आज पर्यंत सांगलीच्या बाहेर ज्या देवस्थानाचे दर्शन
घ्यायचा योग आला त्यात सगळ्यात जास्त भेट दिलेले देवस्थान असेल
नरसोबावाडी. आज अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर दत्तगुरुंचे दर्शन झाले .
मात्र
आज पहिल्यांदाच शिरोळ जवळील 'दत्तगुरु भोजनपात्र मंदीर येथे जायचा योग
आला ( श्री दत्तप्रभूंच्या हाताच्या ठशांची पूजा होत असलेले
महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण )
याबाबतची आख्यायिका अशी :
दत्तगुरुंचे द्वितीय अवतार श्री नृसिंह स्वामी महाराज यांचे १२ वर्ष वाडी
परिसरात तपासाठी वास्तव्यास होते. एकदा ते भिक्षा मागण्यासाठी शिरोळला
श्री गंगाधरपंत कुलकर्णी यांच्या कडे आले . त्यांच्या गृहिणीने
महाराजांसाठी जोंधळ्याच्या कण्या शिजवल्या. मात्र कण्या वाढण्यासाठी घरी
पात्र नव्हते . हे जाणून महाराजांनी एक पाषाण आणला त्यावर प्रोक्षण करून
प्रणव) ॐ ) लिहून भिक्षा वाढण्यास सांगितले.
या पाषाणास दुधाचा अभिषेक केल्यानंतर दत्ताप्रभूंच्या हाताचे ठसे स्पष्ट दिसतात For blog article on whatsapp contact on 9819830770
No comments:
Post a Comment