April 19, 2012

उर्ध्वमुखी नक्षत्र - झेपावले क्षेपणास्त्र




आज भारताने अग्नी - ५ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करुन दाखवली. चिन सारख्या राष्ट्राला ही याची दखल घ्यावी लागली. भारतीय तंत्रज्ञान आणि त्यासाठी झटणारे असंख्य हात, डोकी यांचा या यशात मोलाचा वाटा आहे यात शंका नाही.


जोतिष शास्त्राच्या दृष्टीने विचार करता आज अग्नी ५ जेंव्हा झेपावले तेंव्हा शनीचे उत्तरा भाद्रपदा हे नक्षत्र होते. पुर्वजानी शास्त्रात असे सांगीतले आहे की एखादी गोष्ट एखाद्या नक्षत्रावर केली असता चांगले यश येते.


साधारणत: वरच्या दिशेने करावयाची कामे ही उर्ध्वमुखी नक्षत्रांवर करावीत . उत्तरा फाल्गुनी,उत्तराषाढा, उत्तरा भाद्रपदा, रोहिणी, पुष्य, आर्द्रा, श्रवण, धनिष्ठा, शततारका यांना उर्ध्वमुखी नक्षत्र म्हणतात.घर, भव्यवास्तू, तोरणे बांधणे, इ. कामाची सुरवात या नक्षत्रांवर केली जाते


आत्तापर्यंत जी जी यशस्वीपणे अंतराळात क्षेपणास्त्रे किंवा याने पाठवली आहेत ती बहुतांशी उर्ध्वमुखी नक्षत्रावरच गेली आहेत.



1 comment:

उर्ध्वमुखी ऋद्राक्ष said...

मला तरी वाटते की ज्योतिष शास्त्रास अंधश्रद्धा ठरवू पाहणाऱ्या खगोल आणि अंतराळ मःशास्त्रज्ञांनी ह्याची स्टॅटिस्टीकल गणगोत तपासणी केली तर कित्ती चांगले होईल, पण त्यांना तसे करा म्हणून सांगणार कोण... कोण बांधणार त्या मांजराच्या गळ्यात ही घंटा...?

नाहीतर उगाच धु-राळा उडवून काय उपेग नाय...

हरिः ॐ

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या