आज जरा वेगळ्या विषयावर लेख : स्वत:चीच परीक्षा म्हणा ना !
एक प्रश्ण पडलाय , एका स्पर्धेत भाग घेतलाय
खूप दिवसापासून एका स्पर्धेच्या निकालाची वाट पहात आहे. रुलिंग प्लेनेट्च्या मदतीने त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलाय. बघू बरोबर येतोय का अंदाज
आज २ जून २०१५
वेळ १२ वाजून १५ मिनिटे
आताच्या वेळेला खालील ग्रहांचा अंमल आहे
लग्न : सिंह - रवी
नक्षत्र - अनुराधा - शनी
राशी - वृश्चिक - मंगळ
दिवस - मंगळवार - मंगळ
निकाल हा साधारणपणे लागायला पाहिजे होता पण अजून लागला नाही . घटना येत्या काही दिवसात घडणे अपेक्षित आहे , त्यामुळे चंद्राचे भ्रमण पाहू
( चंद्र नक्षत्र आणि राशी स्वामी हे दोन्ही रुलिंग मध्ये असलेले कॉम्बीनेशन हुडकायचे आहे )
आज चंद्र ' अनुराधा ' या शनीच्या नक्षत्रात आहे, उद्या तो जेष्ठा या ' बुधाच्या नक्षत्रात असेल .
' बुध ' रुलिंग मध्ये नाही ( वर उल्लेख केल्याप्रमाणे रवी , शनी , मंगळ हेच ग्रह रुलिंग मध्ये आहेत )
चंद्र त्यानंतर ' मुळ ' नक्षत्रात जाईल, मुळ नक्षत्राचा मालक ' केतू ' ही रुलिंग मध्ये नाही . त्यानंतर चंदाचे भ्रमण होईल पु. षाढा नक्षत्रातून - इथे पु. षाढा नक्षत्राचा मालक ' शुक्र ' ही रुलिंग मध्ये नाही
त्यांतर येणा-या उ.षाढा नक्षत्रात चंद्र येईल त्याचा मालक ' रवी ' रुलिंग मध्ये आहे पण त्याचे पहिले चरण धनू राशीत येते आणि ' गुरु ' रुलिंग मध्ये नाही
उ.षाढाच्या २ - चरणात चंद्र आला की तो मकर राशीत येईल
इथे रवी ( उ.षाढा नक्षत्राचा मालक ) आणि शनी ( मकर राशीचा मालक ) दोनही रुलिंग मध्ये आहेत
पण ' शनी ' रुलिंग मध्ये आला की पहिले कॉम्बीनेशन सोडायचे असा नियम आहे
पुढे चंद्र श्रवण नक्षत्रात असेल इथे , श्रवण नक्षत्राचा मालक ' चंद्र ' रुलिंग मध्ये नाही . पुढे चंद्र धनिष्ठा नक्षत्रात येईल धनिष्ठा नक्षत्र - मालक ' मंगळ ' आणि मकर रास - मालक ' शनी ' दोघेही रुलिंग मध्ये आहेत , हा दिवस असेल रविवार ७ जून . चंद्र संध्याकाळी ४. नंतर धनिष्ठा नक्षत्रात येत आहे . अर्थात रविवारी निकाल लावला जातोच असे नाही
सोमवारी दुपारी ३ पर्यंत धनिष्ठा नक्षत्र आहे ( सोमवारी पहाटे ३. नंतर ' कुंभ रास चालू होते, मात्र कुंभ राशीचा मालक ही शनीच आहे ) त्यामुळे रविवार संध्याकाळी ४ ते सोमवार दुपारी ३ पर्यंत निकाल लागेल अशी अपेक्षा
असो , जेंव्हा केंव्हा निकाल लागेल तेंव्हा इथे अवश्य कळवीन , अगदी तारीख चुकली असेल तरी
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
८ जून २०१५
आत्ता या क्षणी म्हणजे ८ जूनला १६. २५ वाजलेत आणि अपेक्षित निकाल अजून कळला नाही , याचा अर्थ इतकाच वरील लिहिलेला अंदाज चुकला आहे .
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
८ जून २०१५
आत्ता या क्षणी म्हणजे ८ जूनला १६. २५ वाजलेत आणि अपेक्षित निकाल अजून कळला नाही , याचा अर्थ इतकाच वरील लिहिलेला अंदाज चुकला आहे .
1 comment:
प्रयत्न तरी छान केला . शुभेच्छा .
Post a Comment