अवघा रंग एक झाला । रंगि रंगला श्रीरंग ॥१॥ मी तूंपण गेले वायां । पाहतां पंढरीच्या राया ॥२॥ नाही भेदाचें तें काम । पळोनि गेले क्रोध काम ॥३॥ देही असोनि विदेही । सदा समाधिस्त पाही ॥४॥ पाहते पाहणें गेले दूरी । म्हणे चोखियाची महारी ॥५॥
| रचना | - | संत सोयराबाई | 
| संगीत | - | किशोरी आमोणकर | 
| स्वर | - | किशोरी आमोणकर | 
| राग | - | भैरवी | 
 
No comments:
Post a Comment