काल ५ जून २०११ रोजी मराठी ब्लॉगर्स स्नेह-मेळावा दादर येथे दादर सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात संपन्न झाला. या निमित्याने नेहमी केवळ अभासी जगात वावरणार्या अनेक मित्रांना प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला.

या मेळाव्यास जेष्ठ नागरिकांपासून ते आजच्या तरुण पिढीचे सर्व वयोगटातील ब्लॉगर्स उपस्थित होते. सर्वांनी आपापल्या ब्लॉगची थोडक्यात ओळख करुन दिली. त्यानंतर कायदेतज्ञ श्री राजीव साहेब यांनी उचलेगिरी, लेखन चोरी तसेच ब्लॉगवर लिहिण्याची भाषा यांबंधी अत्यंत चांगले, उपयुक्त मार्गदर्शन केले.
सर्व संबंधीत आयोजकांचे आभार
(फोटो सौजन्य : श्री महेंद्र कुलकर्णी )
No comments:
Post a Comment