August 8, 2012

षष्ठ स्थान - आरोग्य



 पत्रिकेतील षष्ठ स्थानावरून  माणसाला होणा-या रोगा संबंधी भाष्य कराता येते. त्या स्थानात जी रास असते , तसेच तिथे जे ग्रह असतात  त्यावरुन  भविष्यातील रोगा संबंधी अनुमान काढता
 येते

रास आणि ती रास दर्शवत असलेला रोग

मेषराशी   -  डोक्याशी संबंधीत रोग  उदा.  डोके दुखणे, झोप न येणे, , मेंदुचे विकार,  इ

वृषभ राशी   - घशाचे विकार , टॉन्सिल  इ, माने संबंधी विकार

मिथुन राशी -   फुप्फुस , श्वास नलिका,  रक्ता संबंधी  विकार,

कर्क रास  -  पचनसंस्था, छाती, स्तन यास्म्बंधीत आजार

सिंह रास -  पाठ , पाठीचा कणा, हृदय विकार यास्म्बंधीचे आजार

कन्या रास -  पोट ,  अपचन , लहान आतडे, मोठे आतडे  यावर या राशीचा अवलंब आहे

तूळ रास - मधुमेह , किडनीचे रोग

वृश्चिक रास - मुळव्याध , गळवे, गुप्त रोग, प्रजननसंस्था, गुदद्वार

धनु राशी  - क्षय रोग,  यकृताचे रोग , रक्त संबंधीत रोग, नितंब , मांड्या

मकर रास -  गुढगे, सांधे दुखी , त्वचा रोग

कुंभ रास - पाय घोटे,  रक्ताभिसरण संबंधीत, पायाचीए हाडे

मीन रास :  शरीरातील पाण्यासंबंधीत रोग, पावलांचे रोग, अस्वच्छतेने होणारे रोग इ


(  महाराष्टाचे लाडके नेते  श्री  विलासराव देशमुख  यांच्या पत्रिकेत  षष्ठ स्थानात तूळ रास असून  ती त्यांची जन्म रास आहे.  नवमांश कुंडलीत  षष्ठ स्थानात  कन्या रास येते . नवमांश षष्ठेश  ' बुध '   मुळ पत्रिकेत ( लग्न कुंडलीत )  व्ययस्थानात  शत्रू राशीत आहे.   तसेच त्यांना  शुक्र महादशा (  षष्ठ स्थानाची )  चालू आहे . गोचरीने शनी  नुकताच तुळ राशीत  आला आहे , राशी स्वामी  शुक्र  जो स्वतः षष्ठेश आहे तो मंगळा बरोबर  मीन राशीत ( उच्चीचा ) आहे  तसेच द्वितीयातील शनीची दहावी दृष्टी  शुक्रा वर आहे . नवमांश कुंडलीत  शुक्र, चंद्र , बुध व्ययात आहेत
श्री विलास रावांच्या  प्रकृतीस लवकर आराम पडो ही सदिच्छा  )

No comments:

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या