Showing posts with label श्री मनाचे श्लोक. Show all posts
Showing posts with label श्री मनाचे श्लोक. Show all posts

September 16, 2012

॥ श्री मनाचे श्लोक ॥८॥

॥ श्री मनाचे श्लोक ॥८॥

देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी।
मना सज्जना हेचि क्रीया धरावी॥
मना चंदनाचे परी त्वां झिजावे।
परी अंतरीं सज्जना नीववावे॥८॥







अर्थ : - एका तत्वज्ञान्याने म्हटले आहे की, जन्माला आलास तेव्हा तू रडत होतास आणि इतर माणसे हसत होती. जन्मभर असा वाग की, तू मरताना इतर लोक रडत असतील, आणि तू हसत असशील. जन्मल्यापासून मरेपर्यंत माणसाची शक्ती सतत जात असते. माणूस सतत म्हातारा होत असतो. तो द

ुर्बख होत असतो. झिजत असतो. हे जर खरे, तर मग ते झिजणे स्वार्थासाठी का म्हणून? एकादा चोर ’ चोरी’ करून तुरूंगात गेला तर त्याचे कोणी कौतुक करीत नाही पण तो चार जणांच्या कामासाठी, देशासाठी तुरूंगात गेला तर त्याचे कौतुक होते. त्याच्या कुटुंबाला समाज नाना तऱ्हेची मदत करतो. नि:स्वार्थ हा एक प्रकारचा उत्कृष्ट स्वार्थ आहे. कारण त्याने कालांतराने स्वार्थ साधतो आणि त्यात नि:स्वार्थाचे चालू सुखही मिळते. नि:स्वार्थामध्ये थोडे कष्ट पडले, तरी त्यातून तीन फायदे होतात. मन शांत राहते. नंतर नि:स्वार्थ कामाचे कौतुक होते आणि अखेर भौतिक लाभही काही कमी पडतो असे नाही. मात्र या गणिती हिशेबाचा नि:स्वार्थ नसावा. खरीखुरी, कळकळीची शंाती आणि नि:स्वार्थ असावा.

September 13, 2012

॥ श्री मनाचे श्लोक ॥७॥



मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावे।
मना बोलणे नीच सोशीत जावें॥
स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे।
मना सर्व लोकांसि रे नीववावें॥७॥




अर्थ : - माणसाचा घात भित्रेपणाने जेवढा केला असेल तेवढा दुसऱ्या कशानेही केला नसेल. माणूस जर खरे बोलायला भिणार नाही, असुखाला भिणार नाही. भुकेलासुध्दा भ्यायचे नाही का? हा प्रश्र्न चटकन सोडवता नाही आला, तरी त्यातले भिणे संपवले पाहिजे. भुकेचे दु:ख जावे म्हणून प्रयत्न करावा. पण त्य

ातून भीती उणी करावी. भीती आणि प्रयत्न यात पुष्कळ फरक आहे. प्रयत्न चालू ठेवाव आणि भिणे संपवत आणावे. श्री रामदासांना सातव्या श्लोकात याच जातीने श्रेष्ठ धारीष्ट्य हवे आहे. या खालोखाल त्याच जातीची त्यांची सूचना निंदा सोसण्याची आहे. धारीष्ट्य उंच असावे, ते किती उंच? तर नीचातल्या नीच माणसाने बोललेले अपशब्दसुध्दा, त्या उंचीवर घायाळ करू शकणे अशक्य व्हावे. निंदा सोसणे, हेच मुळी एक उच्च प्रकारचे धैर्य आहे आणि या अर्थाने पहिली ओळ आणि दुसरी ओळ एकाच मतलबाची म्हणता येईल. वास्तविक व्यवहारात होते असे की, लोकांचे खरे बोलणेचे आपल्याला निंदेसारखे वाटत असते. आपण चुकलो माणसाला कधी सहन होत नाही आणि मग तो दुसऱ्याने सांगितलेल्या सत्यालाच ’निंदा’ म्हणू लागतो. यावर स्वामी रामदासांनी मेख मारून ठेवली की, मुळात तू खोटी निंदासुध्दा सहन करायला शीक. निंदेलासुध्दा तुझे उत्तर नम्र असावे, त्याने लोक संतुष्ट होतील. आत्मविचार प्रवृत्त होतील आणि केव्हातरी त्यांचेही कल्याण होईल. कानावर पडेल ती निंदा असह्य मानली आणि हात उगारला, तर व्यवहारात कधी शेराला सव्वाशेर भेटतात. पूर्वी उचलेला हातही कापला जातो.

