी एव्हान स्थानापन्न झाला आहेस. जमेल तशी तयारी, सजावट, मिळतील तशी फूले ,फळे, जमेल ते साहित्य घेऊन सगळ्यांनी यथा शक्ती यथा ज्ञाने तुझी सेवा केली आहेच, कुठे काही कमी झालं असलं तरी तू रागावणार नाहीस याची खात्रीच आहे. कारण त्यामागची भावना महत्वाची आहे.

"भाव तिथे देव "

यंदा अनेकांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळाला. अनेकांनी आपल्या हातांनी तुझे ॐ कार स्वरुप घडविले. काहींनी शब्द,काव्य,चित्र, स्वर,हस्तकला या माध्यमातून तुझी सेवा केली. खरं म्हणजे या गोष्टी कळण्यासारख्या असतात पण इतर ही अनेक कलेतून/ गोष्टीतून  इतरांनी तुझी आळवणी केली असेल पण ते सहजा सहजी आमच्या लक्षात आले नाही. पण तुझे आशीर्वाद त्यांच्या पाठिशी नक्की असतील. उगाच नाही ६४ कलांचा तुला अधिपती म्हणतात

यातील काही कला मात्र सध्या थोड्या बदल्यात बरं का बाप्पा , म्हणजे हे माझं मतं.

संपाठ्य ही कला. - म्हणजे
 दुस-याचे बोलणे ऐकून जसेच्या तसे करणे ( या कलेत थोडस बदल झालाय. आज आम्हीफक्त दुस-याचे बोलणे/ लिहिणे जसेच्या तसे पुढे ढकलतो. किंवा नुसतेच हसतो)

"म्लेंछीतकला विकल्प"- परकीय भाषा ठाऊक असणे. 
👆🏻हे मात्र इमाने इतबारे अंमलात आणतोय 

किंवा एकवेळ

 "शुकसारिका प्रलापन"- पोपट व मैना यांना मानवी बोली शिकवणे. इथे पोपट, मैना एवजी  डाॅग, कॅट ला शिकवतोय.

पण बाप्पा या गडबडीत समभाषीक मित्रांबरोबर स्वभाषेत बोलणे/ लिहिणे हेच विसरलोय.जिथे तिथे परकीय भाषा एकमेकांशी संभाषणात पण.

बाप्पा गेल्या काही महिन्यात 'चित्रशब्दापूपभक्षविपाक क्रिया' 
( उत्तम स्वयंपाक करणे)  ही कला ही अनेकांनी करुन दाखवली मुख्य म्हणजे घरातील प्रत्येकाने या कामात हिरिरीने भाग घेतला. त्यातही मध्यंतरी डॅल्गोना काॅफीची " पानक रस तथा रागषाडव योजना" - (सरबत व इतर पेय तयार करणे) ही कला ही अनेक कलाकारांनी शिकून घेतली.

देवा, या ६४ कलांचा उल्लेख कुठल्या क्रमाने घ्यायचा याची कल्पना नाही पण दोन तीन संदर्भ बघितले असता

५६ नंबर वर 💪🏻 . नाट्य आख्यायिकादर्शन-  असं होतं. 

हे वरच उदाहरण म्हणजे 
वाचणा-यांसाठी एक "प्रहेलिका" च आहे. त्याचा अर्थ  या कलेचे खरे "भक्तच" जाणतील 😎

विनायका,
  "वैनायिकी विद्याज्ञान","अभिधान कोष छंदोज्ञान", "मानसी काव्यक्रिया " ," दुर्वाच योग" या कलेमधे तुझ्या कृपेने गोडी लागो ही सदिच्छा मात्र
" पुष्पशकटिका निमित्त ज्ञान " कलेत मात्र तुझ्या कृपेने यश मिळो ही तुझ्या चरणी प्रार्थना

या असंख्य कलेत प्राविण्य मिळवलेले कलाकार , यांची सुरवात ही एखाद्या गणेशोत्सव मंडळाच्या कार्यक्रमातून तुझ्या कृपा-आशिर्वादानेच झाली असणार यात शंका नाही.

यासगळ्यांवर तसेच आमच्या सारख्या "शब्द-कारांवर" तुझा वरद-हस्त कायम राहो.

