August 24, 2012

॥ श्री मनाचे श्लोक ॥२॥

  जय जय रघूवीर  समर्थ  !!

॥ श्री मनाचे श्लोक ॥२॥
मना सज्जना भक्तिपंथेचि जावें।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥
जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें।
जनीं वंद्य ते सर्व भावे करावे॥२॥

 अर्थ : - हरि हे नाव कृष्णाला वापरतात, विष्णु वापरतात. मग श्रीरामदास पहिल्या श्लोकाचा अखेरचा राघवाचा पंथ दुसऱ्या श्लोकात श्रीहरिपर्यंत कसा मिळवतात? रामाचा पंथ, घेता घेता हा हरि अचानक कोठून आला? राम आणि हरि एकच स्वरूपाचे आहेत, असे स्वामी रामदासांन
ा म्हणावयाचे असेल, तर मग रामाचेच नाव त्यांना कायम ठेवले नाही? उत्तर एवढेच आहे की, तसे ते पुढे ठेवले आहे. पण आरंभाला अनेकतत्वातील एकता मनावर ठसवणे आवश्यक होते, ते येथे केले आहे. दुसऱ्या श्लोकात सुरूवातीलाच भक्तीमार्गाचा उपदेश कशासाठी केला आहे? आपण गीता,गाथा, ज्ञानेश्वरी, मनाचे श्लोक भक्तिमार्गाचे म्हणतो. तितकेच ते ज्ञानमार्गाचेही आहेत. भक्ती तर एका श्लोकात, एका ओळीत, एक शब्दात संपते. समजावून सांगणे आणि त्यातून अनुभव निर्माम करणे, हे ज्ञानाचे काम आहे. मग त्याच्या सुरूवातीला भक्तीचा डंका कशासाठी? तर अखेर कोणत्याही ज्ञानासाठी, भक्तीची काही आवश्यकता असते. एखादा विद्यार्थी सुरूवातीला ‘अ’ हा ‘अ’ सारखाच का काढायचा, आणि ‘ड’ सारखा का काढायचा नाही, हे विचारु लागला तर शिक्षकांना शिकवता येणार नाही. म्हणून काही गृहीतकृत्ये, काही भक्ती, सुरूवातीलाच आवश्यक आहे. इतके सांगितल्यावर श्रीरामदास मनाला आळवण्यासाठी मनाच्या अभ्यासाठी, मनाला वळवण्यासाठी, मन शुद्ध करण्यासाठी सर्व प्रथम अट सांगतात ती सत्कृत्याची, जनसेवेची, जनरंजनाची. रामाने जन्मभर असे जनरंजन केले. लहानपणी राजविलास सोडून विश्वामित्राच्या यज्ञ रक्षणासाठी तो रानात गेला आणि आयुष्याच्या अखेरीला जनापवादासाठी सीता सहवासाच्या सुखाचा त्याने यज्ञ पेटवला. उत्तरकांड, सर्ग सत्याण्णव, श्लोक चार. त्या आधी सीतेच्या पातिव्रत्याची ग्वाही अग्निदेवाने दिली. युद्धकांड, सर्ग एकशे अठरा, श्लोक पाच ते अकरा. तेथेच श्लोक सतरामध्ये राम लोकांच्या खात्रीसाठी दिव्य अवश्य होते, असे म्हणतो. सीता पवित्र आहे हे अग्नीचे म्हणणे राम नाकारीत नाही. दुसऱ्या सीतात्यागानंतर लोकापवादासाठी राम सीतास्वीकार दूर ठेवतो, सीतेबद्दलच्या मूलभूत संशयामुळे नव्हे, (उत्तरकांड, सर्ग एकशेसत्त्याण्णव, श्लोक चार). राम असो किंवा कृष्ण. त्याचे जीवन लोककल्याणप्रधान होते. म्हणून या दुसऱ्या श्लोकाताली हरिशी एकरूप होऊन तिसऱ्या श्लोकाचा आदर्श म्हणून राम प्रकट झाला आहे.

No comments:

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या