September 5, 2012

॥ श्री मनाचे श्लोक ॥६॥

॥ श्री मनाचे श्लोक ॥६॥
नको रे मना क्रोध हा खेदकारी।
नको रे मना काम नाना विकारी॥
नको रे मना सर्वदा अंगिकारू।
नको रे मना मत्सरु दंभ भारु॥६॥






अर्थ : - राग हा चांगल्या हेतून धरला, तर त्यात वाईट काय आहे असा प्रश्र्न नेहमी पडतो. मुलगा खोटे बोलू लागला तर रागावू नये का? त्याने अभ्यास वेळेवर केला नाही तर रागावू नये का? मित्राला उसने दिलेले पैसे त्याने वेळेवर परत केले नाहीत, तर त्याला गोडीने सांगून काय उपयो

ग आहे? ते रागाचे कैवारी बिनतोड प्रश्र्न विचारण्याच्या अभिमानात उभे ठाकतात. मुलगा खोटे बोलते, ते बरोबर नाही. पण या मुलाला खोटे बोलायला कोणी शिकवले? प्रथम मुलगा खोटे बोलला तेव्हा आई-वडील किंवा मोठी माणसे कोणीतरी त्याचे कौतुक करतात आणि त्यातून त्या मुलाला खोट्याची चटक लागते. खोटे बोलण्याचे फायदे चटकन दिसतात. म्हणून त्याचा मोह आवरत नाही, मोठ्या माणसांना तो आवरत नाही, तर लहान मुलांना कसा आवरणार? आणि आपल्याच गुणाचे अपरिहार्य प्रतिबिंम मुलात दिसल्यावर मागून रागावून उपयोग काय? निदान जोपर्यंत आपण सत्यसंकल्प धरत नाही, तोपर्यंत राग किंवा रागाचे सोंग हासुध्दा दुटप्पीपणा आहे. आणि म्हणून तो बरोबर नाही. त्याच्या अलीकडला कामविकार तर सर्व विकाराचे मूळ. अर्थात् येथे त्याचा अर्थ वासनात्मक काम असा विस्तृत घ्यायवयास हवा. विकारांची दोन अंगे रामदासांनी तिसऱ्या व चौथ्या ओळीत सांगितली आहेत. ती म्हणजे मद आणि मत्सर आपल्यापेक्षा मोठ्या माणसाच्या कर्तबगारीबद्दल जी असूया वाटते, तिचे नाव मत्सर. आणि आपल्यापेक्षा धाकट्या माणसाच्या चुकीबद्दल जी तुच्छता वाटते तिचे नाव मद. हे दोन्ही विकार चुकीचे आहेत आणि अनावश्यक आहेत. आपली कर्तबगारी ही कणाकणानेच वाढत असते. तेव्हा खालच्याबद्दल तुच्छता दाखवू नये आणि त्याच कारणाने वरच्यबद्दल मत्सर बाळगू नये, हा मनाला केलेल गोड उपदेश आहे. काम क्रोध विकाराचे दुष्परिणाम गीतेच्या बासष्ट, त्रेसष्ठाव्या श्लोकात दाखवले. त्या विकारापासून मुक्ती ही परमशांती म्हणून सांगितली. आणि ती शांती न मिळवलेल्या माणसाबद्दल सहासष्ठावा श्लोक सांगतो, की विकारशून्य स्थिरबुध्दी नसेल, त्याला सुखशांती मिळणार नाही.

August 24, 2012

॥ श्री मनाचे श्लोक ॥२॥

  जय जय रघूवीर  समर्थ  !!

॥ श्री मनाचे श्लोक ॥२॥
मना सज्जना भक्तिपंथेचि जावें।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥
जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें।
जनीं वंद्य ते सर्व भावे करावे॥२॥

