August 20, 2012

अधिक मास


गोवर्धनधरं वन्दे  गोपालं गोपरुपिणं !
गोकुलोत्सवमीशानं  गोविंदं  गोपिका प्रेयम् !!

( गोवर्धन पर्वत धारण करणारा, गोपरुपी, गोपाळ, गोकुळाला आनंद देणारा, गोपिकांना प्रिय  अशा श्रेष्ठ  गोविंदाला मी नमस्कार करतो. )
------------------------------------------------------------------------------------

आपले चैत्र, वैशाख , जेष्ठ , आषाढ  इ.  बारा महिने  हे चांद्रमास होत.  चांद्रमासाचे  दिवस सुमारे २९  II  भरतात
याप्रमाणे बाराचांद्रमासाचे  ३५४ दिवस  ( एका चांद्र वर्षाचे )  असतात

एका  सौर वर्षाचे  ३६५  दिवस असतात  (  सुर्याचे भ्रमण )

चांद्र मास आणि सौरमास यांचा मेळ असावा म्हणून  दर तीन वर्षानी  एक अधिक मास येतो

( चांद्र व सौरमासाचे वर्ष या दोहोत ११ दिवसाचे अंतर असते, हे अंतर भरुन यावे म्हणून सुमारे ३२ II महिन्यांनी  एक अधिम महिना धरतात )

-------------------------------------------------------------------------------------------
चैत्रापासून  अश्विनपर्यंत जे सात महिने, त्यापैकीच बहुत करुन  एखादा अधिक मास असतो.  क्वचित फाल्गुन देखील येतो. पौष व माघ  हे मात्र कधीच अधिक नसतात. स्थूल मानाने  बत्तीस महिने , १६ दिवस इतका काळ गेल्यानंतर अधिक मास येतो.
एकदा आलेला अधिक मास प्रायः पुनः  १९ वर्षांनी येतो. 

सध्या अधिक भाद्रपद चालू आहे.

---------------------------------------------------------------------------
अधिक मासाची  जन्म कथा ( पौराणीक )

एकदा महातपस्वी  भगवान नारायण  लोककल्याणासाठी तपश्चर्या  करीत बसले असताना नारदमुनी तेथे आले  व म्हणाले , ' हे तपस्वी श्रेष्ठा , दरवर्शी फक्त बाराच महिने असतात. मग दर तीन वर्षांनी हा तेरावा महिना का ?  कृपया  या महिन्याची उत्पती कशी झाली  ते सांगावे

तेंव्हा नारायण  म्हणाले,  हे मुनीवर्या, विश्वाचे कल्याण अगर  अकल्याण हे  सत्कर्माच्या आणि दुष्कर्माच्या  प्रमाणावर अवलंबून असते. आजकाल दुष्कृत्याचेच प्रमाण वाढल्यामुळे  ते पाप आपल्याला सहन होत नाही अशी बाराही महिन्यांची केंव्हा पासूनची तक्रार होती.  या पापाचे जड ओझे  बारा महिन्यांच्या पोटात  मावेनासे झाले. त्यामुळे बाराही महिन्यांनी  आपापल्या पोटातील  पापाचा फक्त तिसराच हिस्सा बाहेर काढून टाकला आणि आपला पापभार कमी केला.

 परंतु बाराही महिन्यांनी काढून  टाकलेल्या  त्या पापभागांपासून  तेरावा महिना , म्हणजेच अधिक मास उत्पन्न झाला.  तो पापमय असल्याने त्याला मलिन मास किंवा मलमास असे नाव पडले.  पुढे श्री विष्णुंच्या आणि पुरुषोत्तम श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने  तो पवित्र ' पुरषोत्तम मास'  बनला.

या अधिक मासात तीर्थयात्रा, तीर्थ स्नान , दान धर्म , पूजा - अर्चा , जप वगैरे धर्माचरण केल्याने  जीवनाचे सार्थक होते.

No comments:

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या