१५ फेब्रुवारी, २०१३

परीक्षेची भीती जाऊन यश प्राप्ती साठी उपाय

  फेब्रुवारीच्या  उत्तरार्धात  बारावीची परीक्षा सुरु होत आहे तर मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून  दहावीची परीक्षा सुरु होत आहे.
दहावी , बारावी परीक्षा सुरु झाली की ख-या अर्थाने आपल्या कडे परिक्षांचा मौसम सुरु होतो ते  थेट  मे / जून पर्यंत चालणा-या इंजिनिअरिंगच्या  परीक्षेपर्यंत चालू राहतो

परीक्षा म्हणली की  अगदी हुषार मुलांच्या पोटातही गोळा येतो . अनेक जण अभ्यासात खुप हुषार असतात. संपुर्ण वर्षभर चांगला अभ्यास केलेला असतो. पण ऐन परीक्षेत मात्र मानसिक दडपण येऊन  पेपर सोडवता येत नाही, आठवत नाही,  अशा प्रकारची तक्रार अनेक पालक करताना आढळतात . यासाठी एक सोपा उपाय याठिकाणी देत आहे.   
सदर उपाय/ तोडगा श्री विजय हजारी यांच्या ' भाव - नवमांश रहस्य ' या पुस्तकातून घेतला आहे.

अर्थात परीक्षेतील यश हे मुख्यतः केलेला अभ्यास आणि सोडवलेला पेपर यावरचअवलंबून असून  केवळ तोडगा करुन ( अभ्यास न करता/ पेपर न देता )  परीक्षेत यश  नक्कीच मिळणार नाही. मात्र पेपर सोडवण्याची भीती नष्ट व्हायला या तोडग्याची मदत होते. सदर तोडगा दर सहा महिन्यांनी करावयास हरकत नाही


विद्यार्थ्याने परीक्षेच्या अगोदरचे  ३ शनिवार  सूर्यास्तानंतर  एका मातीच्या पणतीत गोडेतेल घेऊन  त्यात आपला चेहरा साधारणतः मिनिटभर एकाग्रतेने पहावा व ते तेल  मारुतीच्या  / शनीच्या मंदिरात जाऊन  तेथील समईत व्हावे ( मारुतीच्या अंगावर बिल्कूल वाहू नये)

या वरील उपायामुळे परीक्षेची भीती नष्ट होते व परीक्षेत उत्तम यश लाभते. याबरोबरच 
सरस्वती द्वादशनामावलीही दररोज एकदा  वाचावी त्याने बुध्दी तल्लख होण्यास वाचलेले लक्षात रहाण्यास मदत होते  ( ही नामावली इथे ब्लॉगवर आहे )

सर्वांना परीक्षेतील यशासाठी शुभेच्छा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या