तुझे नुसते दर्शन झाल्यावर मनातील सर्व इच्छा पुर्ण होतात म्हणूनच तुझ्या आरतीत 
" दर्शन मात्रे नाम कामनापुर्ती" असे म्हणले आहे.

वय्यक्तिक मागणे जसे सर्वजण तुझ्याकडे करतीलच तसेच सर्वजण आज संपूर्ण  'विश्वाचे मंगल ' होऊ दे आणि सध्याचे संकट टळू दे ही मागणी ही करत असतील.

योग्य वेळी तू सर्वांना म्हणणारच आहेस "तथास्तु " 🙏🏻🌺

📝अमोल केळकर
भाद्रपद शु. चतुर्थी

#सादर करितो कला गजमुखा

August 18, 2020

गीतरामायणातील निवेदन 📝 भाग ५

गीतरामायणातील निवेदन 📝

भाग ५
---------------------------
"सावळा ग रामचंद्र"
- महाराणी कौसल्येचा 'सावळा रामचंद्र ' दिसामासांनी वाढला.बालवयातच त्याने धनुर्विद्या आत्मसात केली.धार्मिक ग्रंथ अभ्यासले.आता तो राज्यसभेंत येऊन बसूं लागला. त्याच्या समवेत लक्ष्मणादि त्याची लहान भावंडेंही निष्णात झालीं.एके प्रसंगी,राजा दशरथ पुत्रांसहवर्तमान राजसभेंत बसला असतां,महर्षी विश्वामित्र तेथे आले. राजाने त्यांचे आनंदाने स्वागत केले,आणि नम्रपणे विचारले, " मुनिवर्य, काय कार्य असेल तें सांगा, मी तें सर्वस्वी शेवटास नेईन."
राजाच्या ह्या भाषणाने अत्यंत हर्षित होऊन विश्वामित्र म्हणाले-

🎼 जेष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा
यज्ञ-रक्षणास योग्य तोचि सर्वथा

क्रमश:
----------------------------------------
देवा तुझ्या द्वारी आलो🙏🏻🌺
kelkaramol.blogspot.com


गीतरामायण हे आधुनिक शतकातील 'महाकाव्यच'. गदिमा आणि सुधीर फडके यांनी  या महाकाव्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे . यातील अनेक गाणी आपणाला तोंड पाठ आहेत. या गाण्यांबरोबरच दोन गाण्यांचे एकत्र गुंफण करणारे आणि गाण्याबद्दलची पार्श्वभूमी सांगणारे तितकेच छान निवेदन. तर प्रत्येक गाण्याआधी सादर झालेल्या निवेदनाची ही क्रमशः मालिका 
प्रभू श्रीरामचरणी अर्पण 🙏🏻🚩
----------------------------------------

August 12, 2020

जय श्री कृष्ण

जय श्री कृष्ण 🙏🏼🚩🙏🏼


हुशार आणि practical मानतो आपण कृष्णाचा अवतार !

जिथे धर्म रक्षणासाठी हिंसा आवश्यक आहे तिथे तो गरबा खेळत नाही बसला,

जिथे युद्धासाठी क्षात्र वृत्ती जागवायची होती तिथे तो कौरवांच्या हृदय परिवर्तनाची वाट नाही बघत बसला,

त्याने यदा यदा ही धर्मस्य.. सांगितलं 

म्हणजे तुम्ही घरात तुमच्या पुरत बघा, बाकी धर्म वगैरे मी बघून घेतो नव्हे ,

तर जेव्हा जेव्हा धर्मावर आक्रमण होईल तेव्हा तेव्हा तुम्हाला कृष्ण अवतार धारण करावा लागेल , हे आपल्याला उमजाव लागेल.

अश्याच एका आजच्या कृष्णाची, राजीव मल्होत्राची, ही मुलाखत बघा - एका माजी लष्करी आणि intelligence खात्यात काम केलेल्या ऑफिसर बरोबर 

( खालील दुव्यावर टिचकी मारल्यास, मुलाखत ऐकता/पाहता येईल)











