
पाहे रात्रीं दिवस वाट तुझी ॥१॥ पूर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन । तैसें माझें मन वाट पाहें ॥२॥ दिवाळीच्या मुळा लेंकी आसावली । पाहतसे वाटुली पंढरीची ॥३॥ भुकेलिया बाळ अति शोक करी । वाट पाहे परि माउलीची ॥४॥ तुका म्हणे मज लागलीसे भूक । धांवूनि श्रीमुख दावीं देवा ॥५॥
रचना | - | संत तुकाराम |
संगीत | - | श्रीनिवास खळे |
स्वर | - | लता मंगेशकर |
No comments:
Post a Comment