अवचिता परिमळू, झुळुकला अळुमाळू । मी म्हणु गोपाळू, आला गे माये ॥१॥ चांचरती चांचरती बाहेरी निघाले । ठकचि मी ठेलें काय करू ॥२॥ तो सावळा सुंदरू कांसे पीतांबरू । लावण्य मनोहरू देखियेला ॥३॥ बोधुनी ठेलें मन तव जालें आन । सोकोनी घेतले प्राण माझे गे माये ॥४॥ बाप रखुमादेवीवरू विठ्ठल सुखाचा । तेणें काया मने वाचा वेधियेलें ॥५/
रचना | - | संत ज्ञानेश्वर |
संगीत | - | पं. हृदयनाथ मंगेशकर |
स्वर | - | लता मंगेशकर |
( स्वराविष्कार- किशोरी आमोणकर ) |
No comments:
Post a Comment