June 12, 2012

रात्र वै-याची आहे ....


  दहावीत ९५ % टक्के किंवा त्यापुढे मार्क मिळाले नाहीत तर आपल्या पाल्याला उज्वल भवितव्य नाही
 असा समज कुणीही पालकानी ( इथून पुढे काही दिवस तरी ) करु नये.

 ( ग्रहांची ) दशा बदलली की दिशा ही बदलते. असो

याबबतीत आम्ही मात्र एकदम नशिबवान होतो. दहावी , बारावी ( किंवा कुठलीही परिक्षा असो)  आमची गाडीने कधीच ८० % चा धक्का गाठला नाही. रडत रखडत आम्ही ७० -७५ च्या स्पीडनेच जायचो. म्हणून आमच्या आई - वडिलांनी कधीच नाके मुरडली नाहीत किंबहूना प्राप्त परिस्थीत योग्य  संधीचा विचार करुन पुढे जाण्यास प्रोत्साहीत केले. त्यामुळे अगदी फ्री सीट मधे ( डोनेशन न देता ) आम्ही इंजीनिअरींग, एम बी ए झालो. २० वर्षापुर्वी  १० वीचा रिझल्ट लागला तेंव्हा कुढल्या तरी वृत्तपत्राच्या कार्यालयातून मार्क समजले  आणि पडलेल्या कमी मार्कामुळे थोडा मुड गेला होता. (  मार्क मुदामच सांगत नाही, अगदी मराठी विषयात ही काठावर पास झालो होतो ). त्यावेळी चांगले आठवते काकांनी संध्याकाळी पेढे घेऊन सांगलीच्या गणपतीला आणि केळकर महाराजांकडे आशीर्वाद घेण्यासाठी नेले होते.  जे मिळाले नाही त्याचे दु:ख करत बसू नये अधीक जोमाने पुढील प्रयत्न करावेत , नाउमेद होउ नये ही शिकवण लहानपणा पासून मिळत गेली. असो उद्याच्या दहावीच्या निकालानिमित्याने हे सगळं आठवले.

आणखी एक,  उद्या संपुर्ण दिवस बुधाचे नक्षत्र आहे. वार बुधवार आहे. बुध जोरदार पणे रुलिंग मधे आहे. शासनाची निकाल सांगणारे संकेतस्थळ  उघडायला उशीर होणे, संकेतसथळ उघडण्यासाठी २-३ वेळेला प्रयत्न केल्यावर पेज येणे, वारंवार नंबर टाकून ही निकाल न दिसणे, अनवधानाने चुकीचा निकाल फिड झाला असणे, निकालात चुका असणे असे प्रकार घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ संकेत स्थळावरील निकालावर विसंबून राहू नये. प्रत्यक्ष गुण पत्रिका पडताळून पहावी.


समस्त दहावीच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांचे पुढील भवितव्य घडवण्यात महत्त्वाची भुमिका पार पाडण्यात सज्ज झालेल्या पालकांना अगामी लढाईसाठी हार्दीक शुभेच्छा

( शुभेच्छूक ) अमोल केळकर

No comments:

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या