August 30, 2012

अंगारकी चतुर्थी व्रतकथा




  येणा-या ४ सप्टेंबरला  अंगारकी चतुर्थी आहे . यानिमित्याने करायची पूजा / व्रतकथा  इथे वाचा


( वरील चित्रावर टिचकी मारा )



 https://docs.google.com
open?id=0B5QD3AkyOSlITGo5Mm5QeTVnNG8

अंगारकी  चतुर्थीकथा

अंगारकी चतुर्थी  म्हणजे मंगळवारी येणारी  वद्य चतुर्थी.  ही फार महत्त्वाची मानली जाते.  मुदगल  पुराणात व गणेश पुराणात  यासंबंधीचे कथानक असे आहे
अवंती नगरीत  वेदवेत्ते  व सद्गुरु  अग्निहोत्री ऋषी  भरद्वाज रहात होते. ते गणेश भक्त होते. क्षिप्रा नदीवर  ते एकदा स्नानाला गेले असता  एक अप्सरा जलक्रीडा करीत होती. तिला पाहून  भरद्वाजांचे तेज द्रवीभूत झाले.  ते पृथ्वीने धारण केले .  तिला न्ण्तर जो पुत्र झाला  तो जास्वंदीच्या फुलासारखा लाल होता  पृथ्वीने तो  सात वर्षाचा झाल्यावर  त्या ऋषींच्या स्वाधीन केला. त्यांनी त्याचे  उपनयन केले, त्याला वेद शिकविले व गणेशमंत्र देऊन  उपासना करायला सांगितले.  मग तो मुलगा अरण्यात गेला. त्याने एक सहस्त्र वर्षे तप केले  गनेश प्रसन्न झाला व त्याने मुलाला दर्शन देऊन इष्ट वर मागण्यास सांगितले.  तो मुलगा म्हणाला , "  मला स्वर्गात राहून अमृतप्राशन करावयाचे आहे. माझे नाव त्रैलोक्यात विख्यात व्हावे. आज जी चतुर्थी आहे , ती सर्वांना कल्याणकारी होवो ". गणेशाने त्याला वरदान दिले
" मुला, तुझे नाव भूमिपुत्र म्हणून भौम, अंकारकासारखा तू लाल आहेस म्हणून अंकारक व शुभ करण्याची तुला शक्ती असेल म्हणून ' मंगल '  असेही प्रसिध्द  होईल.  या चतुर्थीला अंकारकी म्हणतील  व ती व्रती माणसांना ऋणमुक्त  करणारी आणि  पुण्यप्रद होईल.  तुला आकाशात ग्रहांमधे स्थान मिळेल  व तू अमृतपान करशील " 
तो वार मंगळवार व ती  चतुर्थी माघातील वद्य चतुर्थी होती
गणेशाच्या वरदानामुळेच अंकारकी चतुर्थीला अत्यंत महत्त्व आहे.

No comments:

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या