चला पंढरीसी जाऊं । रखमादेवीवरा पाहूं ॥१॥ डोळे निवतील कान । मना तेथें समाधान ॥२॥ संता महंता होतील भेटी । आनंदे नाचों वाळवंटी ॥३॥ तें तीर्थांचे माहेर । सर्व सुखाचें भांडार ॥४॥ जन्म नाही रे आणीक । तुका म्हणे माझी भाक ॥५॥
Post a Comment
No comments:
Post a Comment