December 22, 2020

गुरु- शनी युती

.गुरु - शनी भेट
//
शनीदेवाच्या भेटी
गुरु महाराज आले
हा रंगला सोहळा! मकरेत!

जाहली दोघांची, सहा अंशी भेट
कर्माचे ते भाग्य, लाभस्थानी

गुरु म्हणे देवा, तुझे कर्म थोर
साडेसातीचे सार, दाखवू दिले

शनीदेव म्हणे, एक ते राहिले
तुला जे पूजीले, क्षणोक्षणी 

पुढे गुरुला म्हणती,तुझ्या तीन दृष्टी
ज्या वर पडती, तो पुण्यवान

गुरु म्हणे महाराज, वृथा हे कौतुक
अहंकाराची बात, तुम्ही जाणो

एक एक ग्रह, आपुल्याच घरी
ठेऊन अंतरी , दृष्य पाहे

दोघे मिळोनिया, राहती काही निशा
कवतिक आकाशा, आवरेना


//
🪐🌕
आज २१ डिसेंबरला  गुरू-शनि युती मकर राशीत म्हणजेच शनीच्या गृही होत आहे. कालपुरुषाच्या कुंडलीत 'गुरु' हा भाग्य स्थानाचा (९) तर 'शनी' कर्म स्थानाचा (१०)कारक ग्रह आहे.

कर्माला, भाग्याची साथ मिळाली की अनेक गोष्टीत सुयश  मिळते. दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या असतात
जसे उत्तम गीतकाराला , उत्तम संगीतकाराची साथ मिळाली की एक छान आविष्कार ऐकायला मिळतो अगदी तसेच. यातील एकजण जरी कमी पडला तरी अपेक्षित परिणाम साधत नाही.

ही गुरू-शनि  युती तुम्हा सर्वांच्या आयुष्यात आपले कर्म आणि आपले भाग्य याचा एकत्रीत चांगला परिणाम घडवून आणो ही सदिच्छा 🙏💐

(शुभेच्छूक ) अमोल
२१/१२/२०

No comments:

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या