आपल्याला सर्वांना खेळण्यातले पत्ते माहित आहेत। एका कॅट मध्ये ५२ पत्ते असतात. तसेच टॅरो डेक ( कॅट) मध्ये एकुण ७८ कार्डे असतात. यात २२ महत्वाची आणी ५६ कमी महत्वाची कार्डे असतात. प्रतेक कार्डावर एक चित्र असते आणी ते एक अर्थ प्रकट करत असते . कमी महत्त्वाच्या ५६ कार्डाचे ४ प्रकार (SUITE ) असतात ( जसे नेहमीच्या कॅट मधे चौकट, बदाम इ) . भविष्य पाहण्यासाठी पाने पिसुन , रॅन्डमली सिलेक्ट केलेली कार्डे एका विशिष्ठ पध्दतिने मांडतात . त्याला स्प्रेड (SPREAD ) म्हणतात. त्या स्प्रेड मधे मांडलेल्या प्रतेक जागा एक अर्थ सुचित करते( जसे आपल्या पत्रिकेतील स्थाने) . आणी त्याजागेवर पडणार्या कार्डावरुन भविष्याचा अंदाज व्यक्त केला जातो. हे थोडे लक्षात यायला अवघड आहे. सरतेशेवटी एक उदाहरण देउन हे स्पष्ट केले आहे.
आपण परत एकदा कार्डांची माहिती घेऊ। आधी म्हणल्या प्रमाणे एकुण ७८ कार्डे असतात. या कार्डांचे दोन प्रकारात वर्गीकरण केले आहे१) मेजर कार्डस - ( MAJOR CARDS ) एकुण कार्डे - २२ ( या कार्डाची सुरुवात शुन्य नं ते २१ नं ) - जिवनातील महत्त्वाच्या घटना/ ट्प्पे ही कार्डे सुचीत करतात.२) माइनर कार्डस ( MAJOR CARDS ) एकुण कार्डे - ५६ - जिवनातील दैनंदिन गोष्टी ही कार्ड सुचीत करतात.या ५६ कार्डाचे आणखी ४ प्रकार( SUIT ) पडतात. प्रतेक प्रकारात १४ कार्डे ( जसे एक्का, दुर्री, तिर्री, ४, ५,६,७,८,९,१०, राजकुमारी, राजकुमार, राणी, राजा)
आपल्या नेहमीच्या कॅट्मधे ५२ पत्ते असतात. इथे प्रत्तेक SUIT मधे राजकुमारी ( PRINCE ) चे कार्ड ज्यादा म्हणुन ४ कार्डे ज्यादा अशी ही ५६ कार्डे आहेत.आता आपण प्रत्तेक सुट काय सांगते ते पाहु.
प्रकार( SUIT ) प्रभाव काय सुचवते।
अ) WAND -( किल्वर) अग्नीतत्त्व करियर, बिझनेस, PASSION
ब) CUP - ( बदाम) जलतत्व रिलेशन, भावना , इमोशन , स्वप्न इ
क) SWORD ( इस्पिक ) वायुतत्त्व वैचारिकता,
ड) PENTACLE ( चौकट) पृथ्वीतत्व संपत्ती, पैसा, इस्टेट
इतिहास - १५ व्या शतकात साधारणपणे इटलीमध्ये याचा शोध लावला गेला. काही मतप्रवाहानुसार याचे मुळ इजिप्त मधे आहे. सुरवातीच्या काळात ब्रिज सारखा पत्यांचा खेळ खेळण्यासाठी याचा उपयोग केला जायचा. या कार्डांचा जनक कोण हे आजही खात्रिलायक कुणी सांगु शकत नाही.
टॅरो कसे काम करते?/ पत्ते भविष्य कसे सांगतात?
टॅरो कार्ड्स आपल्याला, आपल्या सध्याच्या परिस्थितीनुसार आपली दिशा योग्य आहे की नाही ( करियर, व्यवसाय, रिलेशन, पैसा, आणि इतर अनेक गोष्टी ज्यासाठी आपण ज्योतिषांकडे जातो) याबाबत मार्गदर्शन करते. आणी त्यावरुन ढोबळमानाने काय घडेल याचा अंदाज बांधता येतो. यातुन आपल्याला धोक्याचे संकेत मिळु शकतात आणी वेळीच योग्य पावले ( कृती) उचलल्यास आपण आपले नुकसान कमी करु शकतो.
आपण आपली कृती बदलली (परिस्थिती बदलली) की येणारे रिझल्ट बदलतात। याचा स्पष्ट अर्थ आहे की इतर जोतिष शास्त्राप्रमाणे या पध्दतीत एखाद्या गोष्टीबाबत असेच घडणार आहे असे भविष्यकथन ( भविष्यवाणी) करणे अवघड आहे. लाईफ लाँग / लाईफ टाईम भविष्य सांगणे अवघड आहे ( टॅरो क्षेत्रातले अभ्यासक कदाचीत असे भविष्य सांगत ही असतील पण मला तरी तसे वाटत नाही)
प्रामुख्याने थोड्या कालावधित ( आज, पुढिल आठवड्यात, २ महिन्यानी ते साधारणतः ५ वर्षापर्यंत ) आपल्या आयुष्यात काय घडू शकते ( करियर, व्यवसाय, लग्न, रिलेशनशिप, पैसा, आणि इतर ) याचा योग्य अंदाज या प्रकारात घेता येतो।
उदा। -- माझा आजचा दिवस कसा जाईल ?-
' हो ' किंवा 'नाही' उत्तर असलेले प्रश्न ( माझे या महिन्यातले टार्गेट पुरे होईल ? माझे आजचे ठरवलेले काम होईल?)