- अंबरीश कुलकर्णी, पुणे

August 11, 2020

गीतरामायणातील निवेदन 📝 भाग ४

. गीतरामायणातील निवेदन 📝

भाग ४
---------------------------
"त्यांच्या पोटी जन्मा येतिल योध्दे चार महान "
- हे यज्ञपुरुषाचें वचन खरें ठरलें. त्या पायसच्या सेवनाने दशरथाच्या तिन्ही राण्या गर्भवती झाल्या.यथाकांली त्या प्रसूत झाल्या.कौसल्येला श्रीराम, सुमित्रेला लक्ष्मण आणि शत्रुघ्न, कैकयीला भरत असे चार पुत्र झाले. राजाची इच्छा पूर्ण झाली. प्रसादांतील सुखाला सीमा राहिल्या नाहींत. नगरजनांचा आनंद तर, नुसता भरुन ओसंडत होता. श्रीरामादिक भावंडे रांगूं लागली,तरीहि अयोध्येतील स्त्रिया श्रीरामजन्माचे आनंदगीतच गात होत्या....
पुन: पुन: गात होत्या...
🎼
दोन प्रहरिं,कां ग शिंरी सूर्य थांबला?
राम जन्मला-ग सखी- राम जन्मला

या आनंदगीतांतच अयोध्या मग्न होती. प्रासादांत,श्रीराम दिसामासांनी वाढत होते.ते आतां चालूं लागले होते. बोबडे बोबडे बोलूं लागले होते. महाराणी कौसल्या, भगिनीसमान असलेल्या सवतींना कौतुकाने सांगत होती-
🎼
सावळा ग रामचंद्र...

क्रमश:
----------------------------------------
देवा तुझ्या द्वारी आलो🙏🏻🌺
kelkaramol.blogspot.com


गीतरामायण हे आधुनिक शतकातील 'महाकाव्यच'. गदिमा आणि सुधीर फडके यांनी  या महाकाव्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे . यातील अनेक गाणी आपणाला तोंड पाठ आहेत. या गाण्यांबरोबरच दोन गाण्यांचे एकत्र गुंफण करणारे आणि गाण्याबद्दलची पार्श्वभूमी सांगणारे तितकेच छान निवेदन. तर प्रत्येक गाण्याआधी सादर झालेल्या निवेदनाची ही क्रमशः मालिका 
प्रभू श्रीरामचरणी अर्पण 🙏🏻🚩
----------------------------------------

August 10, 2020

गीतरामायणातील निवेदन 📝 भाग ३

गीतरामायणातील निवेदन 📝

भाग ३
---------------------------
"उगा कां काळिज माझे उलें?  पाहुनी वेलीवरची फुले"
- महाराणी कौसल्या अशा चमत्कारिक मन:स्थितींत असतांनाच, महाराज दशरथ अंत:पुरांत आले. आपल्या लाडक्या राणीला ते सांगूं लागले.
🎼
उदास कां तू?  आंवर वेडे,
 नयनांतिल पाणी
लाडके, कौसल्ये राणी.

सरयूतीरीं यज्ञ करुं गे, मुक्त करांनी दान करुं
शेवटचा हा यत्न करुं गे, अंतीं अवभृत स्नान करुं
इप्सित तें तो देईल अग्नि,अनंत हातांनी


" इप्सित तें तो देईल अग्नि,अनंत हातांनी"
- या इच्छेने दशरथाने यज्ञाश्व सोडला,पुढें एका संवत्सरानंतर तो यज्ञीय अश्व परत आला.राजा दशरथाच्या विनंतीनुसार ऋष्यशृंगानें यज्ञ मांडला.एका शुभवेळी यज्ञीय ज्वालेंतून एक रक्तवर्ण महापुरुष प्रकट झाला,आणि दुंदुभीसारख्या कणखर पण मधुर सादानें तो राजा दशरथाला म्हणाला-

🎼
दशरथा, घे हें पायसदान
तुझ्या यज्ञिं मी प्रगट जाहलों हा माझा सन्मान

क्रमश:
----------------------------------------
देवा तुझ्या द्वारी आलो🙏🏻🌺
kelkaramol.blogspot.com


गीतरामायण हे आधुनिक शतकातील 'महाकाव्यच'. गदिमा आणि सुधीर फडके यांनी  या महाकाव्याला एका वेगळ्याच. उंचीवर नेऊन ठेवले आहे . यातील अनेक गाणी आपणाला तोंड पाठ आहेत. या गाण्यांबरोबरच  दोन गाण्यांचे एकत्र गुंफण करणारे आणि गाण्याबद्दलची पार्श्वभूमी सांगणारे तितकेच छान निवेदन. तर प्रत्येक गाण्याआधी सादर झालेल्या निवेदनाची ही क्रमशः मालिका 
प्रभू श्रीरामचरणी अर्पण 🙏🏻🚩
----------------------------------------

