वृंदावनी वेणु कवणाचा माये वाजे । वेणुनादे गोवर्धनु गाजे ॥१॥ पुच्छ पसरूनी मयूर विराजे । मज पाहता भासती यादवराजे ॥२॥ तृणचारा चरू विसरली । गाईव्याघ्र एके ठायी झाली । पक्षीकुळे निवांत राहिली । वैरभाव समूळ विसरली ॥३॥ यमुनाजळ स्थिरस्थिर वाहे । रविमंडळ चालता स्तब्ध होय । शेष कूर्म वराह चकीत राहे । बाळा स्तन देऊ विसरली माय ॥४॥ ध्वनी मंजूळ मंजूळ उमटती । बाकी रुणझुण रुणझुण वाजती । देव विमानी बैसोनी स्तुति गाती । भानुदासा पावली प्रेम-भक्ति ॥५॥
रचना | - | संत भानुदास |
संगीत | - | |
स्वर | - | अजितकुमार कडकडे |
No comments:
Post a Comment