 अर्थ : - हरि हे नाव कृष्णाला वापरतात, विष्णु वापरतात. मग श्रीरामदास पहिल्या श्लोकाचा अखेरचा राघवाचा पंथ दुसऱ्या श्लोकात श्रीहरिपर्यंत कसा मिळवतात? रामाचा पंथ, घेता घेता हा हरि अचानक कोठून आला? राम आणि हरि एकच स्वरूपाचे आहेत, असे स्वामी रामदासांन
ा म्हणावयाचे असेल, तर मग रामाचेच नाव त्यांना कायम ठेवले नाही? उत्तर एवढेच आहे की, तसे ते पुढे ठेवले आहे. पण आरंभाला अनेकतत्वातील एकता मनावर ठसवणे आवश्यक होते, ते येथे केले आहे. दुसऱ्या श्लोकात सुरूवातीलाच भक्तीमार्गाचा उपदेश कशासाठी केला आहे? आपण गीता,गाथा, ज्ञानेश्वरी, मनाचे श्लोक भक्तिमार्गाचे म्हणतो. तितकेच ते ज्ञानमार्गाचेही आहेत. भक्ती तर एका श्लोकात, एका ओळीत, एक शब्दात संपते. समजावून सांगणे आणि त्यातून अनुभव निर्माम करणे, हे ज्ञानाचे काम आहे. मग त्याच्या सुरूवातीला भक्तीचा डंका कशासाठी? तर अखेर कोणत्याही ज्ञानासाठी, भक्तीची काही आवश्यकता असते. एखादा विद्यार्थी सुरूवातीला ‘अ’ हा ‘अ’ सारखाच का काढायचा, आणि ‘ड’ सारखा का काढायचा नाही, हे विचारु लागला तर शिक्षकांना शिकवता येणार नाही. म्हणून काही गृहीतकृत्ये, काही भक्ती, सुरूवातीलाच आवश्यक आहे. इतके सांगितल्यावर श्रीरामदास मनाला आळवण्यासाठी मनाच्या अभ्यासाठी, मनाला वळवण्यासाठी, मन शुद्ध करण्यासाठी सर्व प्रथम अट सांगतात ती सत्कृत्याची, जनसेवेची, जनरंजनाची. रामाने जन्मभर असे जनरंजन केले. लहानपणी राजविलास सोडून विश्वामित्राच्या यज्ञ रक्षणासाठी तो रानात गेला आणि आयुष्याच्या अखेरीला जनापवादासाठी सीता सहवासाच्या सुखाचा त्याने यज्ञ पेटवला. उत्तरकांड, सर्ग सत्याण्णव, श्लोक चार. त्या आधी सीतेच्या पातिव्रत्याची ग्वाही अग्निदेवाने दिली. युद्धकांड, सर्ग एकशे अठरा, श्लोक पाच ते अकरा. तेथेच श्लोक सतरामध्ये राम लोकांच्या खात्रीसाठी दिव्य अवश्य होते, असे म्हणतो. सीता पवित्र आहे हे अग्नीचे म्हणणे राम नाकारीत नाही. दुसऱ्या सीतात्यागानंतर लोकापवादासाठी राम सीतास्वीकार दूर ठेवतो, सीतेबद्दलच्या मूलभूत संशयामुळे नव्हे, (उत्तरकांड, सर्ग एकशेसत्त्याण्णव, श्लोक चार). राम असो किंवा कृष्ण. त्याचे जीवन लोककल्याणप्रधान होते. म्हणून या दुसऱ्या श्लोकाताली हरिशी एकरूप होऊन तिसऱ्या श्लोकाचा आदर्श म्हणून राम प्रकट झाला आहे.

August 23, 2012

॥ श्री मनाचे श्लोक ॥ १॥

 जय जय रघूवीर  समर्थ  !!

' श्री समर्थ रामदास स्वामी '  या नावाने फेसबूक वर   एक अत्यंत सुंदर पेज  आहे. समर्थांबद्दलच्या  माहितीचा खजीनाच या ठिकाणी मिळतो.  या पेजवर   ' मनाचे श्लोक ' च्या प्रतेक  ओवीचा / अध्यायाचा  सोपा अर्थ विषद केला आहे.

या पेजवरील उपयुकत माहिती  इथे ब्लॉगवर देऊ का ?  अशी विंनंती त्यांना केल्यावर त्यानी  ताबडतोब ही विनंती मान्य केली  ( त्यांनी अजूनही आपले नाव सांगीतले नसल्याने  त्यांचे नाव इथे लिहू शकत नाही )   त्यांचा मी शतशः आभारी आहे.

----------------------------------------------------------------------------------------------------------
॥ श्री मनाचे श्लोक ॥ १॥

गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा।
गमूं पंथ आनंत या राघवाचा॥१॥