August 9, 2020

गीतरामायणातील निवेदन 📝 भाग २


---------------------------
*श्रीरामांच्या यज्ञमंडपात,प्राणांच्या सर्व शक्ती कर्णांच्या ठायीं एकवटून श्रोतेजन ऐकत आहेत*. *सुवर्ण- सिंहासनावर बसून,प्रत्यक्ष श्रीराम* 
*ऐकत असताना तापस - वेष परिधान केलेले राजपुत्र कुश आणि लव रामचरित्राचे गायन करीत आहेत*
🎼
सरयू- तीरावरी 
अयोध्या मनुनिर्मित नगरी

राजसौख्य ते सौख्य जनांचे
एकच चिंतन लक्ष मनांचे
काय काज या सौख्य,धनांचे?
कल्पतरुला फूल नसे का? वसंत सरला तरी


*"कल्पतरुला फूल नसे का? वसंत सरला तरी"*
 *प्रजाजनांना सर्व सुखांनी न्हाऊ घालणा-या दशरथाच्या घरात पाळणा हलू नये, हा केवढा दैवदुर्विलास! अयोध्येच्या प्रत्येक जाणत्या प्रजाजनाच्या मनात हा प्रश्ण वारंवार उठत होता मग दशरथाच्या राण्यांची काय अवस्था असेल? कौसल्या,वरुन ग्रीष्मकालीन नदीसारखी थोडी अशक्त, तरीही शांतच होती.पण मनात ती काय म्हणत होती?*
🎼
उगा कां काळिज माझे उलें
पाहुनी वेलींवरची फुलें

क्रमश:
----------------------------------------
देवा तुझ्या द्वारी आलो🙏🏻🌺
kelkaramol.blogspot.com

गीतरामायण हे आधुनिक शतकातील 'महाकाव्यच'. गदिमा आणि सुधीर फडके यांनी  या महाकाव्याला एका वेगळ्याच. उंचीवर नेऊन ठेवले आहे . यातील अनेक गाणी आपणाला तोंड पाठ आहेत. या गाण्यांबरोबरच दोन गाण्यांचे एकत्र गुंफण करणारे आणि गाण्याबद्दलची पार्श्वभूमी सांगणारे तितकेच छान निवेदन. तर प्रत्येक गाण्याआधी सादर झालेल्या निवेदनाची ही क्रमशः मालिका 
प्रभू श्रीरामचरणी अर्पण 🙏🏻🚩

गीतरामायणातील निवेदन भाग १

गीतरामायणातील निवेदन 📝

गीतरामायण हे आधुनिक शतकातील 'महाकाव्यच'. गदिमा आणि सुधीर फडके यांनी  या महाकाव्याला एका वेगळ्याच. उंचीवर नेऊन ठेवले आहे . यातील अनेक गाणी आपणाला तोंड पाठ आहेत. या गाण्यांबरोबरच दोन गाण्यांचे एकत्र गुंफण करणारे आणि गाण्याबद्दलची पार्श्वभूमी सांगणारे तितकेच छान निवेदन. तर प्रत्येक गाण्याआधी सादर झालेल्या निवेदनाची ही क्रमशः मालिका 
प्रभू श्रीरामचरणी अर्पण 🙏🏻🚩

----------------------------------------
भाग १:

श्रीरामचंद्राच्या अश्वमेध यज्ञासाठी, अयोध्येत माणसांचा महासागर जमला होता.तापसवेष धारण केलेले दोन बटु मंडपात आले. ते म्हणाले,

"आम्ही महर्षी वाल्मिकीचे शिष्य आहोत. आम्ही रामचरित्र गायन करतों ".

श्रीरामांना माहीत नव्हतें की आपल्यासमोर आपल्या चरित्राचें गायन करणारे हे बटु आपलेच पुत्र आहेत.
🎼
स्वयें श्रीरामप्रभू ऐकती
कुश लव रामायण गाती

क्रमश:
----------------------------------------
देवा तुझ्या द्वारी आलो🙏🏻🌺
kelkaramol.blogspot.com

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या