-नोकरीत पुढील १ वर्षात माझी काय स्थिती असेल ? ( सध्या पेक्षा काय प्रोग्रेस आहे?)
- अमुकएक ठिकाणचा प्रवास दौरा कसा होइल? ( काही अडचणी येतील का ?)
- होणारे बाळ मुलगी का मुलगा ( केवळ अंदाज व्यक्तकरण्यासाठी )
- पुढील काही कालावधीत माझ्या आयुष्यात काय घटना घडु शकतात। -
रिडिंग कसे घेतात।
यात ज्याला एखाद्या गोष्टीबाबत जाणुन घ्यायचे आहे त्याने प्रत्यक्ष उपस्थित असणे जास्त चांगले. प्रश्नकर्त्याच्या हातुन कार्ड्स शफल ( पत्ते पिसणे ) करतात. असे म्ह्ट्ले जाते की ज्यावेळी प्रश्नकर्ता कार्डस पिसत असतो त्यावेळी त्या प्रश्नाबाबत प्रश्नकर्त्याच्या मनातील विचार / स्पंदने / एनर्जी त्या कार्डात येते आणि त्याप्रमाणे योग्य कार्ड निवडली जातात आणी त्या कार्डावरील चित्रांवरुन तुम्हाला संदेश / मेसेज / सल्ला/ रिझल्ट दिला जातो.
हेच टॅरोट मेथडचे प्रिन्सिपल / बेस आहे. हे का होते ? कसे होते ? यामागचे शास्त्रिय कारण काय ? हे बरोबर आहे का ? याची माहिती नाही. पण हे असेच आहे. कुणाला याबाबत अधिक माहिती असेल त्यांनी ती अवश्य द्यावी. मलाही काही ज्यास्त माहिती मिळाली तर देईन.
रिडिंग मधे आलेल्या कार्डांचा प्रश्नाशी संबंध लावुन त्याचे योग्य विश्लेषण करणे ही खरी कार्ड रिडरची कसोटी.प्रश्नकर्त्याच्या हाताची एनर्जी त्या कार्डांना लागणे आवश्यक असल्याने फोनवर दुसर्यांसाठी रिडिंग घेणे, कॉमप्युटर टॅरो प्रोग्रैम द्वारे रिडिंग घेणे याला मर्यादा येतात आणी कदाचीत रिडिंग चुकु शकते.
कुठलेही रिडिंग घेण्याआधी ७८ कार्डांचे अर्थ माहित असणे आवश्यक आहे।
---------------------------------------------------------------------------
आता आपण कशा पध्दतीने कार्ड्स मांडली जातात ते पाहु. - यात अनेक प्रकारचे स्प्रेड आहेत. आत्ता फक्त एका स्प्रेड ची माहिती देत आहे.भुत, वर्तमान, भविष्य स्प्रेड - यात क्लायंटने प्रश्न विचारुन , टॅरो कार्ड्स शफल करुन कुठलिही ३ कार्डे निवडावी आणी चित्रात दाखवल्याप्रमाणे १-२-३ अशी कार्डॅ मांडावी . यातेल १ ले कार्ड भुतकाळ ( त्या प्र्श्नासंबंधी) , २ रे वर्तमान ( आत्ताची स्थिती) ३ रे कार्ड - भविष्य ( आपली कॄती अशीच चालु राहिली तर त्या प्रश्नासंबंधी जे घडणार आहे ते) दर्शवते.आता या मेथडचा फायदा
समजा मला माझ्या काम करण्याच्या पध्दतीबद्दल माहिती जाणुन घ्यायची आहे. मी ३ कार्डे काढली .समजा ३ रे ( भविष्य ) कार्ड हे २ र्या( वर्तमान) कार्डापेक्षा वाईट ( कमी महत्त्वाचे) असले तर हा धोक्याचा सिग्नल समजावा. यातुन असे दिसुन येते की माझ्या आत्ताच्या परिस्थितीपेक्षा अगामी काळात येणारी परिस्थिती चांगली नाही. आणी ही वाइट परिस्थिती मला नको असेल तर आत्ताच्या माझ्या कामात योग्य ते चांगले बदल घडवुन आणणे आवश्यक आहे.
याठिकाणी मी माझ्या सध्याच्या कामात बदल केला तरच परिस्थिती बदलु शकते. हे मला कळले हा या पध्द्तीचा फायदाआता समजा ३ रे कार्ड ( भविष्य )हे २ र्या कार्डापेक्षा ( वर्तमानापेक्षा ) चांगले निघाले तर असे समजावे की माझा आत्ताचा मार्ग योग्य आहे आणि त्यात मला सातत्य टिकवायला पाहिजे.
यात या प्रश्नासंबंधी आपला भुतकाळ कसा होता हे १ ले कार्ड सांगते. ओव्हरऑल विश्लेषणासाठी या कार्डाचा उपयोग करतात
मला वाटत. वरील उदा वरुन लक्षात आले असेल की टॅरो कार्डस चा उपयोग प्रामुख्याने मार्गदर्शक म्हणुन जास्त चांगला करता येतो.