May 25, 2016

संकष्टी चतुर्थी - टेकडी गणेश , नागपूर

संकष्टी चतुर्थी - २५/५/२०१६

वेगवेगळ्या ठिकाणच्या गणेशाची माहिती संकलीत करण्याच्या उद्देशाने चालू केलेल्या या लेखन मालेच्या आठव्या भागात आज आपण माहिती घेऊ नागपूर मधील टेकडीवरच्या गणपतीचीप्रत्येक गावाची ग्रामदेवता असते. नागपूरचे दैवत म्हणजे टेकडी गणेश. नागपूरचा हा गणपतीही खरं तर वरद विनायक पण, तो ओळखला जातो तो टेकडी गणेश म्हणून. नागपूरच्या मध्यभागी असलेल्या सीताबर्डी टेकडीवर ही गणेशमूर्ती आहे. सध्याचे मंदिर अलीकडचे असले तरी मूर्ती प्राचीन आहे. नागपुरात रेल्वेने आले की आधी दर्शन होते ते या गणेशाचे. मुख्य रेल्वे स्थानकापुढील टेकडीच्या उतारावर हा गणाधीश आहे. 

संकट निवारक

नागपूरचा आद्य गणपती अशी टेकडी गणेशाची ओळख आहे. मनोकामना पूर्ण करणारा, इच्छित फल देणारा, संकट निवारक अशी भाविकांची श्रद्धा आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणून या गणपतीची ख्याती आहे

उजव्या सोंडेची बैठी मूर्ती

शुक्रवार तलाव आज मंदिरापासून बराच दूर आहे. पण एक काळ असा होता की, हा तलाव मंदिराच्या पायथ्यापर्यंत होता. भोसले राजे नौकेतून गणेश दर्शनासाठी येत. टेकडीवर भोकरीच्या झाडाखाली ही मूर्ती उघड्यावर होती. याठिकाणी पूर्वी मोठे मंदिर होते, परंतु मुस्लिम राजवटीत ते उद्ध्वस्त झाले. त्याचे अवशेष आजही दिसतात. मंदिराच्या आसपास वड-पिंपळाची झाडे आहेत. त्यामुळे परिसर निसर्गरम्य वाटतो. ही मूर्ती उजव्या सोंडेची असून संपूर्ण मूर्ती पूर्वी स्पष्ट दिसायची. आता शेंदुराच्या पुटांमुळे हे काही दिसत नाही. बैठ्या स्वरूपाची ही मूर्ती साडेचार फूट उंच व तीन फूट रूंद आहे. मूर्तीच्या मागे पिंपळाचे झाड आहे. त्याच्या मुळांमुळे मूर्ती मूळ जागेहून थोडी पुढे सरकली असावी, असा तर्क आहे.

१२व्या शतकातील मंदिर

नागपूरचा इतिहास अतिशय प्राचीन आहे. येथे नाग नदीच्या परिसरात छोटी गावे होते. त्यांना टोली म्हणायचे. आजही नागपुरातील अनेक वस्त्यांची नावे, कुंभारटोली, मरारटोली अशी आहेत. सीताबर्डी भागात गवळ्यांची टोली होती. या टेकडीवर महादेवाची तसेच काही गणपतीची मंदिरे असल्याचा उल्लेख सापडतो. आजही टेकडीवर टेकडी गणेशसह फौजेचा गणपतीही आहे. सीताबर्डी भागात गवळ्यांसह गोसावी लोकही राहायचे. त्यांचे राम अन् हनुमानाचे मंदिर गणेश मंदिराच्या पायथ्याशी आहे. आज प्रसिद्ध असलेल्या टेकडीवरील गणेश मंदिराचा जिर्णोद्धार वाकाटकांच्या आणि नंतर यादवांच्या काळात झाला होता. १२व्या शतकात हेमाद्री पंडितांनी हे मंदिर बांधले होते. हे मंदिर प्राचीन असल्याचा आणखी एक पुरावा म्हणजे शिलालेख. सध्या हा शिलालेख नागपूरच्या अजब बंगल्यात आहे. हा शिलालेख सीताबर्डीत सापडलेल्या एका कोरीव स्तंभावर लिहिलेला आहे. या शीलालेखावर, जमीन गाई चराईकरिता देवस्थानला दिल्याचा उल्लेख आहे. सहावा विक्रमादित्य याच्या कार्यकाळात तो लिहिला गेला. शके १००८ वैशाख शुद्ध ३ प्रभवनाम संवत्सर असा या शीलालेखाचा काळ दिला गेला आहे.


विविध सामाजिक उपक्रमांमध्ये या मंदिराचा नेहमीच सहभाग राहिला आहे. 

माहिती : संकलीत ( महाराष्ट्र टाईम्स 

यापूर्वीचे भाग :
भाग १- कसबा पेठ गणपती ( मानाचा पहिला ) , भाग २- तासगावचा गणपती   , भाग ३ - दशभूजा गणपती हेदवी  ,  भाग ४ - वाईचा ढोल्या गणपती  ,  भाग ५- सांगलीचा संस्थानाचा गणपती   , भाग ६ - टिट्वाळा महागणपती   भाग ७ -  सारसबाग गणपती 
For blog article on whatsapp contact on 9819830770

No comments:

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या