' देवा वाचलो तुझ्या कृपेने ' काही शेकडा अभागी मुंबईकर सोडून लाखो मुंबईकरांचा मनात येणारे हे विचार. प्रतेक वेळेला ती १००-२०० माणसे बदलणार बाकी सर्व परिस्थीती आहे ती. काल दादर, झवेरी बाजार, ओपेरा हाउस . ऊद्या काय ??????? हा प्रश्न मनात घेऊनच तमाम मुंबईकर सकाळी ऑफीसला निघणार. मनात हाच विचार अरे कबुतरखान्याच्या त्या बस स्टॉप वर आतापर्यंत हजारो वेळा आपण गेलो आलो आहोत. काल आपण नव्हतो ही देवाची कृपा. परमेश्वरा सांभाळ रे असेच.
आजच्या धो धो पडणा-या पावसाने सगळे पुरावे नष्ट होतील मात्र तमाम मुंबईकरांच्या मनातील भीती अधिकच गडद होईल. आता अतिरेक्यांचे वाढदिवस, शुक्रवार, १३ तारिख या सर्वांचे मिडिया पुरेपुर विश्लेष्ण करुन विट आणेल. प्रश्ण तसेच राहतील, उद्या काय या प्रश्णाचे उत्तर अनुत्तरितच राहिल. चौकशी समिती, रिपोर्ट, मुख्यमंत्र्याचे जनतेल आव्हान, हे अगदी नेहमी प्रमाणे जसे अगदी मागल्या वर्षीचा पेपर आहे तसा परत.
ज्या क्षणी सरकार ताब्यात असलेल्या अतिरेक्यांना ताबडतोब फासावर लटकत नाही तोपर्यंत वचक रहाणार नाही. आणि ज्या वेळेला हे घडेल त्यावेळेला तमाम मुंबईकर हा सोहळा शिवजयंती तसेच गणपती उत्सव सारखाच साजरा करेल.
खालचे वाक्य अजून कितीदा लिहावे लागणार देव जाणे !
या स्फोटात मृत झालेल्या व्यक्तिंच्या आत्म्याला शांती लाभो. माझी विनम्र आदरांजली !!
No comments:
Post a Comment