अर्थ : - मनाचा मूलभत विचार भारतीय संस्कृतीने वेदापासून केला आहे. मनाचे श्लोक हे मनाबद्दल सूक्ष्म विचार करणारे एक अभिमानाचे स्थळ आहे. सूक्ष्म आणि भव्य. इंद्रियाचा मनावर परिणाम सांगणारे आणि मनाचा इंद्रियांवर परिणाम सांगणारे. भव्यता अशी की, मनाचे श्लोक दोनशे पाच आहेत. पण सूक्ष्मता अशी की, मनाचे सूक्ष्म रूप पहिल्याच श्लोकात सांगून संपले आहे. ओमकाराने उपनिषद सुरू झाले, असे म्हणतात. जाणत्याच्या लेखी ते तेथे संपलेही आहे. विनोबाजी ‘स्थितप्रज्ञ दर्शन’, पान पाचवर म्हणतात, ‘पातंजलाच्या एकशेपंच्याण्णव सूत्रांपैकी पहिल्या तीन सूत्रांतच सर्व शास्त्र सांगून संपले आहे.’ त्याच सूक्ष्मतेने मनाचे श्लोक पहिल्या श्लोकात संपले. त्यात त्यांनी काय सांगितले ते पहा. गुण हे निर्गुण झाले. मन हे आत्मरुप शुद्ध झाले. म्हणजे आरंभाचा शेवट झाला. ज्ञानाची, शारदेची उपासना हेच सांगेल. राममार्ग हीच गोष्ट सिद्ध करील. मनाच्या श्लोकाचा विस्ताराने अभ्यास ही एक आनंददायक आणि संस्कारमय गोष्ट आहे. त्याच्या पहिल्या श्लोकाचा हा साक्षात्कार सूक्ष्म आणि गोड आहे. मनाचे विकल्प बाजूला ठेऊन आनंद मिळवा. म्हणजे शांती मिळेल आणि रामदर्शनाचा दरवाजा उघडेल. रामदर्शनाचा दरवाजा उघडेल. राम हरिचे रहस्यसुद्धा पाहण्याजोगे आहे
गण = इंद्रियें. अधीश = स्वामी. गुण = त्रिगुण व त्यांचीं सारीं लक्षणें. ईश = स्वामी. मुळारंभ = मूळ पुरुष = ईश्वर. चत्वार – चार. गमणें = दर्शवणें, समजावून देणें. राघवाचा = ईश्वराचा.

इंद्रियांचा स्वामी व सर्व गुणांचें अधिष्ठान तसेंच निर्गुणाचा आरंभ असणारा मूळपुरुष असा जो गणेश त्यास आ
णि चारहि वाणींचें मूळ असणारी शारदा, या दोघांना मी नमस्कार करतो. अनंत ईश्वराच्या दर्शनाचा मार्ग मी समजावून देतों.

श्रीसमर्थांनी केलेले हे मंगलाचरण आहे. त्यांत ज्ञानस्वरुप ईश्वरास आणि शक्तिस्वरुप शारदेस वंदन केलें. ईश्वरस्वरुपाचा अनुभव तीन पातळींवर येतो. मन व इंद्रियें यांचा प्रेरक हृदयस्थ आत्मा हा पहिला अनुभव. विश्वभर पसरलेल्या त्रिगुणांच्या विस्ताराला जिवंत ठेवणारा विश्वात्मा हा दुसरा अनुभव. अनंत विश्वें निर्माण करण्याचें सामर्थ्य व स्वातंत्र्य असून हेंच विश्व निर्माण करण्याचा मूळ संकल्प करणारा मूळ पुरुष अथवा सच्चिदानंदस्वरुप ईश्वर हा तिसरा अनुभव. त्याच्यापुढें निर्गुणांचे क्षेत्र आरंभतें. येथे अनुभवाची भाषा संपते.

ईश्वराची अंगें दोन – ज्ञान आणि सामर्थ्य. सामर्थ्य शक्तिमय असते. परा, पश्वन्ती, मध्यमा, वैखरी या चार वाणींच्या रुपाने माणसांत ते प्रगटते. ग्रंथकाराला ग्रथंरचनेसाठी दोन्ही अंगाचीं आवश्यकता असते. ओंकाररुपाने सर्वां घटीं व्यापून राहणारी शारदा सर्व मानवी कतृत्वाचे मूळ आहे, तिचा हात धरुन माणूस अर्थमय जगतांत प्रवेश करतो आणि तिच्याच प्रेरणेने तेथून निर्गुणाची ओळखण करण्याइतका अनुभवसंपन्न होऊं शकतो,

श्री समर्थांचा अनंत राघव म्हणजे सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, सगुणनिर्गुणपरमात्मा.

मानवीजीवनातील प्रवास व त्यांचे पंथ पुष्कळ आहेत. परंतु इंद्रियांपासून सुरु होणारा आणि हृदयस्थ आत्म्यापाशीं संपणारा आंतील प्रवास सर्वात अधिक लांबचा आहे. स्वसंवेद्य व आनंदमय अंतरात्म्यापर्यंत हमाखास पोचवणारा मार्ग श्रीसमर्थ येथें स्वानुभवाच्या आधारानें सांगत आहेत.

जय जय रघुवीर समर्थ !

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या